Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




सफन्या 3:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 तेव्हा मी राष्ट्रांना शुद्ध वाणी देईन, व परमेश्वराची सेवा घडावी म्हणून ते सर्व त्याच्या नामाचा धावा एकचित्ताने1 करतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 त्यानंतर लोकांस मी शुद्ध ओठ देईन, अशासाठी की परमेश्वराच्या नावाला हाक मारताना त्या सर्वांनी खांद्याला खांदा लावून एक होऊन माझी सेवा करावी.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 “मग मी त्यांच्या ओठांचे शुद्धीकरण करेन, असे की ते सर्व याहवेहच्या नामाचा धावा करतील आणि खांद्याला खांदा लावून त्यांची सेवा करतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




सफन्या 3:9
21 Iomraidhean Croise  

सर्व पृथ्वीची एकच भाषा, एकच बोली होती.


शेथ ह्याला मुलगा झाला, त्याचे नाव त्याने अनोश असे ठेवले; त्या काळापासून लोक परमेश्वराच्या नावाने प्रार्थना करू लागले.


सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत परमेश्वराचे नाव स्तवनीय आहे.


दिगंतरीचे सर्व जन परमेश्वराला स्मरून त्याच्याकडे वळतील; सगळी राष्ट्रकुले तुला दंडवत घालतील.


त्या दिवशी मिसर देशाची पाच नगरे कनान देशाची भाषा बोलतील; ती सेनाधीश परमेश्वरापुढे एकनिष्ठतेची शपथ वाहतील; त्यांपैकी एकाला ईर-हरेस (विनाशनगर) म्हणतील.


मी त्याच्या तोंडून आभारवचन उच्चारवीन, जे दूर आहेत व जे जवळ आहेत, त्यांना शांती असो, शांती असो; मी त्यांना सुधारीन असे परमेश्वर म्हणतो.


तो माझ्या ओठांना लावून त्याने म्हटले, “पाहा, ह्याचा स्पर्श तुझ्या ओठांना झाला म्हणून तुझा दोष दूर झाला आहे, तुझ्या पापाचे प्रायश्‍चित्त झाले आहे.”


हे परमेश्वरा, माझ्या सामर्थ्या, माझ्या दुर्गा, संकटसमयीच्या माझ्या आश्रया, पृथ्वीच्या दिगंतापासून राष्ट्रे तुझ्याकडे येऊन म्हणतील, “आमच्या पूर्वजांना खोट्या, निरर्थक व निरुपयोगी अशा वस्तूंचाच काय तो वतनभाग मिळाला.


ते ढलपे एकास एक जोडून त्यांचा एक ढलपा कर; तुझ्या हाती ते एकजीव होतील असे कर.


कारण जल समुद्राला व्यापून टाकते तशी पृथ्वी परमेश्वराच्या प्रतापाच्या ज्ञानाने भरेल.


परमेश्वर त्यांना भयावह होईल; पृथ्वीवरच्या सर्व दैवतांचा तो क्षय करील; तेव्हा सर्व राष्ट्रद्वीपे व प्रत्येक जण आपापल्या स्थानी त्याला भजेल.


तेव्हा परमेश्वर सर्व पृथ्वीवर राजा होईल; त्या दिवशी परमेश्वर तेवढा व त्याचे नाम तेवढे राहील.


त्या दिवसांत बहुत राष्ट्रे परमेश्वराला येऊन मिळतील व माझी प्रजा बनतील; मी तुझ्या ठायी वस्ती करीन, मग तुला समजेल की, सेनाधीश परमेश्वराने मला तुझ्याकडे पाठवले आहे.


चांगला माणूस आपल्या अंतःकरणाच्या चांगल्या भांडारातून चांगल्या गोष्टी काढतो आणि वाईट माणूस आपल्या वाईट भांडारातून वाईट गोष्टी काढतो.


तुमच्या मुखातून कसलेच कुजके भाषण न निघो, पण गरजेप्रमाणे उन्नतीकरता जे चांगले तेच मात्र निघो, ह्यासाठी की, तेणेकडून ऐकणार्‍यांना कृपादान प्राप्त व्हावे.


सातव्या देवदूताने कर्णा वाजवला; तेव्हा स्वर्गात मोठ्या वाणी झाल्या; त्या म्हणाल्या : “जगाचे ‘राज्य’ आमच्या ‘प्रभूचे व त्याच्या ख्रिस्ताचे’ झाले आहे; आणि ‘तो युगानुयुग राज्य करील.”’


Lean sinn:

Sanasan


Sanasan