Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 योहान 3:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 प्रिय मित्रांनो, आपण आता परमेश्वराची लेकरे आहोत आणि आपण पुढे काय होऊ हे अजून आपल्याला ठाऊक झालेले नाही. परंतु जेव्हा ख्रिस्त प्रकट होतील तेव्हा जसे ख्रिस्त आहेत तसे आपण होणार, कारण जसे ते आहेत तसेच आपण त्यांना पाहू.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 प्रियजनहो, आपण आता देवाची मुले आहोत; आणि पुढे आपण काय होऊ हे अजून प्रकट झालेले नाही; तरी तो प्रकट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ हे आपल्याला माहीत आहे, कारण जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 प्रियांनो, आता आम्ही देवाची मुले आहोत आणि भविष्यकाळात आम्ही कसे असू हे आम्हास माहीत नाही. तरीही आम्हास माहीत आहे की, जेव्हा ख्रिस्त पुन्हा येईल, तेव्हा आम्ही त्याच्यासारखे असू, कारण तो जसा आहे तसे आम्ही त्यास पाहू.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

2 प्रियजनहो, आपण आता देवाची मुले आहोत आणि पुढे आपण काय होऊ, हे अजून स्पष्ट झालेले नाही, परंतु तो प्रकट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ, हे आपल्याला माहीत आहे, कारण जसा तो आहे, तसाच तो आपल्याला दिसेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 योहान 3:2
37 Iomraidhean Croise  

आणि हे शरीर कुजून गेल्यानंतरही, आपल्या देहाशिवाय मी परमेश्वराला पाहीन;


तुम्ही मला जीवनाचा मार्ग दाखवाल; तुमच्या समक्षतेत तुम्ही मला हर्षाने भराल, तुमच्या उजव्या हातात सर्वदा सौख्य आहे.


मी तर नीतिमत्वामुळे तुमच्या मुखाचे दर्शन करणार; मी जागा होईन, तेव्हा तुमच्या दर्शनाने माझे पूर्ण समाधान होईल.


तुमचा चांगुलपणा किती विपुल आहे, जो तुम्ही तुमच्या भय धरणार्‍यांसाठी राखून ठेवला आहे, आणि जे लोक तुमच्या ठायी आश्रय घेतात त्यांच्यावर त्याचा सर्वांसमक्ष वर्षाव करता.


त्यांना मी माझ्या मंदिरामध्ये व त्याच्या भिंतीच्या आत पुत्र व कन्यापेक्षाही चांगले असे संस्मरणीय बनवेन व एक नाव देईन. त्यांना मी सर्वकाळ टिकणारे नाव देईन, जे नाव कधीही नाहीसे होणार नाही.


पण त्यांच्या येण्याचा दिवस कोण सहन करू शकेल? त्यांच्या आगमनास कोण सामोरा जाऊ शकेल? कारण तो मौल्यवान धातू शुद्ध करणार्‍या धगधगत्या अग्नीसारखा आहे आणि मलीन वस्त्रे धुणाऱ्या साबणासारखा असेल.


धन्य आहेत ते, जे शुद्ध अंतःकरणाचे आहेत, कारण त्यांना परमेश्वराचे दर्शन घडेल.


“मानवपुत्र प्रकट होईल त्या दिवशीही हे अशाच प्रकारे असेल.


आणि ते मरणार नाहीत, कारण ते देवदूतांसारखे आहेत. ती परमेश्वराची लेकरे आहेत, कारण ती पुनरुत्थानाची लेकरे झाली आहेत.


परंतु ज्या सर्वांनी त्यांना स्वीकारले, त्यांच्या नावावर विश्वास ठेवला, त्यांना परमेश्वराची मुले होण्याचा अधिकार दिला—


हे केवळ इस्राएली राष्ट्रासाठीच नव्हे, तर परमेश्वराच्या सर्व पांगलेल्या मुलांना एकत्र आणावे आणि एक करावे यास्तव.


“हे पित्या, जगाची उत्पत्ती होण्यापूर्वी तुम्ही मजवर प्रीती करून मला गौरव दिले. आता त्यांना माझे गौरव पाहता यावे म्हणून तुम्ही जे लोक मला दिले, त्यांनी जिथे मी आहे, तिथे माझ्याजवळ असावे अशी माझी इच्छा आहे.


कारण पवित्र आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण परमेश्वराची मुले आहोत.


तर आपल्याला पुढे जे गौरव प्रकट होणार आहे, त्याच्या तुलनेने वर्तमान काळातील दुःखे काहीच नाहीत.


कारण परमेश्वर आपल्या लेकरांना प्रकट करेल, त्या दिवसाची अखिल सृष्टी वाट पाहत आहे.


ज्यांच्याविषयी परमेश्वराला पूर्वज्ञान होते व त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे व्हावे, यासाठी त्यांना पूर्वनियोजित केले होते की त्यांनी अनेक बंधू आणि भगिनीमध्ये ज्येष्ठ असे व्हावे.


कारण आपण आता केवळ आरशात प्रतिबिंब पाहत आहोत; नंतर आपण समोरासमोर पाहणार आहोत. मला आता केवळ अंशतः कळते; नंतर मला सर्वकाही स्पष्ट असे दिसेल, जशी माझी संपूर्ण ओळख झाली आहे.


आणि आता ज्याप्रमाणे आपण शारीरिक मनुष्याचे प्रतिरूप धारण केले आहे, तसेच आपण स्वर्गीय मनुष्याचे प्रतिरूप धारण करू.


तरी शास्त्रलेखानुसार: “जे डोळ्यांनी पाहिले नाही, जे कोणत्याही कानावर पडले नाही, माणसाच्या मनात आले नाही,”— त्या सर्वगोष्टी परमेश्वरावर प्रीती करणाऱ्यांसाठी त्यांनी सिद्ध केल्या आहेत—


आपण जे सर्व, मुखावर आच्छादन नसलेले; ते आपण प्रभूचे वैभव प्रतिबिंबित करणारे आहोत. ते आपण वाढत जाणार्‍या तेजासह त्यांच्या प्रतिमेप्रमाणे बदलत जात आहोत. हे सर्व प्रभूपासून आहे जे आत्मा आहेत.


आमची संकटे अति हलकी व क्षणिक आहेत तरी त्यामुळे सदासर्वकाळचे गौरव प्राप्त होणार आहे की ज्याची तुलना आम्ही करू शकत नाही.


कारण आता आपण ख्रिस्त येशूंवरील विश्वासाच्याद्वारे परमेश्वराची लेकरे आहोत.


कारण तुम्ही त्यांचे पुत्र आहात, म्हणूनच परमेश्वराने त्यांचा आत्मा आमच्या हृदयात पाठविला आहे, त्याद्वारेच आपण, “अब्बा, पिता अशी त्यांना हाक मारतो.”


जे त्या सामर्थ्याद्वारे सर्वकाही त्यांच्या नियंत्रणात ठेवण्यास समर्थ आहे, ते आपली अशक्त शरीरे घेऊन व त्यांचे रूपांतर करून ती स्वतःच्या शरीरासारखी गौरवशाली शरीरे करतील.


ख्रिस्त जे आपले जीवन आहेत, ते प्रकट होतील, तेव्हा तुम्हीही त्यांच्याबरोबर गौरवात प्रकट व्हाल.


तसेच अनेकांचे पाप वाहून नेण्यासाठी बली म्हणून ख्रिस्त एकदाच मरण पावले आणि ते दुसर्‍या वेळेस प्रकट होणार, ते पाप वाहण्यासाठी नाही, तर जे त्यांची धीराने वाट पाहतात, त्यांचे तारण आणण्यासाठी येतील.


याद्वारे त्यांनी आपल्याला त्यांची अतिमहान आणि मोलवान अभिवचने दिली आहेत, यासाठी की त्याद्वारे त्यांच्या दैवीस्वभावात आपण सहभागी व्हावे व जगाच्या भ्रष्टतेतून निर्माण होणार्‍या वाईट वासनेपासून आपली सुटका व्हावी.


आता प्रिय मुलांनो, सतत त्यांच्यामध्ये राहा, म्हणजे ते प्रकट होतील त्यावेळी आपण आत्मविश्वासपूर्वक असावे आणि त्यांच्या येण्याच्या दिवशी त्यांच्यासमोर आपणास लज्जित व्हावे लागणार नाही.


प्रिय बंधूंनो, मी काही तुम्हाला नवीन आज्ञा लिहून देत आहे असे नाही, तर ही जुनीच आहे, जी सुरुवातीपासून दिलेली आहे. ही जुनी आज्ञा जो एक संदेश आहे तो तुम्ही ऐकलेला आहे,


पित्याने आपण परमेश्वराची लेकरे म्हणून संबोधले जावे म्हणून पित्याने आपणावर किती मोठा अगाध प्रीतीचा वर्षाव केला आहे! आणि आपण तसे आहोतच! जग आपल्याला ओळखत नाही कारण जगाने त्यांना ओळखले नाही.


यावरून आपल्याला परमेश्वराची मुले कोणती आणि सैतानाची मुले कोणती, हे ओळखता येते. जे कोणी जे योग्य आहे ते करीत नाहीत, ती परमेश्वराची लेकरे नाहीत किंवा जे कोणी आपल्या भावावर आणि बहिणीवर प्रीती करीत नाही ते सुद्धा परमेश्वरापासून नाहीत.


प्रिय मित्रांनो, जर आपली अंतःकरणे आपल्याला दोषी ठरवीत नसतील तर परमेश्वरासमोर येण्यास आपल्याला धैर्य आहे


येशू हे ख्रिस्त आहेत, असा विश्वास ठेवणारा प्रत्येकजण परमेश्वरापासून जन्मला आहे आणि प्रत्येकजण जे पित्यावर प्रीती करतात ते त्यांच्या लेकरावरही प्रीती करतात.


ज्याप्रमाणे मला माझ्या पित्याकडून अधिकार मिळाला आहे, त्याप्रमाणे मी त्यांना पहाटेचा तारा देखील देईन.


ते त्यांचे मुख पाहतील व त्यांचे नाव त्यांच्या कपाळावर लिहिलेले असेल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan