Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




सफन्या 2:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 निर्णय बाहेर पडेल, दिवस भुसाप्रमाणे उडून जाईल, परमेश्वराचा क्रोधदिन तुमच्यावर येईल त्यापूर्वी ताळ्यावर या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 फर्मान सादर होण्या आधी आणि दिवस भुसासारखा उडून जाईल त्यापूर्वी, परमेश्वराचा कोप तुमच्यावर येईल त्यापुर्वी, परमेश्वराचा क्रोधाचा दिवस तुमच्यावर येण्यापूर्वी तुम्ही एकत्र या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 फर्मानाचा प्रभाव सुरू होण्याआधी आणि तो दिवस वाऱ्याने उडालेल्या भुशासारखा उडून जाण्यापूर्वी, याहवेहचा भयंकर संताप तुझ्यावर कोसळण्यापूर्वी, याहवेहच्या भयानक क्रोधाचा दिवस, तुझ्यावर कोसळण्यापूर्वी एकत्र ये.

Faic an caibideil Dèan lethbhreac




सफन्या 2:2
22 Iomraidhean Croise  

वार्‍याने जसे धसकट उडते, तुफानाने जसे भूस उडते, तसे ते नष्ट झाले, असे कितीदा घडते?


दुर्जन तसे नाहीत, ते वार्‍याने उडून जाणार्‍या भुसासारखे आहेत.


पुत्राने2 रागावू नये आणि तुम्ही वाटेने नाश पावू नये, म्हणून त्याचे चुंबन घ्या; कारण त्याचा क्रोध त्वरित पेटेल; त्याला शरण जाणारे सगळे धन्य होत.


अहो देवाला विसरणार्‍यांनो, ह्याचा विचार करा, नाहीतर मी तुम्हांला फाडून टाकीन, तेव्हा तुम्हांला कोणी सोडवणारा सापडणार नाही.


राष्ट्रे महापुराच्या खळखळीसारखी खळबळ करतात; परंतु तो त्या खळबळीस प्रतिरोध करील व ती नाहीशी होईल; डोंगरांवरचे भूस व वावटळीतील धूळ ही वार्‍यापुढे उडून जातात तशी ती नष्ट होईल.


परमेश्वर आपले कार्य करीपर्यंत, आपला मनोदय पूर्ण करीपर्यंत, त्याचा संताप मागे फिरणार नाही; पुढील काळात तुम्हांला हे चांगले समजेल.


यहूदाचे लोकहो, यरुशलेमकरहो, परमेश्वराप्रीत्यर्थ आपली सुंता करा, आपल्या अंत:करणाची सुंता करा; नाहीतर तुमच्या कर्मांच्या दुष्टतेमुळे माझा क्रोध अग्नीसारखा भडकेल आणि तो कोणाच्याने विझणार नाही असा पेटेल.”


परमेश्वराने आपला क्रोध पूर्ण प्रकट केला आहे; त्याने आपल्या संतप्त क्रोधाचा वर्षाव केला आहे त्याने सीयोनेत अग्नी पेटवला आहे, त्या अग्नीने तिचे पाये भस्म केले आहेत.


कारण मी परमेश्वर आहे; मी बोलत आहे व मी बोलतो ते वचन सिद्धीस जाईलच, त्याला इतःपर विलंब लागणार नाही; कारण प्रभू परमेश्वर म्हणतो, हे फितुरी घराण्या, मी तुमच्या दिवसांत वचन बोलेन व ते पूर्ण करीन.”


ह्यास्तव ते सकाळच्या अभ्रासारखे, लवकर उडून जाणार्‍या दहिवरासारखे होतील, खळ्यातून वावटळीने उडणार्‍या भुसाप्रमाणे, धुराड्यातून निघणार्‍या धुराप्रमाणे ते होतील.


त्याच्या रागापुढे कोण टिकणार? त्याच्या क्रोधाच्या संतापापुढे कोण उभा राहणार? त्याच्या संतापाचा वर्षाव अग्नीसारखा होतो, त्याच्यापुढे खडक फुटून त्यांचे तुकडे होतात.


परमेश्वराच्या क्रोधदिनी त्यांच्या सोन्यारुप्याने त्यांचा बचाव होणार नाही. त्याच्या ईर्ष्येच्या अग्नीने सर्व देश भस्म होईल, कारण तो देशातील सर्व रहिवाशांचा अंत करील आणि तोही एकाएकी करील.


परमेश्वर म्हणतो, “मी लुटीसाठी उठेन तोवर माझी वाट पाहा. कारण राष्ट्रे एकत्र जमवावीत, राज्ये एकत्र मिळवावीत; त्यांच्यावर माझा क्रोध, माझा सर्व संतप्त क्रोध पडावा हा माझा निश्‍चय आहे; कारण माझ्या ईर्ष्येच्या अग्नीने सर्व पृथ्वी भस्म होईल.


आकाश व पृथ्वी नाहीशी होतील परंतु माझी वचने नाहीशी होणारच नाहीत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan