Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




सफन्या 3:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 त्या समयी मी तुम्हांला आणून एकत्र करीन; तुमच्या डोळ्यांदेखत तुमचा बंदिवास उलटवीन; तेव्हा पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांत तुमचा लौकिक व गौरव होईल असे मी करीन.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 त्यावेळी, मी तुला परत आणीन आणि मी तुम्हा सर्वांना परत एकत्र करीन, मी तुला पृथ्वीवरील सर्व लोकांमध्ये प्रसिध्दी व कीर्ती मिळवून देईन. तुझ्या डोळ्यांदेखत मी तुझे भविष्य पुनर्संचयित करीन.” असे परमेश्वर म्हणतो!

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 त्यावेळी मी तुम्हा सर्वांना एकत्र गोळा करेन; त्यावेळी मी तुम्हाला घरी परत आणेन. जेव्हा मी तुमची संपन्नता तुम्हाला परत देईन तेव्हा पृथ्वीवरील सर्व लोकांमध्ये, स्वतःच्या दृष्टीसमोर मी तुम्हाला गौरव व प्रशंसा बहाल करेन,” असे याहवेह म्हणतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




सफन्या 3:20
32 Iomraidhean Croise  

त्यांचा मार्ग अंधकारमय व निसरडा होवो, परमेश्वराचा दूत त्यांच्या पाठीस लागो.


त्यांचे माझ्या गृहात व माझ्या कोटाच्या आत कन्यापुत्रांहून श्रेष्ठ असे स्मारक मी स्थापीन व त्यांचे नाव राखीन; सर्वकाळ राहील असे त्यांचे नाव मी करीन, ते नाहीसे होणार नाही.


घालवून दिलेल्या इस्राएल लोकांस एकत्र करणार्‍या प्रभू परमेश्वराचे हे वचन आहे की एकत्र केलेल्या इस्राएलांखेरीज इतरांनाही एकत्र करून मी त्यांच्यात मिळवीन.”


तू टाकलेली व द्वेषलेली होतीस; तुझ्याकडे कोणी जात-येत नसत; तरी तुला सर्वकाळचे भूषण, पिढ्यानपिढ्यांचा आनंद अशी मी करीन.


अन्य राष्ट्रांत त्यांचा वंश, देशोदेशीच्या लोकांत त्यांची संतती प्रख्यात होईल; परमेश्वराने आशीर्वाद दिलेली ती ही असे त्यांना पाहणारे कबूल करतील.”


पवित्र लोक, परमेश्वराने उद्धरलेले लोक, असे त्यांना म्हणतील व तू निगा केलेली व न टाकलेली नगरी आहेस असे म्हणतील.


आणि तो यरुशलेम सुस्थित करून ते पृथ्वीला प्रशंसाविषय करीपर्यंत त्याला चैन पडू देऊ नका.


कारण मी नवे आकाश व नवी पृथ्वी निर्माण करीन; ती जशी माझ्यासमोर टिकून राहतील तसा तुमचा वंश व तुमचे नाव टिकून राहील असे परमेश्वर म्हणतो.


मी ज्या ज्या देशात आपला कळप हाकून लावला त्या त्या देशातून त्याचा अवशेष जमा करीन व त्यांना त्यांच्या मेंढवाड्यात परत आणीन, म्हणजे ते फलद्रूप होऊन वृद्धी पावतील.


परमेश्वर म्हणतो, मी तुम्हांला पावल्यावर तुमचा बंदिवास उलटवीन आणि सर्व लोकांत व ज्या स्थळी मी तुम्हांला हाकून लावले आहे तेथून तुम्हांला एकत्र करीन, असे परमेश्वर म्हणतो; आणि ज्या स्थळाहून मी तुम्हांला पकडून न्यायला लावले त्या स्थळी तुम्हांला परत आणीन.


कारण परमेश्वर म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत की माझे लोक इस्राएल व यहूदा ह्यांचा बंदिवास मी उलटवीन; मी जो देश त्यांच्या पूर्वजांना दिला होता त्यात त्यांना परत आणीन व ते त्याचा ताबा घेतील, असे परमेश्वर म्हणतो.”


आणि ह्या नगराचे नाव पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांसमोर माझ्या आनंदास, स्तुतीस व सन्मानास कारण होईल; त्यांचे मी जे कल्याण करीन त्याविषयी ती ऐकतील; आणि मी त्यांना हित व शांती प्राप्त करून देईन; ह्या सर्वांमुळे ती राष्ट्रे भयभीत होतील व थरथर कापतील.


मी सदोम व तिच्या कन्या ह्यांचा आणि शोमरोन व तिच्या कन्या ह्यांचा व त्यांच्यामध्ये तुझ्या धरून नेलेल्या लोकांचाही बंदिवास फिरवीन;


प्रभू परमेश्वर म्हणतो, इस्राएल घराणे ज्या ज्या राष्ट्रांत पांगले आहे त्यांतून मी त्यांना एकत्र करीन आणि परराष्ट्रांदेखत त्यांच्या ठायी पवित्र ठरेन; मग जो देश मी आपला सेवक याकोब ह्याला दिला त्यात ते वस्ती करतील.


मी हरवलेल्यांना शोधीन, हाकून दिलेल्यांना परत आणीन, घायाळांना शोधीन, हाकून दिलेल्यांना परत आणीन, घायाळांना पट्टी बांधीन, रोग्यांना बळ देईन; पण लठ्ठ व बलिष्ठ ह्यांचा मी नाश करीन; त्यांना मी यथान्याय चारीन.


म्हणून संदेश देऊन त्यांना सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या लोकांनो, पाहा, मी तुमच्या कबरा उघडीन, तुम्हांला आपल्या कबरांतून बाहेर काढून इस्राएल देशात आणीन.


तू त्यांना सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, इस्राएलवंशज ज्या राष्ट्रांत गेले आहेत त्यांतून मी त्यांना काढून व चोहोंकडून गोळा करून स्वदेशी नेईन;


देशातले सर्व लोक त्यांना पुरतील; मी आपला महिमा प्रकट करीन त्या दिवशी हे त्यांच्या कीर्तीला कारण होईल, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.


मी त्यांना राष्ट्रांमध्ये हाकून देऊन पुन्हा मीच त्यांना त्यांच्या देशात परत आणले; त्यांच्यापैकी कोणालाही ह्यापुढे मी परदेशात राहू देणार नाही, हे पाहून मी परमेश्वर आहे असे ते समजतील;


पाहा, त्या दिवसांत मी यहूदा व यरुशलेम ह्यांचा बंदिवास फिरवीन;


मी आपल्या सर्व इस्राएल लोकांचा बंदिवास पालटीन; ते ओसाड झालेली नगरे बांधतील व त्यांत वस्ती करतील; ते द्राक्षीचे मळे लावतील व त्यांचा द्राक्षारस पितील; ते बाग लावतील व त्यांची फळे खातील.


हे याकोबा, मी तुम्हां सर्वांना निश्‍चये एकत्र करीन, इस्राएलाचे अवशेष मी निश्‍चये जमा करीन; मी त्यांना बस्राच्या मेंढरांप्रमाणे एकत्र करीन; लोकसमुदाय मोठा असल्यामुळे कुरणांमधल्या कळपांप्रमाणे ते गजबजतील.


मी लंगड्यांना अवशेष म्हणून ठेवीन, दूर घालवलेल्यांचे मी समर्थ राष्ट्र करीन; आणि येथून पुढे सदासर्वकाळ परमेश्वर सीयोन डोंगरात त्यांच्यावर राज्य करील.


तो प्रदेश यहूदी घराण्याच्या अवशेषासाठी होईल; तेथे ते आपली मेंढरे चारतील; अष्कलोनाच्या घरातून ते संध्याकाळी बिर्‍हाडास राहतील. कारण परमेश्वर त्यांचा देव त्यांना भेट देईल व त्यांचा बंदिवास उलटवील.


पाहा, त्या समयी तुला पिडणार्‍या सर्वांचा मी समाचार घेईन. जी लंगडी आहे तिला मी वाचवीन, हाकून दिलेलीस परत आणीन, अखिल पृथ्वीवर ज्यांची अप्रतिष्ठा झाली आहे त्यांची प्रशंसा व नावलौकिक व्हावा असे मी करीन.


हे यहूदाच्या घराण्या व इस्राएलाच्या घराण्या, असे होईल की, जे तुम्ही राष्ट्रांत शापरूप होता त्या तुमचा उद्धार मी करीन व तुम्ही आशीर्वादरूप व्हाल; भिऊ नका, तुमचे हात दृढ होवोत.”


मी त्यांना घेऊन येईन व ते यरुशलेमेत वस्ती करतील आणि सत्याने व न्यायीपणाने ते माझे लोक होतील व मी त्यांचा देव होईन.”


सर्व राष्ट्रे तुम्हांला धन्य म्हणतील; कारण तुमची भूमी मनोरम होईल, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


आणि परमेश्वरानेही आज मान्य केले आहे की, ‘तुला सांगितल्याप्रमाणे तू माझी खास प्रजा झाला आहेस; तू माझ्या सर्व आज्ञा पाळ,


म्हणजे मी निर्माण केलेल्या सर्व राष्ट्रांपेक्षा प्रशंसा, नावलौकिक आणि सन्मान ह्या बाबतीत तुला श्रेष्ठ करीन आणि माझ्या म्हणण्याप्रमाणे तू परमेश्वर आपला देव ह्याची पवित्र प्रजा होशील.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan