Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




सफन्या 1:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 “मक्तेशच्या2 रहिवाशांनो, आक्रंदन करा, कारण कनानाचे सर्व लोक नाश पावले आहेत, चांदीने लादलेले सर्व नाश पावले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 मक्तेशातल्या रहिवाश्यांनो गळा काढून रडा, कारण सर्व व्यापाऱ्यांचा नाश झाला आहे, चांदीने लादलेले सर्व नाहीसे झाले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 विलाप करा, तुम्ही जे मक्तेशातील व्यापारी भागात राहता, तुमचे सर्व व्यापारी, सोन्याचांदीचा व्यवहार करणारे सर्वजण नष्ट होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




सफन्या 1:11
16 Iomraidhean Croise  

त्याने रुप्याचा संचय धुळीसारखा केला, वस्त्रे चिखलासारखी विपुल केली;


तरी तो वस्त्रे करील ती नीतिमान अंगावर घालील. निर्दोषी त्याचे रुपे वाटून घेईल.


मेंढपाळहो, हायहाय करा, ओरडा; कळपांचे प्रमुखहो, राखेत लोळा; कारण तुमच्या वधाचे दिवस भरले आहेत, मोलवान भांडे पडून भंगते तसे तुम्ही पडाल, अशी मी तुमची दाणादाण करीन.


म्हणून तुम्ही कंबरेस गोणपाट गुंडाळा, शोक व आक्रंदन करा; कारण आमच्यावरला परमेश्वराचा तीव्र कोप अजून गेला नाही.”


मानवपुत्रा, ओरड, आक्रंदन कर; कारण ती माझ्या लोकांवर चालली आहे, ती इस्राएलांच्या सर्व सरदारांवर चालली आहे; माझ्या लोकांबरोबर तेही तलवारीने पडले आहेत, म्हणून आपले ऊर बडव.1


कारण पाहा, विध्वंस झाल्यामुळे ते निघून गेले आहेत; मिसर त्यांना गोळा करील, मोफ त्यांना मूठमाती देईल; काटेकुसळे त्यांच्या रुपेरी मौल्यवान पदार्थांचा ताबा घेतील, त्यांच्या तंबूत काटेरी झुडपे रुजतील.


याजकहो, गोणपाट घालून शोक करा; वेदीची सेवा करणार्‍यांनो, विलाप करा; माझ्या देवाच्या सेवकांनो, या, गोणपाटावर पडून रात्र घालवा, कारण तुमच्या देवाच्या मंदिरात अन्नार्पण व पेयार्पण येण्याचे बंद झाले आहे.


अहो मद्यप्यांनो, जागे व्हा आणि रडा; द्राक्षारस पिणार्‍यांनो, तुम्ही सर्व नव्या द्राक्षारसाकरता विलाप करा, कारण तो तुमच्या तोंडून काढून घेतला आहे.


समुद्रतीरीच्या रहिवाशांना, करेथी राष्ट्रांना धिक्कार असो! हे कनाना, पलिष्ट्यांच्या देशा, तुझ्याविरुद्ध परमेश्वराचे वचन आहे! मी तुझा असा नाश करीन की तुझ्यात एकही रहिवासी उरणार नाही.


यरुशलेमेतील व यहूदातील प्रत्येक बहुगुणे सेनाधीश परमेश्वराला पवित्र होईल; व सर्व यज्ञकर्ते येऊन ती घेतील व त्यांत अन्न शिजवतील; त्या दिवसांपासून पुढे सेनाधीश परमेश्वराच्या मंदिरात कोणी व्यापारी1 असणार नाही.


आणि तो कबुतरे विकणार्‍यांना म्हणाला, “ही येथून काढून घ्या; माझ्या पित्याच्या घराची बाजारपेठ करू नका.”


अहो धनवानांनो, जे क्लेश तुम्हांला होणार आहेत त्यांविषयी रडून आकांत करा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan