Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




सफन्या 3:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 कूशाच्या नद्यांपलीकडून ते माझ्या उपासकांना आणतील, ते माझ्या पांगलेल्यांची कन्या मला अर्पण म्हणून आणतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 कूश देशातील नदीपलीकडचे माझे आराधक व माझी विखुरलेली माणसे, मला अर्पणे घेऊन येतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 कूश देशाच्या नद्यांपलीकडून माझे उपासक, माझे विखुरलेले लोक माझ्यासाठी अर्पणे आणतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




सफन्या 3:10
17 Iomraidhean Croise  

मिसर देशातून सरदार येतील; कूश आपले हात देवाकडे पसरण्याची त्वरा करील.


त्या दिवशी असे होईल की अश्शूर, मिसर, पथ्रोस, कूश, एलाम, शिनार, हमाथ व समुद्रतीरींचे प्रदेश येथून प्रभू आपल्या लोकांचा अवशेष आपल्या हाताने खरेदी करून दुसर्‍यांदा सोडवील.


तो राष्ट्रांसाठी निशाण उभारील, व पृथ्वीच्या चार्‍ही दिशांकडून इस्राएलातल्या घालवून दिलेल्यांना एकत्र करील व यहूदातल्या परागंदा झालेल्यांना गोळा करील.


अरे, कूशातील नद्यांपलीकडल्या फडफडणार्‍या पंखांच्या देशा!


त्या वेळेस उंच बांध्याचे व तुळतुळीत अंगाचे लोक, मुळापासून भयंकर, हुकूमत चालवणारे, पादाक्रांत करणारे, ज्या राष्ट्राची भूमी नद्यांनी विभागलेली आहे, त्या लोकांकडून सेनाधीश परमेश्वराचे नाम दिलेल्या स्थळी म्हणजे सीयोन डोंगरावर सेनाधीश परमेश्वराला नजराणे अर्पण करण्यात येतील.1


कारण सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत राष्ट्रांमध्ये माझे नाव थोर आहे, माझ्या नावाप्रीत्यर्थ प्रत्येक स्थळी धूप जाळतात व निर्दोष बली अर्पण करतात; कारण माझे नाव राष्ट्रांमध्ये थोर आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


ह्यामुळे यहूदी आपसांत म्हणाले, “हा असा कोठे जाणार आहे की तो आपल्याला सापडणार नाही? तो हेल्लेणी लोकांत पांगलेल्यांकडे जाणार आणि हेल्लेण्यांस शिकवणार काय?


मी पुष्कळ वर्षांनी आपल्या लोकांना दानधर्म करण्यास व यज्ञार्पणे वाहण्यास आलो.


मग तो उठला व निघाला; आणि पाहा, एक कूशी1 षंढ, कूशी1 लोकांची राणी कांदके हिचा मोठा अधिकारी होता व त्याच्या हाती तिचे सर्व भांडार होते; तो यरुशलेमेत उपासनेसाठी आला होता.


ती कृपा अशी की, मी परराष्ट्रीयांसाठी येशू ख्रिस्ताचा सेवक होऊन देवाच्या सुवार्तेचा याजक व्हावे; अशासाठी की, परराष्ट्रीय हेच अर्पण पवित्र आत्म्याने शुद्ध होऊन मान्य व्हावे.


पंत, गलतिया, कप्पदुकिया, आशिया व बिथुनिया ह्यांत पांगलेल्या (यहूदी) लोकांतील,


Lean sinn:

Sanasan


Sanasan