Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




सफन्या 2:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 समुद्रतीरीच्या रहिवाशांना, करेथी राष्ट्रांना धिक्कार असो! हे कनाना, पलिष्ट्यांच्या देशा, तुझ्याविरुद्ध परमेश्वराचे वचन आहे! मी तुझा असा नाश करीन की तुझ्यात एकही रहिवासी उरणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 समुद्राकाठी राहणाऱ्या लोकांस, करेथी राष्ट्राला हाय हाय! परमेश्वर तुमच्याविरुध्द बोलला आहे. कनान, जो पलिष्ट्यांचा देश आहे, मी तुझा असा नाश करणार की, तुझ्यात कोणीही रहीवासी उरणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 हे करेथीयाच्या लोकांनो, समुद्र किनार्‍यावरील रहिवाशांनो तुम्हाला धिक्कार असो; कनान देशात राहणार्‍या पलिष्टी लोकांनो, याहवेहचे वचन तुमच्याविरुद्ध आहे. ते म्हणतात, “मी तुमचा असा नाश करेन, की तुमच्यातील कोणीही वाचणार नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




सफन्या 2:5
14 Iomraidhean Croise  

“हे समग्र पलेशेथा, तुला मारणारा सोटा मोडला आहे म्हणून आनंद करू नकोस, कारण सापाच्या मुळातून फुरसे निघेल, त्याचे फळ उडता आग्या साप होईल.


गरिबांतले गरीब पोटभर खातील; गरजवंत सुखाने झोप घेतील; तुझे मूळ मी क्षुधेने मारीन व तुझा अवशेष वधतील.


परमेश्वराने तिला आज्ञा केली आहे; तर ती कशी स्वस्थ राहील? अष्कलोन व समुद्रकिनारा ह्यांवर तिला त्याने नेमले आहे.”


म्हणून प्रभू परमेश्वर म्हणतो, मी आपला हात पलिष्ट्यांवर उगारीन, करेथ्यांचा संहार करीन आणि समुद्रकिनार्‍यावरील अवशिष्ट राहिलेल्यांचा नाश करीन.


इस्राएलवंशजहो, तुमच्याविरुद्ध म्हणजे जे सर्व कूळ मी मिसर देशातून बाहेर आणले त्याच्याविरुद्ध परमेश्वराने सांगितलेले वचन ऐका, ते असे :


हे इस्राएलाच्या घराण्या, हे जे विलापवचन मी तुमच्याविरुद्ध उच्चारतो ते ऐका :


“मक्तेशच्या2 रहिवाशांनो, आक्रंदन करा, कारण कनानाचे सर्व लोक नाश पावले आहेत, चांदीने लादलेले सर्व नाश पावले आहेत.


“मी राष्ट्रे नष्ट केली आहेत, त्यांचे बुरूज उद्ध्वस्त केले आहेत; मी त्यांचे रस्ते उजाड केले आहेत, तेथून कोणी जात-येत नाही; त्यांची नगरे उद्ध्वस्त केली आहेत, कोणी माणूस, कोणी रहिवासी तेथे उरला नाही.


असे असता माझे सेवक म्हणजे संदेष्टे ह्यांना जी वचने व नियम मी आज्ञापले होते त्यांनी तुमच्या पूर्वजांना गाठले नाही काय? तेव्हा त्यांनी वळून म्हटले, आमचा आचार व कर्मे ह्यांप्रमाणे आमचे करण्याचा सेनाधीश परमेश्वराचा मानस होता त्याप्रमाणे त्याने आमचे केले आहे.”


तेव्हा ते त्याला धरण्यास पाहू लागले, परंतु लोकसमुदायाची त्यांना भीती वाटली; कारण हा दाखला त्याने आपल्याला उद्देशून सांगितला हे त्यांच्या ध्यानात आले. मग ते त्याला सोडून गेले.


बाकी राहिलेला देश हा : पलिष्टी आणि गशूरी ह्यांचा अवघा प्रदेश,


(मिसर देशाच्या पूर्वेकडील शीहोर नदीपासून उत्तरेकडील एक्रोनाच्या सीमेपर्यंतचा प्रदेश कनान्यांचा समजला जातो; त्यात पलिष्ट्यांचे पाच सुभे होते, म्हणजे गज्जा, अश्दोद, अष्कलोन, गथ व एक्रोन);


पलिष्ट्यांचे पाच सरदार आणि सर्व कनानी, सीदोनी आणि बआल-हर्मोन डोंगरापासून हमाथाच्या खिंडीपर्यंत लबानोन पर्वतात राहणारे हिव्वी.


आम्ही करेथ्यांच्या दक्षिण प्रांतावर, यहूदा प्रांतावर व कालेबाच्या दक्षिण भागावर स्वारी केली आणि सिकलाग आग लावून जाळून टाकले.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan