Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




सफन्या 2:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 हे निर्लज्ज राष्ट्रा, एकत्र हो, ताळ्यावर ये;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 हे निर्लज्ज राष्ट्रा, तुम्ही सर्वजण गोळा व्हा आणि एकत्र या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 हे निर्लज्ज राष्ट्रा एकत्र ये, स्वतःला एकवटून घे,

Faic an caibideil Dèan lethbhreac




सफन्या 2:1
15 Iomraidhean Croise  

यहूदी लोक परमेश्वराचे साहाय्य मागण्यासाठी एकत्र झाले; यहूदाच्या सर्व नगरांतून ते परमेश्वराचा धावा करण्यास आले.


मग ते सर्व लोक एकचित्त होऊन पाणीवेशीजवळच्या चौकात एकत्र जमले व एज्रा शास्त्री ह्याला म्हणाले, “परमेश्वराने इस्राएल लोकांना विहित केलेला नियमशास्त्राचा मोशेकृत ग्रंथ घेऊन या.”


ह्याच महिन्याच्या चोविसाव्या दिवशी इस्राएल लोक उपास करून गोणपाट पांघरून व डोक्यात धूळ घालून एकत्र झाले.


“जा, शूशन येथले सर्व यहूदी जमवा; माझ्याकरता उपास करा; तीन दिवस व तीन रात्री अन्नोदक सेवू नका; मीही आपल्या दासींसह तसाच उपास करीन; असल्या स्थितीत नियमाविरुद्ध मी आत राजाकडे जाईन; मग मी मेले तर मेले.”


ह्यामुळे पर्जन्यवृष्टी आवरण्यात आली आहे आणि वळवाचा पाऊस पडला नाही; तरी तुझे कपाळ पडले कसबिणीचे; तुला लाज कशी ती ठाऊक नाही.


त्यांनी अमंगल कृत्य केले त्याची त्यांना लाज वाटली काय? नाही; त्यांना लाज मुळीच वाटली नाही; शरम कसली ती त्यांना ठाऊक नाही; म्हणून पतन पावणार्‍यांबरोबर ते पतन पावतील; मी त्यांचा समाचार घेईन तेव्हा ते ठोकर खाऊन पडतील,” असे परमेश्वर म्हणतो.


उपासाचा एक पवित्र दिवस नेमा, पवित्र मेळा भरवा, तुमचा देव परमेश्वर ह्याच्या मंदिरात वडिलांना व देशात राहणार्‍या सर्वांना जमवा व परमेश्वराला आरोळी मारा.


तिच्यामध्ये परमेश्वर न्यायी आहे; तो काही अन्याय करत नाही; रोज सकाळी तो आपला न्याय प्रकट करतो, चुकत नाही; अन्यायी लोकांना तर लाज कशी ती ठाऊक नाही.


मी एका महिन्यात तीन मेंढपाळ कापून टाकले, कारण माझ्या जिवाला त्यांचा कंटाळा आला व त्यांच्या जिवास माझा कंटाळा आला.


कारण जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत तेथे त्यांच्यामध्ये मी आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan