Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




सफन्या 3:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 ती बंडखोर, भ्रष्ट व बलात्कारी नगरी, तिला धिक्कार असो!

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 त्या बंडखोर नगरीला हाय हाय! ती हिंसेनी भरलेली नगरी कशी अशुद्ध झाली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 हे जुलमी लोकांच्या नगरी, विद्रोही व भ्रष्ट नगरी, तुला धिक्कार असो!

Faic an caibideil Dèan lethbhreac




सफन्या 3:1
17 Iomraidhean Croise  

ह्यामुळे इस्राएलाचा पवित्र प्रभू म्हणतो, “तुम्ही ह्या वचनाचा धिक्कार करून बलात्कार व कुटिलाचार ह्यांवर भिस्त ठेवता व अवलंबून राहता;


कारण सेनाधीश परमेश्वराचा द्राक्षमळा म्हणजे इस्राएलाचे घराणे; त्यातील त्याची आवडीची लागवड म्हणजे यहूदाचे लोक; त्याने न्याय्यत्वाची अपेक्षा केली तर अपहार, नीतिमत्तेची अपेक्षा केली तर आक्रोश आढळून आला.


नीतिनियमांचे उल्लंघन, परमेश्वराचा अव्हेर, आमच्या देवास अनुसरण्यास माघार घेणे, छलसूचक व असत्य भाषण करणे, लबाडी मनात योजून ती बोलून दाखवणे, ही ती आहेत.


त्यांची जाळी पांघरण्याच्या उपयोगी नाहीत, ह्या आपल्या विणकामाने त्यांना स्वत:स झाकता येत नाही; त्यांची कामे केवळ उपद्रवजनक होत; त्यांच्या हातून बलात्काराची कामे होतात.


तरीपण केवळ निर्दोष्यांचा रक्तपात, जुलूमजबरी व अन्याय्य धनप्राप्ती ह्यांकडे तुझे डोळे व मन लागले आहे.”


तरी ह्या लोकांचे हृदय हट्टी व फितुरी आहे; ते फितून निघून गेले आहेत.


कारण सेनाधीश परमेश्वर म्हणाला आहे की : “झाडे तोडून यरुशलेमेसमोर मोर्चा रचा. पारिपत्य करायचे ते ह्याच नगराचे; त्याच्यात जुलूमच जुलूम माजला आहे.


झर्‍यांतून जसे नित्य नवे पाणी येते तशी त्यात नित्य नवी दुष्टता घडते; त्याच्या ठायी बलात्कार व लुटालूट ह्यांचा गोंगाट ऐकू येतो; नित्य माझ्यासमोर रोग आणि जखमा आहेत.


देशातील लोक बलात्कार व चोरी करतात. ते दुर्बल व दरिद्री ह्यांना चिरडून टाकतात आणि परदेशीयांवर अन्याय व जुलूम करतात.


तुझ्या ठायी लोक आईबापांना तुच्छ मानतात, तुझ्या ठायी ते परदेशीयांवर जुलूम करतात, तुझ्या ठायी ते अनाथ व विधवा ह्यांना जाचतात.


तू व्यभिचार करण्यासाठी अन्य राष्ट्रांच्या मागे लागलीस व त्यांच्या मूर्तींनी आपणांस विटाळलेस म्हणून हे सर्व तुला प्राप्त होईल.


त्याचा चुनाळ व पिसे काढून वेदीच्या पूर्वेस राख टाकण्याच्या ठिकाणी फेकून द्यावीत.


अश्दोदातील महालातून व मिसर देशातील महालातून असे जाहीर करून सांगा : “शोमरोनाच्या डोंगरावर जमा व्हा; त्यामध्ये केवढी दंगल चालली आहे ती पाहा, त्यांच्यात काय जुलूम होत आहे तो पाहा.”


“शोमरोन डोंगरावर असणार्‍या बाशानाच्या गाईंनो, ज्या तुम्ही दीनांना नाडता, गरिबांना ठेचता व आपल्या धन्यांना म्हणता, ‘आणा, आम्हांला पिऊ द्या!’ त्या तुम्ही हे वचन ऐका :


ते शेतांचा लोभ धरून ती हरण करतात, घरांचा लोभ धरून ती हस्तगत करतात; असे ते माणसावर व त्याच्या घरावर, माणसावर व त्याच्या वतनावर बलात्कार करतात.


आणि विधवा, अनाथ, परके व निराश्रित ह्यांच्यावर जुलूम करू नका व आपल्या भावाला इजा करण्याचे मनात आणू नका.”


मी न्याय करायला तुमच्याकडे येईन; आणि जादूगार, व्यभिचारी, खोटे साक्षी ह्यांच्याविरुद्ध आणि मजुरांची मजुरी अडकवून ठेवणारे, विधवा व अनाथ ह्यांच्यावर जुलूम करणारे, आणि मला न भिता परक्याला न्याय मिळू न देणारे ह्यांच्याविरुद्ध साक्ष देण्याची मी त्वरा करीन.


Lean sinn:

Sanasan


Sanasan