Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




सफन्या 3:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 तिच्यामध्ये परमेश्वर न्यायी आहे; तो काही अन्याय करत नाही; रोज सकाळी तो आपला न्याय प्रकट करतो, चुकत नाही; अन्यायी लोकांना तर लाज कशी ती ठाऊक नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 परमेश्वर तिच्यामध्ये न्यायी आहे, तो अन्याय करू शकत नाही! तो दररोज आपला न्याय उजेडात आणतो! तो प्रकाशात लपवला जाणार नाही, तरीही गुन्हेगारांना लाज वाटत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 परंतु तिच्यात असणारे याहवेह नीतिमान आहेत; ते काहीही अयोग्य करीत नाहीत. प्रतिदिन सकाळी ते त्यांचे न्यायदान करतात, आणि कोणत्याही नवदिनी ते असफल होत नाहीत, तरी अधर्म्यांना लाज काय ते ठाऊकच नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




सफन्या 3:5
41 Iomraidhean Croise  

ह्या प्रकारची कृती तुझ्यापासून दूर राहो. ज्यामुळे नीतिमानाची आणि दुष्टाची सारखीच गत होईल असा दुर्जनाबरोबर नीतिमानाचा वध करणे तुझ्यापासून दूर राहो; सर्व जगाचा न्यायाधीश योग्य न्याय करणार नाही काय?”


ह्याकरता समंजस जनहो, माझे ऐकून घ्या; देवाकडून दुष्कर्म व्हावे, सर्वसमर्थाकडून अन्याय व्हावा, ही कल्पनाही करायला नको.


रोज सकाळी त्याचा समाचार घ्यावा, व क्षणोक्षणी त्याची कसोटी पाहावी?


देव निर्णय विपरीत करील काय? जो सर्वसमर्थ तो न्याय विपरीत करील काय?


परमेश्वर आपल्या सर्व मार्गांत न्यायी आहे, तो आपल्या सर्व कृत्यांत दयाळू आहे.


तो तुझे नीतिमत्त्व प्रकाशासारखे, तुझे न्यायत्व मध्यान्हासारखे प्रकट करील.


ह्यावरून दिसेल की परमेश्वर सरळ आहे. तो माझा दुर्ग आहे, त्याच्या ठायी अन्याय मुळीच नाही.


अगे सीयोननिवासिनी, जयघोष कर, गजर कर; इस्राएलाचा पवित्र प्रभू तुझ्या ठायी थोर आहे.”


जेव्हा जेव्हा तो येईल तेव्हा तेव्हा तो तुम्हांला ग्राशील; नित्य सकाळी, रात्री व दिवसा तो येईल; हा संदेश कळल्याने दहशत पोहचेल.


हे परमेश्वरा, आमच्यावर कृपा कर; आम्ही तुझी आशा धरून आहोत; रोज सकाळी तू आमचा भुज हो, आणि संकटसमयी आमचा उद्धारक हो.


बोला, त्यांना समोर आणा; त्यांना आपापसांत विचार करू द्या; हे कोणी पूर्वीपासून कळवले? हे कोणी पुरातन काळापासून ऐकवले? मी परमेश्वरानेच नव्हे काय? माझ्यावेगळा देव नाही; माझ्यावाचून न्यायी व तारणकर्ता दुसरा कोणी देव नाही.


शिणलेल्यांना बोलून धीर कसा द्यावा ते समजावे म्हणून प्रभू परमेश्वराने मला सुशिक्षितांची जिव्हा दिली आहे; तो रोज रोज सकाळी मला जागे करतो; शिष्यांप्रमाणे ऐकावे म्हणून माझे कान उघडतो.


‘परमेश्वर म्हणतो, हे दावीदघराण्या, रोज सकाळी न्यायनिवाडा कर; जुलम्याच्या हातातून लुबाडलेल्यांना सोडव; नाहीतर तुझ्या कर्माच्या दुष्टतेमुळे माझा संताप अग्नीसारखा भडकेल. तो कोणाच्याने विझवणार नाही.”’


ह्यामुळे पर्जन्यवृष्टी आवरण्यात आली आहे आणि वळवाचा पाऊस पडला नाही; तरी तुझे कपाळ पडले कसबिणीचे; तुला लाज कशी ती ठाऊक नाही.


त्यांनी अमंगल कृत्य केले त्याची त्यांना लाज वाटली काय? नाही; त्यांना लाज मुळीच वाटली नाही; शरम कसली ती त्यांना ठाऊक नाही; म्हणून पतन पावणार्‍यांबरोबर ते पतन पावतील; मी त्यांचा समाचार घेईन तेव्हा ते ठोकर खाऊन पडतील,” असे परमेश्वर म्हणतो.


त्यांनी अमंगळ कृत्य केले त्याची त्यांना लाज वाटली काय? नाही; त्यांना बिलकूल लाज वाटली नाही; शरम कसली ती त्यांना ठाऊक नाही; म्हणून पतन पावणार्‍यांबरोबर ते पतन पावतील; मी त्यांचा समाचार घेईन तेव्हा ते ठोकर खाऊन पडतील, असे परमेश्वर म्हणतो.


ती रोज सकाळी नवी होते; तुझी सत्यता थोर आहे.


तरी तुम्ही म्हणता, ‘प्रभूचा मार्ग न्याय्य नाही.’ हे इस्राएल घराण्या, ऐक; माझा मार्ग न्याय्य नाही काय? तुमचेच मार्ग न्याय्य नाहीत, असे नव्हे काय?


ह्या प्रकारे रहदारीचे एकंदर क्षेत्र अठरा हजार हात असावे; ह्या नगराचे नाव येथून पुढे याव्हे-शाम्मा (तेथे परमेश्वर आहे) असे पडेल.”


जो कोणी शहाणा आहे त्याला हे समजेल, जो कोणी समंजस आहे त्याला हे कळेल; परमेश्वराचे मार्ग सरळ आहेत; त्यांनी नीतिमान चालतील आणि पातकी त्यांत अडखळून पडतील.


म्हणून मी त्यांच्यावर संदेष्ट्याच्या हातून कुर्‍हाड चालवली आहे, माझ्या तोंडच्या शब्दांनी त्यांना ठार केले आहे; माझा न्याय प्रकाशाप्रमाणे व्यक्त झाला आहे.


तिचे प्रमुख लाच खाऊन न्याय करतात, तिचे याजक वेतन घेऊन शिक्षण देतात, तिचे संदेष्टे पैसे घेऊन भविष्य सांगतात; तरी ते परमेश्वरावर अवलंबून म्हणतात की, “परमेश्वर आमच्या ठायी नाही काय? आमच्यावर काही अनिष्ट येणार नाही.”


परमेश्वर माझा तंटा लढून माझा हक्क संपादन करील, तोपर्यंत मी त्याचा राग सहन करीन; कारण मी त्याच्याविरुद्ध पाप केले आहे; मला तो प्रकाशात नेईल, मी त्याचे न्यायीपण पाहीन.


मला अधर्म का पाहायला लावतोस? विपत्ती मला का दाखवतोस? लुटालूट व जुलूम माझ्यासमोर आहेत; कलह चालला आहे, वाद उपस्थित झाला आहे.


हे निर्लज्ज राष्ट्रा, एकत्र हो, ताळ्यावर ये;


इस्राएलाचे अवशिष्ट जन काही अनिष्ट करणार नाहीत, लबाडी करणार नाहीत, त्यांच्या मुखात कपटी जिव्हा आढळायची नाही; ते चरतील व विश्रांती मिळवतील, कोणी त्यांना भेडसावणार नाही.”


परमेश्वराने तुझा दंड दूर केला आहे, तुझ्या शत्रूचे निवारण केले आहे; इस्राएलाचा राजा परमेश्वर तुझ्यामध्ये आहे; तुला पुन्हा अरिष्टाची भीती प्राप्त होणार नाही.


परमेश्वर तुझा देव, साहाय्य करणार्‍या वीरासारखा तुझ्या ठायी आहे; तो तुझ्याविषयी आनंदोत्सव करील; त्याचे प्रेम स्थिर राहील, तुझ्याविषयी त्याला उल्लास वाटून तो गाईल.


परमेश्वर म्हणतो, तिच्या सभोवार मी तिला अग्नीचा कोट होईन, व तिच्या ठायी मी तेजोरूप होईन.”’


सीयोनकन्ये, जोराने आनंदाचा गजर कर; यरुशलेमकन्ये, गजर कर; पाहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे; तो न्यायी व यशस्वी आहे; तो लीन आहे; गाढवावर, गाढवीच्या पिलावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे.


जे उघडे होणार नाही असे काहीही झाकलेले नाही व जे कळणार नाही असे काहीही गुप्त नाही.


की, आपल्या हटवादीपणाने पश्‍चात्तापहीन अंतःकरणाने देवाचा क्रोध व यथोचित न्याय ह्यांच्या प्रकटीकरणाच्या दिवसासाठी स्वतःकरता क्रोध साठवून ठेवतोस?


म्हणजे आपले नीतिमत्त्व सांप्रतकाळी असे व्यक्त करावे की, आपण नीतिमान असावे आणि येशूवर विश्वास ठेवणार्‍याला नीतिमान ठरवणारे असावे.


म्हणून त्या समयापूर्वी म्हणजे प्रभूच्या येण्यापूर्वी तुम्ही न्यायनिवाडा करूच नका; तो अंधारातील गुप्त गोष्टी प्रकाशात आणील आणि अंतःकरणातील संकल्पही उघड करील; आणि मग प्रत्येकाच्या योग्यतेप्रमाणे देव त्याची वाहवा करील.


कारण तुझा देव परमेश्वर तुझा बचाव करण्यासाठी आणि तुझे शत्रू तुझ्या हाती देण्यासाठी छावणीत फिरत असतो, म्हणून तू आपली छावणी पवित्र ठेवावीस, नाहीतर तुझ्यामध्ये एखादा अनुचित प्रकार पाहून तो तुझ्यापासून निघून जाईल.


तो दुर्ग आहे; त्याची कृती परिपूर्ण आहे; त्याचे सर्व मार्ग न्यायाचे आहेत; तो विश्वसनीय देव आहे, त्याच्या ठायी अनीती नाही; तो न्यायी व सरळ आहे.


जो तोंडदेखला न्याय करत नाही, तर ज्याच्या-त्याच्या कृत्यांप्रमाणे न्याय करतो त्याला जर तुम्ही ‘पिता म्हणून हाक मारता,’ तर आपल्या प्रवासाच्या काळात भिऊनच वागा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan