Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




सफन्या 3:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 तिने वचन मानले नाही, बोध घेतला नाही; परमेश्वरावर श्रद्धा ठेवली नाही; ती आपल्या देवासमीप आली नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 तिने परमेश्वराचे वचन ऐकले नाही व त्याची शिकवणही ग्रहण केली नाही. तीने परमेश्वरावर भरवसा ठेवला नाही व ती तिच्या देवाला शरणही गेली नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 ती कोणाचीही आज्ञा पाळत नाही, ती कोणतीही सुधारणा स्वीकारत नाही. ती याहवेहवर विश्वास ठेवीत नाही, ती तिच्या परमेश्वराच्या समीप जात नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




सफन्या 3:2
30 Iomraidhean Croise  

पण त्यांनी आज्ञाभंग करून तुझ्याविरुद्ध बंड केले; तुझे नियमशास्त्र त्यांनी पाठीमागे फेकून दिले; तुझ्याकडे त्यांनी पुन्हा वळावे असे ज्या तुझ्या संदेष्ट्यांनी निक्षून सांगितले त्यांना त्यांनी जिवे मारले आणि तुला संतप्त केले.


दुर्जन नाक वर करून म्हणतो, “तो झडती घेणार नाही;” “देव नाही” असेच त्याचे सर्व विचार असतात.


तू तर शिस्तीचा द्वेष करतोस, माझी वचने मागे झुगारून देतोस.


माझ्याविषयी म्हटले तर देवाजवळ जाणे ह्यातच माझे कल्याण आहे; मी प्रभू परमेश्वराला आपले आश्रयस्थान केले आहे, ह्यासाठी की, मी तुझी सर्व कृत्ये जाहीर करावीत.


कारण त्यांनी देवावर विश्वास ठेवला नाही, आणि त्याने सिद्ध केलेल्या तारणावर भरवसा ठेवला नाही.


परमेश्वराचे भय हे ज्ञानाचा प्रारंभ1 होय, पण मूर्ख लोक ज्ञान व शिक्षण तुच्छ मानतात.


आणि मग तू येणेप्रमाणे म्हणशील : “मी शिक्षणाचा द्वेष कसा केला? माझ्या अंत:करणाने शासन कसे तुच्छ मानले?


तुम्ही अधिकाधिक फितून मार का खात राहता? हरएक मस्तक व्यथित झाले आहे, हरएक हृदय ग्लान झाले आहे.


प्रभू म्हणाला आहे की, “हे लोक माझ्यासमीप येऊन आपल्या तोंडच्या शब्दांनी माझा सन्मान करतात, तरी माझ्यापासून आपले अंतःकरण दूर राखतात, आणि हे माझे भय बाळगतात ते केवळ मनुष्यांनी पढवलेल्या आज्ञेप्रमाणे बाळगतात.


जे साहाय्यार्थ खाली मिसर देशात जातात व घोड्यांवर भिस्त ठेवतात, आणि रथ बहुत आहेत व घोडेस्वार फार बळकट आहेत म्हणून त्यांवर भरवसा ठेवतात, पण इस्राएलाच्या पवित्र प्रभूकडे लक्ष देत नाहीत, परमेश्वराचा शोध करीत नाहीत, त्यांना हायहाय!


हे याकोबा, तू तर माझा धावा केला नाहीस; हे इस्राएला, माझा तुला कंटाळा आला.


पूर्वेकडून अराम्यांना व पश्‍चिमेकडून पलिष्ट्यांना उठवील; ते तोंड पसरून इस्राएलास गिळून टाकतील. इतके झाले तरी त्याचा क्रोध शमला नाही, त्याचा हात अजून उगारलेला आहे.


परमेश्वर म्हणतो, हा तुझा वाटा, माझ्याकडून तुला मापून दिलेला वतनभाग आहे; कारण तू मला विसरलीस व खोट्यावर भरवसा ठेवलास.


तुमच्या पुत्रांना मी ताडन केले ते व्यर्थ, त्याने ते शुद्धीवर आले नाहीत; फाडणार्‍या सिंहाप्रमाणे तुमच्याच तलवारीने तुमच्या संदेष्ट्यांना खाऊन टाकले आहे.


तुझी सुखसोय असता मी तुझ्याबरोबर बोललो, तेव्हा तू म्हणालीस, ‘मी ऐकणार नाही.’ माझे म्हणणे ऐकू नये ही लहानपणापासून तुला खोड आहे.


त्यांनी माझ्याकडे तोंड नव्हे तर पाठ फिरवली; मी त्यांना बोध केला, मोठ्या निकडीने मी त्यांना शिकवत गेलो तरी ते बोधाकडे कान देईनात.


“सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव परमेश्वर असे म्हणतो, यहूदाचे लोक व यरुशलेमकर ह्यांना जाऊन सांग की माझी वचने ऐकण्याचा बोध तुम्ही का घेत नाही?”


ह्यास्तव परमेश्वर सेनाधीश देव, इस्राएलाचा देव म्हणतो, पाहा, मी यहूदा व सर्व यरुशलेमकर ह्यांच्यावर जे सर्व अरिष्ट आणीन म्हणून बोललो ते आणीन; कारण मी त्यांच्याबरोबर बोललो असता त्यांनी ते ऐकले नाही, मी त्यांना हाक मारली असता त्यांनी उत्तर दिले नाही.”


हे परमेश्वरा, तुझे नेत्र सत्याकडे नाहीत काय? तू त्यांना ताडन करतोस तरी ते दु:खित होत नाहीत; तू त्यांना क्षीण करतोस तरी ते ताळ्यावर येत नाहीत, ते आपली मुखे वज्रापेक्षा कठीण करतात, ते वळत नाहीत.


“मानवपुत्रा, ह्या भूमीस सांग, क्रोधदिनी शुद्धी न पावलेली व पर्जन्यवृष्टी न झालेली भूमी तू आहेस.


तुझी अशुद्धता पाहावी तर ती भयंकर आहे; मी तुला स्वच्छ करू पाहिले तरी तू स्वच्छ झाली नाहीस; तुझ्यावरील माझ्या संतापाची तृप्ती झाल्यावाचून तू शुद्ध व्हायची नाहीस.


जे परमेश्वरापासून पराङ्मुख झाले आहेत, ज्यांनी परमेश्वराचे चरण धरले नाहीत व त्याचा शोध केला नाही, त्यांना मी नष्ट करीन.”


प्रत्येक परमेश्वरप्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीतिशिक्षण ह्यांकरता उपयोगी आहे,


म्हणून आपली हृदये सिंचित झाल्याने दुष्ट भावनेपासून मुक्त झालेले व निर्मळ पाण्याने शरीर धुतलेले असे आपण खर्‍या अंतःकरणाने व विश्वासाच्या पूर्ण खातरीने जवळ येऊ.


Lean sinn:

Sanasan


Sanasan