Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




सफन्या 1:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 त्यांचा माल लुटला जाईल, त्यांची घरे उजाड होतील; ते घरे बांधतील, पण त्यांत वसणार नाहीत; द्राक्षीचे मळे लावतील, पण त्यांचा द्राक्षारस पिणार नाहीत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 त्यांची संपत्ती लूट अशी होईल, आणि त्यांच्या घरांचा त्याग करण्यात येईल. ते घरे बांधतील पण त्या घरात राहणार नाहीत आणि ते द्राक्षमळे लावतील, पण त्यांना द्राक्षरस प्यायला मिळणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 या लोकांची मालमत्ता लुटली जाईल, यांचीच घरे ढासाळून टाकली जातील, जरी त्यांनी घरे बांधली असतील, त्या घरात ते राहू शकणार नाहीत; जरी त्यांनी द्राक्षमळा लावला असेल, द्राक्षांचा रस ते पिणार नाहीत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




सफन्या 1:13
24 Iomraidhean Croise  

मी म्हणालो, “हे प्रभू, असे कोठवर?” तो म्हणाला, “नगरे निर्जन होतील, घरे निर्मनुष्य होतील, जमीन ओसाड व वैराण होईल,


“तुझ्या सर्व पातकांमुळे तुझ्या सर्व हद्दींतील तुझे वित्त व निधी मी मोबदला न घेता लूट म्हणून देईन.


हे माझ्या वनातल्या पर्वता, तुझे वित्त, तुझे सर्व निधी व तुझ्या सर्व सीमांच्या आतील तुझी उच्च स्थाने तुझ्या पापामुळे मी लुटीस जाऊ देईन.


नाशावर नाश पुकारला आहे; कारण सर्व देश लुटला आहे; माझे डेरे अकस्मात माझ्या कनाती क्षणात लुटल्या आहेत.


सिंह आपल्या झाडीतून बाहेर निघाला आहे; राष्ट्रांना फस्त करणारा वाट चालत आहे, तुझा देश ओस करण्यासाठी, तुझी नगरे उजाड, निर्जन करण्यासाठी तो आपल्या स्थानातून निघाला आहे;


ते तुझे पीक, तुझ्या मुलाबाळांचे अन्न खाऊन टाकतील; ते तुझी शेरडेमेंढरे, तुझी गुरेढोरे, खाऊन टाकतील; तुझ्या द्राक्षलता व अंजिरांची झाडे फस्त करतील; ज्या तटबंदीच्या नगरांवर तुझी भिस्त आहे त्यांना ते तलवारीने उद्ध्वस्त करतील.”


यरुशलेम ढिगार, कोल्ह्यांचे वसतिस्थान असे मी करीन; यहूदाची नगरे ओसाड, निर्जन करीन.”


कारण सीयोनेतून आक्रंदनाचा शब्द ऐकू येत आहे; ‘आम्हांला कसे नागवले आहे! आमची कशी फजिती उडाली आहे! आम्ही देश त्यागला आहे, कारण त्यांनी आमची घरे पाडली आहेत.”’


आमचे वतन परक्यांकडे गेले आहे; आमची घरे परदेशीयांच्या हाती गेली आहेत.


ह्यामुळे त्यांच्यावर मी आपल्या क्रोधाचा वर्षाव करीन; मी आपल्या कोपाग्नीने त्यांना भस्म करीन, त्यांच्या आचाराचे प्रतिफळ त्यांच्याच शिरी आणीन असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”


ते आपले रुपे रस्त्यांवर फेकून देतील, त्यांना आपले सोने अमंगळ वाटेल; परमेश्वराच्या कोपाच्या दिवशी त्यांच्या सोन्यारुप्याने त्यांचा बचाव होणार नाही; त्यापासून त्यांच्या जिवाची तृप्ती होणार नाही, त्यांचे पोट भरणार नाही, कारण त्यांनी त्यामुळे ठोकर खाऊन अधर्म केला आहे.


ते मी परदेशीयांना भक्ष्य म्हणून देईन; ते जगातील दुष्टांना लूट म्हणून देईन, ते ते भ्रष्ट करतील.


ह्यास्तव मी परराष्ट्रांतले अधमाधम जन आणीन; ते त्यांची घरे हस्तगत करतील, मी जबरदस्तांचा ताठा मोडीन; त्यांची पवित्र स्थाने भ्रष्ट होतील.


तुम्ही गरिबाला तुडवता व भेट म्हणून त्याच्यापासून धान्य उपटता, त्यामुळे जी चिर्‍यांची घरे तुम्ही बांधली आहेत त्यांत तुम्ही राहणार नाही; तुम्ही जे द्राक्षाचे रमणीय मळे लावले आहेत त्यांचा द्राक्षारस पिणार नाही.


म्हणून तुमच्यामुळे सीयोन शेताप्रमाणे नांगरतील, यरुशलेम नासधुशीचा ढीग होईल व मंदिराचा पर्वत जंगलाने भरलेला उंचवटा होईल.


तू पेरशील, पण कापणी करणार नाहीस; तू जैतून वृक्षाची फळे तुडवशील, पण त्याच्या तेलाने अभ्यंग करणार नाहीस; द्राक्षीचा उपज तुडवशील, पण तू द्राक्षारस पिणार नाहीस.


त्या दिवशी जे उंबरठ्यावरून उडी मारून आपल्या प्रभूचा वाडा बलात्काराने व कपटाने भरून टाकतात त्या सर्वांचा समाचार मी घेईन.”


तू एखाद्या स्त्रीला मागणी घालशील, पण दुसराच तिचा उपभोग घेईल; तू घर बांधशील पण त्यात राहणार नाहीस; तू द्राक्षमळा लावशील, पण त्याचे फळ तुला मिळणार नाही.


तू द्राक्षमळे लावून त्यांची मशागत करशील, पण तुला द्राक्षारस प्यायला मिळणार नाही आणि द्राक्षे खुडायलाही मिळणार नाहीत; कारण कीड ती खाऊन टाकील.


तुझा नाश होईपर्यंत तुझ्या जनावरांचे वत्स आणि तुझ्या भूमीचा उपज ते खाऊन टाकतील; तुझा संहार करीपर्यंत धान्य, नवा द्राक्षारस, तेल, तुझी गुरेढोरे व शेरडेमेंढरे ह्यांचे वत्स ते तुला लाभू देणार नाहीत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan