Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




सफन्या 2:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 म्हणून सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, आपल्या जीविताची शपथ वाहून म्हणतो, “मवाब सदोमासारखे निश्‍चये होईल, अम्मोन वंशज गमोर्‍यासारखे होतील; खाजकुयरीचे वतन व मिठागर ही सर्वकाळ वैराण होतील; माझ्या लोकांचे अवशिष्ट जन त्यांना लुटतील; माझ्या राष्ट्रांचे अवशिष्ट राहिलेले लोक त्यांचा ताबा घेतील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 ह्यास्तव सैन्याचा परमेश्वर, इस्राएलाचा प्रभू असे म्हणतो, “मी जिवंत आहे, म्हणून मवाब सदोमासारखा होईल व अम्मोनवासी गमोरा यांसारखे होतील. ते एक निरुपयोगी ठिकाण व मिठाच्या खांचा व कायमचे ओसाड असे होतील. पण माझ्या लोकांतील राहिलेले त्यांना लूटतील, आणि माझ्या राष्ट्रातले शेष त्यांचे वतन पावेल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 म्हणून माझ्या जिवाची शपथ,” इस्राएलचे परमेश्वर, सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात. “निश्चितच मोआब हा सदोमासारखा, अम्मोनी गमोरासारखा होईल तण वाढलेले ठिकाण व मिठाची आगरे कायमची ओसाड ठिकाणे होतील. माझे अवशिष्ट लोक त्यांची लूट करतील; माझे अवशिष्ट राष्ट्र त्यांच्या भूमीचे वारस बनतील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




सफन्या 2:9
27 Iomraidhean Croise  

ते पश्‍चिमेकडे पलिष्ट्यांच्या खांद्यावर (खालाटीवर) झडप घालतील; ते एकत्र होऊन पूर्वदेशीयांना लुटतील; अदोम व मवाब ह्यांना हस्तगत करतील; आणि अम्मोनी त्यांना वश होतील.


परमेश्वराचा हात ह्या डोंगरावर राहील, व जसे शेणाच्या खाईतील रेंद्यात गवत तुडवतात तसे मवाबास जागच्या जागी तुडवतील.


आपले डोळे वर कर, चोहोकडे पाहा; ते सर्व एकत्र होऊन तुझ्याकडे येत आहेत. परमेश्वराचे वचन असे आहे की माझ्या जिवाची शपथ, तू खरोखर त्या सर्वांना अलंकाराप्रमाणे लेशील; नववधूप्रमाणे तू त्यांना आपल्या अंगावर घालशील.


राजेश्वर, सेनाधीश परमेश्वर, हे ज्याचे नाम तो म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, डोंगरामध्ये जसा ताबोर व समुद्राजवळ जसा कर्मेल तसा तो निश्‍चये येईल.


मवाबाविषयी : सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, “अरेरे! बिचारे नबो; ते ओसाड झाले आहे; किर्याथाईमाची फजिती झाली आहे, ते हस्तगत झाले आहे; मिस्गाबाची फजिती होऊन ते भंगले आहे;


अम्मोनी लोकांविषयी : परमेश्वर म्हणतो, “काय? इस्राएलास कोणी पुत्र, कोणी वारस नाही काय? तर मिलकोम दैवताने1 गाद का घेतले? त्याचे लोक गादाच्या नगरांतून का वस्ती करून आहेत?


परमेश्वर म्हणतो, सदोम व गमोरा व त्यांच्याजवळची गावे जशी उद्ध्वस्त झाली त्याप्रमाणे तेथे कोणी राहणार नाही; एकही मनुष्य तेथे बिर्‍हाड करणार नाही.


हासोर हे कोल्ह्याचे वसतिस्थान होईल, कायमचे ओसाड होईल; तेथे कोणी राहणार नाही, एकही मनुष्य तेथे बिर्‍हाड करणार नाही.”


परमेश्वर म्हणतो, सदोम व गमोरा व त्यांच्या आसपासची नगरे ह्यांचा देवाने समूळ नाश केला, तसाच तेथे कोणी राहणार नाही, एकही मनुष्य तेथे बिर्‍हाड करणार नाही.


परमेश्वर म्हणतो, “अम्मोनवंशजांचे तीन काय पण चार अपराध झाले, म्हणून मी शासन करण्यापासून माघार घेणार नाही; कारण त्यांनी आपली सीमा वाढवण्यासाठी गिलादाच्या गरोदर स्त्रियांना चिरले.


परमेश्वर म्हणतो, “मवाबाचे तीन काय पण चार अपराध झाले, म्हणून मी शासन करण्यापासून माघार घेणार नाही; कारण त्याने अदोमाच्या राजाची हाडे भाजून त्यांचा चुना केला.


गुरामेंढरांचे कळप, भूतलावरील सर्व पशू तिच्यामध्ये वसतील; पाणकोळी व साळू तिच्या खांबांच्या शिरोभागी राहतील; त्यांचे घुमणे खिडक्यांतून ऐकू येईल; उंबरठे ओस पडतील, कारण त्याने गंधसरूचे लाकूडकाम उघडे केले आहे,


तो प्रदेश यहूदी घराण्याच्या अवशेषासाठी होईल; तेथे ते आपली मेंढरे चारतील; अष्कलोनाच्या घरातून ते संध्याकाळी बिर्‍हाडास राहतील. कारण परमेश्वर त्यांचा देव त्यांना भेट देईल व त्यांचा बंदिवास उलटवील.


इस्राएलाचे अवशिष्ट जन काही अनिष्ट करणार नाहीत, लबाडी करणार नाहीत, त्यांच्या मुखात कपटी जिव्हा आढळायची नाही; ते चरतील व विश्रांती मिळवतील, कोणी त्यांना भेडसावणार नाही.”


सर्व मानवहो, परमेश्वरापुढे स्तब्ध व्हा, कारण तो आपल्या पवित्र निवासातून उठला आहे.


वास्तविक, मी जिवंत आहे आणि सारी पृथ्वी परमेश्वराच्या महिम्याने भरलेली आहे;


कारण शास्त्रात असे लिहिले आहे की, “प्रभू म्हणतो, ज्या अर्थी मी जिवंत आहे, त्या अर्थी माझ्यापुढे प्रत्येक गुडघा टेकेल, व प्रत्येक जिव्हा देवाचे स्तवन करील.”


तुमच्यानंतर येणारी पुढल्या पिढीतील तुमची मुले आणि दूर देशाहून येणारा परका ह्या देशाची विपत्ती आणि ह्यात परमेश्वराने पसरवलेले रोग पाहतील,


आणि हा सर्व देश गंधक व खार ह्यांनी इतका जळून गेला आहे की, येथे काही पेरणीकापणी होत नाही, येथे गवत उगवत नाही, पण परमेश्वराने कोपायमान व क्रोधयुक्त होऊन सदोम, गमोरा, अदमा व सबोईम ह्यांचा विध्वंस केला तसा ह्याचाही केला आहे, हे त्यांना दिसेल;


Lean sinn:

Sanasan


Sanasan