Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




सफन्या 2:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 “यवाबाने केलेली निंदा मी ऐकली आहे, अम्मोन-वंशजांनी केलेली निर्भर्त्सना मी ऐकली आहे, त्यांनी माझ्या लोकांची निंदा केली आहे आणि त्यांच्या सरहद्दीवर त्यांनी आपल्या मोठेपणाचा तोरा मिरवला आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 मवाबाने मारलेले टोमणे व अम्मोनाने वापरलेले अपशब्द मी ऐकले आहेत. त्यांनी माझ्या लोकांची निंदा केली व त्यांच्या सीमांचे उल्लंघन केले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 “मोआबी लोकांच्या अपमानास्पद गोष्टी आणि अम्मोनी लोकांचे टोमणे मी ऐकले आहेत, जे माझ्या लोकांचा उपहास करतात आणि त्यांच्या प्रदेशाविरुद्ध धमक्याही मी ऐकल्या आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




सफन्या 2:8
19 Iomraidhean Croise  

थोरल्या मुलीला मुलगा झाला, त्याचे नाव तिने मवाब असे ठेवले; आजमितीला जे मवाबी म्हणून आहेत त्यांचा हा मूळ पुरुष.


धाकटीलाही मुलगा झाला, तिने त्याचे नाव बेनअम्मी असे ठेवले; आजमितीला जे अम्मोनी म्हणून आहेत त्यांचा हा मूळ पुरुष.


मवाबाविषयीची देववाणी : एका रात्रीत मवाबाचे आर उजाड झाले, नष्ट झाले; एका रात्रीत मवाबाचे कीर उजाड झाले, नष्ट झाले.


मवाबाच्या गर्वाविषयी आम्ही ऐकून आहोत; तो मोठा अभिमानी आहे; त्याचा उन्मत्तपणा, त्याचा गर्व व त्याचा क्रोध ह्यांविषयी आम्ही ऐकून आहोत; त्याची बढाई निरर्थक आहे.


माझे लोक इस्राएल ह्यांना मी दिलेल्या वतनास जे माझे दुष्ट शेजारी हात लावतात त्या सर्वांविरुद्ध परमेश्वर असे म्हणतो, “पाहा, मी त्यांना त्यांच्या देशातून उपटून टाकीन आणि त्यांच्यामधून यहूदाचे घराणे उपटून टाकीन.


मवाबाविषयी : सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, “अरेरे! बिचारे नबो; ते ओसाड झाले आहे; किर्याथाईमाची फजिती झाली आहे, ते हस्तगत झाले आहे; मिस्गाबाची फजिती होऊन ते भंगले आहे;


अम्मोनी लोकांविषयी : परमेश्वर म्हणतो, “काय? इस्राएलास कोणी पुत्र, कोणी वारस नाही काय? तर मिलकोम दैवताने1 गाद का घेतले? त्याचे लोक गादाच्या नगरांतून का वस्ती करून आहेत?


हे परमेश्वरा, माझ्याविरुद्ध त्यांनी केलेली निंदा व त्यांच्या सर्व योजना तू ऐकल्या आहेत.


हे मानवपुत्रा, संदेश देऊन सांग, अम्मोनपुत्रांविषयी व त्यांनी केलेल्या निंदेविषयी प्रभू परमेश्वर जे म्हणतो ते सांग; तलवार, वधासाठी तलवार उपसली आहे, फन्ना उडवण्यासाठी, चमकण्यासाठी ती पाजवली आहे.


परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की,


तू इस्राएलाच्या पर्वतांविरुद्ध म्हणालास की, ‘ते उद्ध्वस्त झाले आहेत, ते आम्हांला भक्षण करण्यासाठी दिले आहेत,’ हे तुझे सर्व दुर्भाषण मी परमेश्वराने ऐकले आहे हे तुला कळेल.


प्रभू परमेश्वर म्हणतो, तुमच्यासंबंधाने शत्रू म्हणतात, ‘अहा! ही प्राचीन उंच स्थळे आमच्या ताब्यात आली आहेत;’


परमेश्वर म्हणतो, “अम्मोनवंशजांचे तीन काय पण चार अपराध झाले, म्हणून मी शासन करण्यापासून माघार घेणार नाही; कारण त्यांनी आपली सीमा वाढवण्यासाठी गिलादाच्या गरोदर स्त्रियांना चिरले.


परमेश्वर म्हणतो, “मवाबाचे तीन काय पण चार अपराध झाले, म्हणून मी शासन करण्यापासून माघार घेणार नाही; कारण त्याने अदोमाच्या राजाची हाडे भाजून त्यांचा चुना केला.


त्यांनी सेनाधीश परमेश्वराच्या लोकांना तुच्छ मानले व त्यांच्यावर तोरा मिरवला म्हणून त्यांच्या गर्वाचे त्यांना हे प्रतिफळ मिळेल.


मग परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “मिसरी लोक तुमची निंदा करीत असत ती आज मी तुमच्यापासून दूर लोटली आहे.” म्हणून आजही त्या जागेला गिलगाल (लोटून देणे) म्हणतात.


Lean sinn:

Sanasan


Sanasan