Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 योहान 4:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 प्रिय मित्रांनो, प्रत्येक आत्म्यावर विश्वास ठेवू नका, परंतु ते आत्मे परमेश्वराकडून आलेले आहेत का याची परीक्षा करा, कारण पुष्कळ खोटे संदेष्टे जगामध्ये निघालेले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 प्रियजनहो, प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका, तर ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाहीत ह्याविषयी त्यांची परीक्षा करा; कारण पुष्कळ खोटे संदेष्टे जगात उठले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 प्रियांनो, प्रत्येक आत्म्यावर विश्वास ठेवू नका परंतु ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाहीत याची परीक्षा करा कारण जगात पुष्कळ खोटे संदेष्टे निघाले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

1 प्रियजनहो, “मला पवित्र आत्मा मिळाला आहे”, असे म्हणणाऱ्या सर्व माणसांवर विश्वास ठेऊ नका, तर त्यांना मिळालेला आत्मा देवाकडून मिळालेला आहे किंवा नाही ह्याविषयी त्यांची परीक्षा करा; कारण पुष्कळ खोटे संदेष्टे जगात वावरत आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 योहान 4:1
29 Iomraidhean Croise  

त्या वृद्ध संदेष्ट्याने उत्तर दिले, “जसा तू तसाच मीही संदेष्टा आहे, आणि याहवेहच्या वचनाने दूत मला म्हणाला: ‘त्याने भाकर खावी व पाणी प्यावे म्हणून त्याला परत तुझ्या घरी घेऊन ये.’ ” (परंतु तो त्याच्याशी खोटे बोलत होता.)


साधीभोळी माणसे कोणत्याही गोष्टींवर विश्वास ठेवतात. परंतु सुज्ञ विचारपूर्वक पाऊल उचलतो.


त्यावर याहवेहने मला म्हटले, “संदेष्टे माझ्या नावाने असत्य संदेश सांगत आहेत. मी काही त्यांना पाठविले नाही किंवा त्यांना नेमले नाही वा त्यांच्याशी बोललो नाही. खोट्या दृष्टान्तावरून, प्रकटीकरणांवरून, व्यर्थ शकुनविद्येवरून आणि स्वतःच्या मनाच्या भ्रांतीवरून ते तुम्हाला खोटी भविष्ये सांगतात.”


सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “हे संदेष्टे जे संदेश तुम्हाला सांगतात ते ऐकू नका; ते तुम्हाला खोट्या आशेने भरून टाकतात. ते त्यांच्या मनाचेच दृष्टान्त सांगतात, त्यांचे शब्द याहवेहच्या मुखातील नाहीत!


संदेष्टे खोटी भविष्यवाणी करतात, याजक स्वतःचेच अधिकार चालवितात, आणि माझ्या लोकांना ते आवडते. पण शेवटी तुम्ही काय करणार आहात?


त्या काळात, ‘येथे ख्रिस्त आहे!’ किंवा ‘पाहा, तो तिथे आहे,’ असे जर कोणी तुम्हाला सांगितले, तर अजिबात विश्वास ठेवू नका.


“जे काही योग्य आहे, त्याविषयी तुम्हीच स्वतःसाठी न्याय का करीत नाही?


येशूंनी उत्तर दिले, “तुम्ही फसविले जाऊ नये म्हणून सावध राहा, कारण अनेकजण माझ्या नावाने येतील आणि ‘मीच तो आहे,’ असा दावा करतील. ते म्हणतील ‘काळ जवळ आला आहे,’ त्यांच्यामागे जाऊ नका.


आता बिरुया येथील यहूदी थेस्सलनीकातील लोकांपेक्षा थोर चरित्राचे होते, त्यांनी संदेश मोठ्या उत्सुकतेने ऐकला पौलाची विधाने खरी आहेत की नाहीत, हे ते प्रतिदिवशी वचनांची तपासणी करून पाहात असत.


मला हे माहीत आहे की मी गेल्यानंतर, क्रूर लांडगे येतील व तुम्हामध्ये शिरतील आणि ते कळपालाही सोडणार नाहीत.


तोच आत्मा काही जणांना चमत्कार करण्याचे सामर्थ्य देतो, तर इतर काही जणांना संकल्प सांगण्याचे, तर कित्येकांना आत्मे ओळखण्याचे सामर्थ्य देतो. आणखी काहींना तो अन्य भाषा बोलण्याचे ज्ञान देतो; आणि त्याचप्रमाणे इतरांना अन्य भाषेचे स्पष्टीकरण करण्याची क्षमता देतो.


संदेश देणार्‍यांपैकी दोघांनी किंवा तिघांनीच बोलावे आणि इतरांनी संदेशाची काळजीपूर्वक पारख करावी.


संदेशाला तुच्छ मानू नका.


परंतु त्या सर्वांची परीक्षा करा; जे चांगले आहे ते धरून ठेवा,


आमच्याद्वारे दिलेल्या तथाकथित शिक्षणाद्वारे तुम्ही सहज अस्थिर किंवा गोंधळून जाऊ नका. प्रभूचा दिवस येऊन ठेपला आहे, असे ठामपणे आपल्या संदेशाद्वारे किंवा बोलण्याद्वारे किंवा पत्राद्वारे सांगणार्‍यांना घाबरून जाऊ नका.


पवित्र आत्मा स्पष्ट सांगतो की शेवटच्या काळात कित्येक लोक विश्वासापासून दूर जातील आणि धूर्त व दुरात्माच्या शिक्षणावर मन लावतील.


परंतु दुष्ट आणि भोंदू लोक हे दुसर्‍यांना फसवून आणि स्वतः फसून अधिक वाईटाकडे जातील.


परंतु लोकांमध्ये सुद्धा खोटे संदेष्टे होते, तसेच तुमच्यामध्ये खोटे शिक्षक असतील, ते गुप्त रीतीने विध्वंसक पाखंडी मते प्रचारात आणतील, ज्याने त्यांना विकत घेतले अशा सार्वभौम प्रभूला नाकारतात आणि स्वतःवर आकस्मिक नाश ओढवून घेतील.


प्रिय मुलांनो, ही शेवटची घटका आहे; आणि तुम्ही ऐकल्याप्रमाणे ख्रिस्तविरोधक येत आहे आणि आतासुद्धा अनेक ख्रिस्तविरोधक आलेले आहेत. यावरूनच आपणास समजते की ही शेवटची घटका आहे.


प्रिय बंधूंनो, मी काही तुम्हाला नवीन आज्ञा लिहून देत आहे असे नाही, तर ही जुनीच आहे, जी सुरुवातीपासून दिलेली आहे. ही जुनी आज्ञा जो एक संदेश आहे तो तुम्ही ऐकलेला आहे,


मी तुम्हाला सांगतो की, फसवणूक करणारे असे पुष्कळजण जगामध्ये निघालेले आहेत, येशू ख्रिस्त देह धारण करून या जगात आले, याचा ते अंगीकार करीत नाहीत. अशा प्रकारची कोणीही व्यक्ती फसवणूक करणारी आणि ख्रिस्तविरोधक आहे.


प्रिय मित्रा, जे वाईट आहे त्याचे अनुकरण करू नको तर चांगल्याचे कर. जो कोणी चांगले करतो तो परमेश्वरापासून आहे. जो कोणी जे काही वाईट आहे ते करतो त्याने परमेश्वराला पाहिलेले नाही.


तुमची कृत्ये, तुमचे परिश्रम आणि तुमचा धीर मला ठाऊक आहे. दुष्ट लोक तुम्हाला सहन होत नाहीत हे मला ठाऊक आहे. प्रेषित नसताना स्वतःला प्रेषित म्हणविणार्‍यांची परीक्षा करून ते कसे लबाड आहेत, हे तुम्ही शोधून काढले आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan