Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




सफन्या 3:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 परमेश्वराने तुझा दंड दूर केला आहे, तुझ्या शत्रूचे निवारण केले आहे; इस्राएलाचा राजा परमेश्वर तुझ्यामध्ये आहे; तुला पुन्हा अरिष्टाची भीती प्राप्त होणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 कारण परमेश्वराने तुझा दंड दूर केला आहे; त्यांने तुझ्या शत्रूला घालवून दिले आहे! इस्राएलचा राजा, परमेश्वर तुझ्यामध्ये आहे. आता तुला कोणत्याही अरिष्टाची भीती बाळगण्याचे कारण नाही!

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 कारण याहवेहने तुझी शिक्षा काढून घेतली आहे, तुझ्या शत्रूचे सैन्य परत गेले आहे. याहवेह, इस्राएलचे राजा तुझ्यासह आहेत; यापुढे हानीचे भय तू बाळगणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




सफन्या 3:15
48 Iomraidhean Croise  

ती गर्भवती होऊन तिला मुलगा झाला; ती म्हणाली, “देवाने माझी अप्रतिष्ठा दूर केली आहे”;


इस्राएल आपल्या निर्माणकर्त्याच्या ठायी आनंद करो; सीयोनेची मुले आपल्या राजाच्या ठायी उल्लास पावोत.


परमेश्वराचे भय शुद्ध आहे, ते सर्वकाळ टिकणारे आहे; परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत, ते सर्वथैव न्याय्य आहेत.


तू आपला सर्व क्रोध आवरला आहेस; तू आपल्या कोपाची तीव्रता सोडून दिली आहेस.


अगे सीयोननिवासिनी, जयघोष कर, गजर कर; इस्राएलाचा पवित्र प्रभू तुझ्या ठायी थोर आहे.”


तो मृत्यू कायमचा नाहीसा करतो; प्रभू परमेश्वर सर्वांच्या चेहर्‍यावरील अश्रू पुसतो; तो अखिल पृथ्वीवरून आपल्या लोकांची अप्रतिष्ठा दूर करतो, कारण परमेश्वर हे बोलला आहे.


कारण परमेश्वर आमचा न्यायाधीश आहे, परमेश्वर आमचा नियंता आहे, परमेश्वर आमचा राजा आहे; तो आम्हांला तारील.


मुक्त केलेले परमेश्वराचे लोक परत येतील; ते जयजयकार करीत सीयोनेत येतील; त्यांच्या मस्तकी अक्षय आनंद राहील; ते आनंद व हर्ष पावतील, दु:ख व उसासे पळ काढतील.


तुझा प्रभू परमेश्वर, आपल्या लोकांचा कैवारी जो तुझा देव, तो म्हणतो, “पाहा, झोकांडे देणारा प्याला, माझ्या क्रोधाचा कटोरा तुझ्या हातातून मी काढून घेतो; ह्यापुढे तू तो पिणार नाहीस;


यरुशलेमेच्या उद्ध्वस्त झालेल्या स्थलांनो, आनंदघोष करा, सर्व मिळून गा; कारण परमेश्वराने आपल्या लोकांचे सांत्वन केले आहे, त्याने यरुशलेमेस उद्धरले आहे.


नीतिमत्तेने तू खंबीर होशील, जाचापासून दूर राहशील, कारण तुला भीतीच उरणार नाही; तू धाकापासून दूर राहशील, तो तुझ्याजवळ येणार नाही;


ह्यापुढे तुझ्या देशात कसलाही जुलूम अगर तुझ्या सीमांच्या आत उजाडी व नाश ह्यांचे नावही ऐकू येणार नाही; तारण माझा कोट व कीर्ती माझी वेस आहे असे तू म्हणशील.


मी यरुशलेमेविषयी उल्लास पावेन, माझ्या लोकांविषयी आनंद पावेन, तिच्यात शोकाचा व आकांताचा शब्द पुन्हा ऐकू येणार नाही.


पाहा, दूर देशातून माझ्या लोकांच्या कन्येची आरोळी ऐकू येते की, “सीयोनेत परमेश्वर नाही ना? त्यात तिचा राजा नाही ना?” “त्यांनी आपल्या मूर्तींनी व परक्या खोट्या दैवतांनी मला का चिडवले आहे?”


‘ही दोन राष्ट्रे, हे दोन देश माझे आहेत, आपण त्यांचा ताबा घेऊ,’ असे तेथे परमेश्वर असता तू म्हणालास,


इत:पर मी तुला राष्ट्रांची निंदा ऐकवणार नाही, राष्ट्रांनी केलेली अप्रतिष्ठा तुला सोसावी लागणार नाही, तू आपल्या राष्ट्रांपुढे अडथळा ठेवणार नाहीस, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”


मी आपले मुख ह्यापुढे त्यांच्यापासून लपवणार नाही; कारण मी आपल्या आत्म्याची इस्राएल घराण्यावर वृष्टी केली आहे, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”


ह्या प्रकारे रहदारीचे एकंदर क्षेत्र अठरा हजार हात असावे; ह्या नगराचे नाव येथून पुढे याव्हे-शाम्मा (तेथे परमेश्वर आहे) असे पडेल.”


“सीयोनेवर, माझ्या पवित्र डोंगरावर राहणारा परमेश्वर तुमचा देव मी आहे हे तुम्हांला कळेल, तेव्हा यरुशलेम पवित्र स्थळ होईल; ह्यापुढे परके त्यातून येणार-जाणार नाहीत.


मी त्यांना त्यांच्या भूमीत रुजवीन व जी भूमी मी त्यांना दिली आहे तिच्यातून त्यांना ह्यापुढे उपटून टाकण्यात येणार नाही,” असे परमेश्वर तुझा देव म्हणतो.


जी मला म्हणाली होती की, “तुझा देव परमेश्वर कोठे आहे?” ती माझी वैरीण ते पाहील व ती लज्जेने व्याप्त होईल; माझे डोळे तिला पाहतील, तिला रस्त्यांतल्या चिखलासारखे तुडवतील.


लबानोनावर केलेला जुलूम तुला घेरील, जनावरांचा झालेला नाश तुला घाबरवील; माणसांचा रक्तपात आणि भूमीवर, शहरांवर व त्यांतील सर्व रहिवाशांवर केलेला जुलूम ह्यामुळे असे होईल.


तू पुष्कळ राष्ट्रांना लुटले म्हणून सर्व अवशिष्ट लोक तुला लुटतील; माणसांचा रक्तपात आणि भूमीवर, शहरांवर व त्यांतील सर्व रहिवाशांवर केलेला जुलूम, ह्यामुळे असे होईल.


परमेश्वर तुझा देव, साहाय्य करणार्‍या वीरासारखा तुझ्या ठायी आहे; तो तुझ्याविषयी आनंदोत्सव करील; त्याचे प्रेम स्थिर राहील, तुझ्याविषयी त्याला उल्लास वाटून तो गाईल.


तिच्यामध्ये परमेश्वर न्यायी आहे; तो काही अन्याय करत नाही; रोज सकाळी तो आपला न्याय प्रकट करतो, चुकत नाही; अन्यायी लोकांना तर लाज कशी ती ठाऊक नाही.


त्या दिवशी असे होईल की सर्व राष्ट्रांना भारी होईल अशा पाषाणासारखे मी यरुशलेमेस करीन; जे कोणी तो उचलतील ते स्वतःला जखम करून घेतील; पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तिच्याविरुद्ध जमतील.


लोक त्यात वस्ती करतील; ह्यापुढे त्यावर शाप राहायचा नाही; तर ते निर्भय असे वसेल.


सीयोनकन्ये, जोराने आनंदाचा गजर कर; यरुशलेमकन्ये, गजर कर; पाहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे; तो न्यायी व यशस्वी आहे; तो लीन आहे; गाढवावर, गाढवीच्या पिलावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे.


नथनेल त्याला म्हणाला, “गुरूजी, आपण देवाचे पुत्र आहात, आपण इस्राएलाचे राजे आहात.”


“हे सीयोनेच्या कन्ये, भिऊ नकोस; पाहा, तुझा राजा गाढवीच्या शिंगरावर बसून येतो!” ह्या शास्त्रलेखाप्रमाणे हे घडले.


पिलाताने पाटी लिहून वधस्तंभावर लावली; तिच्यावर “यहूद्यांचा राजा नासोरी येशू” असे लिहिले होते.


मला स्वत: होऊन काही करता येत नाही; जसे मी ऐकतो तसा न्यायनिवाडा करतो; आणि माझा निवाडा यथार्थ आहे; कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे तर ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करायला पाहतो.


तेव्हा मी स्वर्गात मोठी वाणी ऐकली; ती म्हणाली, “आता आमच्या देवाने सिद्ध केलेले तारण, त्याचे सामर्थ्य व त्याचे राज्य आणि त्याच्या ख्रिस्ताचा अधिकार हे प्रकट झाले आहेत; कारण आमच्या बंधूंना दोष देणारा, आमच्या देवासमोर रात्रंदिवस त्यांच्यावर दोषारोप करणारा, खाली टाकण्यात आला आहे.


‘हे स्वर्गा’, आणि अहो पवित्र प्रेषितांनो व संदेष्ट्यांनो, तिच्याविषयी ‘आनंद करा;’ कारण देवाने तिला दंड करून तुम्हांला ‘न्याय दिला आहे.”’


त्याच्या वस्त्रावर व त्याच्या मांडीवर राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू हे नाव लिहिलेले आहे.


ह्यामुळे ते देवाच्या राजासनासमोर आहेत; ते अहोरात्र त्याच्या मंदिरात त्याची सेवा करतात आणि ‘राजासनावर बसलेला’ त्यांच्यावर आपला मंडप विस्तृत करील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan