Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 योहान 3:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 जे प्रत्येकजण पाप करतात ते नियम मोडतात; खरेतर नियमांचे पालन न करणे हेच पाप आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 जो कोणी पाप करतो तो स्वैराचार करतो; कारण पाप स्वैराचार आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 प्रत्येकजण जो पाप करतो तो नियमशास्त्राचे उल्लंघन करतो कारण पाप हे नियमशास्त्राचे उल्लंघन आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

4 जो कोणी पाप करतो, तो स्वैराचार करतो, कारण पाप स्वैराचार आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 योहान 3:4
17 Iomraidhean Croise  

आणि ते कैदेत असता त्यांच्या हृदयाचा पालट झाला व पश्चात्ताप करीत कैद करून नेलेल्यांच्या देशात आपल्याकडे असे म्हणत विनंती केली, ‘आम्ही पाप केले आहे, आम्ही विपरीत वागलो आहोत, आम्ही दुष्टतेने वागलो आहोत’;


याहवेहशी अविश्वासू राहिल्यामुळे शौलाला मृत्यू आला; कारण त्याने याहवेहची आज्ञा न पाळता, एका भूतविद्याप्रवीण स्त्रीचा सल्ला घेतला,


मग यहोयादा याजकाचा मुलगा जखर्‍याह याच्यावर परमेश्वराचा आत्मा आला. तो लोकांसमोर उभा राहिला आणि म्हणाला, “परमेश्वर, असे म्हणतात, ‘तुम्ही याहवेहच्या आज्ञांचे पालन का करीत नाही? तुमची भरभराट होणार नाही. कारण तुम्ही याहवेह यांना सोडले आहे, म्हणून त्याने तुमचा त्याग केला आहे.’ ”


अत्याचार करून, दोषी ठरविल्यावर ते त्याला जिवे मारण्यासाठी घेऊन गेले. तरी त्याच्या पिढीतून कोणी विरोध केला? कारण तो जिवंताच्या भूमीवरून काढून टाकण्यात आला; माझ्या लोकांच्या अपराधांसाठी त्याला शिक्षा देण्यात आली.


सर्व इस्राएली लोकांनी तुमच्या नियमांचे आज्ञाभंग केले आहे आणि तुमची आज्ञा पाळण्यास आपली पाठ फिरविली आहे. “म्हणूनच परमेश्वराचा सेवक मोशे याच्या नियमशास्त्रात लिहून ठेवलेले शाप आणि शपथेवरचा दंड आमच्यावर ओतला गेला आहे, कारण आम्ही तुमच्याविरुद्ध पाप केले आहे.


कारण त्यांनी याहवेहच्या शब्दाला तुच्छ मानले आहे आणि याहवेहच्या आज्ञा मोडल्या आहेत, त्यांचे खचितच उच्छेदन करावे; त्यांचा दोष त्यांच्यावर राहील.’ ”


जो कोणी नियमशास्त्रातील लहान आज्ञा मोडेल आणि दुसर्‍यांनाही त्यानुसार शिकविल, तो स्वर्गाच्या राज्यात कनिष्ठ गणला जाईल. परंतु जे परमेश्वराचे नियम शिकवितात आणि पाळतात ते परमेश्वराच्या राज्यात श्रेष्ठ ठरतील.


तेव्हा पौल त्याला म्हणाला, “हे चुन्याचा लेप लावलेल्या भिंती, परमेश्वर तुझ्यावर वार करतील! तू येथे नियमशास्त्राप्रमाणे माझा न्याय करतो, परंतु तू स्वतः नियमशास्त्राचा भंग करून माझ्यावर वार करण्याची आज्ञा देतोस काय!”


नियमशास्त्राप्रमाणे कृती करणारी कोणीही व्यक्ती परमेश्वरासमोर नीतिमान म्हणून घोषित केली जाणार नाही; आपल्या पापांची जाणीव आपणाला नियमशास्त्रामुळे होते.


कारण नियमामुळे क्रोध भडकतो आणि जिथे नियम नाही तिथे उल्लंघनही नाही.


होय, मला वाटते की मी पुन्हा आलो की माझा परमेश्वर मला तुमच्यापुढे नम्र करेल आणि ज्या अनेकांनी पूर्वी पाप केलेले आहे आणि आपल्या हातून घडलेल्या अशुद्धता, लैंगिक पाप व कामातुरपणा, या गोष्टींबद्दल पश्चात्ताप केला नाही त्याबद्दल मला दुःख करावे लागेल.


विश्वासाने केलेली प्रार्थना त्या रोग्याला बरे करेल; प्रभू त्याला उठवेल. जर त्यांनी पाप केले असेल, तर त्यांची क्षमा होईल.


प्रत्येक चुकीचे कृत्य पाप आहे आणि असेही पाप आहे की ज्याचा परिणाम मरण नाही.


शौल शमुवेलास म्हणाला, “मी पाप केले आहे, मी याहवेहच्या आज्ञेचा व तुमच्या सूचनांचा भंग केला आहे; मला लोकांचे भय वाटले, म्हणून मी त्यांचे म्हणणे ऐकले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan