Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




सफन्या 3:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 त्या दिवशी यरुशलेमेस म्हणतील : “हे सीयोने, भिऊ नकोस, तुझे हात गळू देऊ नकोस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 त्या दिवशी ते यरूशलेमेला असे म्हणतील, “घाबरू नको! हे सियोना तुझे हात लटपटू देऊ नको.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 त्या दिवशी ते यरुशलेमला असे म्हणतील, “हे सीयोना, भिऊ नकोस, तुझे बाहू दुर्बल होऊ देऊ नकोस.

Faic an caibideil Dèan lethbhreac




सफन्या 3:16
21 Iomraidhean Croise  

पाहा, तू बहुत जनांस शिक्षण दिले आहेस, आणि दुर्बळ हात सबळ केले आहेत.


त्या दिवशी ते म्हणतील, “पाहा, हा आमचा देव! ह्याची आम्ही आशा धरून राहिलो; तो आमचे तारण करील. हाच परमेश्वर आहे. ह्याची आम्ही आशा धरून राहिलो. त्याने केलेल्या तारणाने आपण उल्हास व हर्ष पावू.”


सीयोनेस सुवार्ता सांगणारे,1 उंच डोंगरावर चढ; यरुशलेमेस सुवार्ता सांगणारे,1 आपला स्वर जोराने उंच कर; कर उंच, भिऊ नकोस; यहूदाच्या नगरांना म्हण, “तुमचा देव पाहा.”


तू भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे, घाबरू नकोस, कारण मी तुझा देव आहे; मी तुला शक्ती देतो, मी तुझे साहाय्यही करता, मी आपल्या नीतिमत्तेच्या उजव्या हाताने तुला सावरतो.


परमेश्वर तुझा निर्माणकर्ता, गर्भस्थानापासून तुझा घडणारा व साहाय्यकर्ता असे म्हणतो; हे माझ्या सेवका याकोबा, माझ्या निवडलेल्या यशुरूना, भिऊ नकोस.


भिऊ नकोस, तू लज्जित होणार नाहीस; घाबरू नकोस, तू फजीत होणार नाहीस; तुझ्या तारुण्यातील अप्रतिष्ठेचा तुला विसर पडेल; तुला आपल्या वैधव्याच्या बट्ट्याचे स्मरण ह्यापुढे होणार नाही.


अगे भूमी, भिऊ नकोस; उल्लास व हर्ष कर, कारण परमेश्वराने महत्कृत्ये केली आहेत.


हे यहूदाच्या घराण्या व इस्राएलाच्या घराण्या, असे होईल की, जे तुम्ही राष्ट्रांत शापरूप होता त्या तुमचा उद्धार मी करीन व तुम्ही आशीर्वादरूप व्हाल; भिऊ नका, तुमचे हात दृढ होवोत.”


त्याप्रमाणे ह्या दिवसांत यरुशलेमेचे व यहूदाच्या घराण्याचे हित करण्याचे मी योजले आहे; भिऊ नका;


दुसर्‍या दिवशी सणास आलेले पुष्कळ लोक येशू यरुशलेमेस येत आहे असे ऐकून


म्हणून आमच्यावर झालेल्या दयेनुसार ही सेवा आम्हांला देण्यात आली आहे, म्हणून आम्ही धैर्य सोडत नाही.


चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये; कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल.


म्हणून मी विनंती करतो की, तुमच्याप्रीत्यर्थ मला होणार्‍या क्लेशांमुळे तुम्ही खचू नये; ते तुम्हांला भूषणावह आहेत.


म्हणून ‘लोंबकळणारे हात व लटपटणारे गुडघे सरळ करा,’


तुझ्या अंगी धीर आहे. माझ्या नावामुळे तू दुःख सोसले आहेस आणि तू खचून गेला नाहीस.


Lean sinn:

Sanasan


Sanasan