Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




सफन्या 1:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 “त्या दिवशी मत्स्यवेशीतून ओरडण्याचा आवाज होईल, दुसर्‍या पेठेतून आक्रंदन होईल व टेकड्यांवरून मोठा धडाका उडेल,” असे परमेश्वर म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 परमेश्वर असेही म्हणाला, त्या दिवशी, मासळी दारातून आक्रंदनाचा आवाज येईल, दुसऱ्या भागातून आकांत आणि टेकड्यांवरून मोठा धडाक्याचा आवाज होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 याहवेह जाहीर करतात, “त्या दिवशी मत्स्य वेशीपासून एक मोठी आरोळी ऐकू जाईल, नगरातील नव्या विभागातून विलापाचा ध्वनी, आणि डोंगरातून मोठ्या स्फोटाचा आवाज ऐकू येईल;

Faic an caibideil Dèan lethbhreac




सफन्या 1:10
18 Iomraidhean Croise  

तरी दाविदाने सीयोन गड घेतला; हेच ते दावीदपूर.


दावीद त्या गडावर राहू लागला; त्याला दावीदपूर हे नाव पडले. दाविदाने मिल्लो बुरुजापासून आतल्या बाजूस सभोवार तटबंदी केली.


तेव्हा हिल्कीया याजक, अहीकाम, अखबोर, शाफान व असाया हे हुल्दा संदेष्ट्रीकडे गेले व तिच्याशी त्यांनी भाषण केले. ती शल्लूम बिन तिकवा बिन हरहस नावाचा जामदार ह्याची स्त्री असून ती त्या वेळी यरुशलेमेच्या दुसर्‍या पेठेत राहत होती.


मग परमेश्वराने यरुशलेमेस मोरिया डोंगरावर शलमोनाचा बाप दावीद ह्याला दर्शन दिले होते त्या अर्णान यबूसी ह्याच्या खळ्यात दाविदाने नेमलेल्या स्थानी मोरिया डोंगरावर मंदिर बांधण्याचे काम शलमोनाने सुरू केले.


ह्या प्रकारे परमेश्वराने हिज्कीयाला व यरुशलेमकरांना अश्शूरचा राजा सन्हेरीब ह्याच्या हातातून व इतर सर्वांच्या हातातून वाचवले, आणि तो त्यांना सर्व बाजूंनी मार्गदर्शक झाला.


ह्यानंतर त्याने दावीदपुराच्या बाहेर गीहोनाच्या पश्‍चिमेस खोर्‍यात मत्सवेशीपर्यंत एक कोट बांधला, ओफेलाभोवती कोट बांधून तो उंच केला आणि यहूदाच्या सर्व तटबंदी नगरांत त्याने सेनानायक ठेवले.


मग हिल्कीया व राजाने आज्ञा केलेले इतर लोक हे संदेष्ट्री हुल्दा हिच्याकडे गेले. ही शल्लूम बिन ताकहत2 बिन इस्रा नावाच्या जामदाराची स्त्री असून त्या वेळी यरुशलेमेत दुसर्‍या पेठेत राहत होती; तिच्याकडे जाऊन तिला त्यांनी हे कळवले.


आणि एफ्राईम वेशीपासून जुन्या वेशीवरून मत्स्यवेस, हनानेल बुरूज व हमया बुरूज ह्यांवरून मेंढेवेशीपर्यंत गेलो; गारद्यांच्या वेशीत ते जाऊन उभे राहिले.


मत्स्यवेस हस्सनाच्या पुत्रांनी बांधली; त्यांनी तिला तुळया घातल्या, तिला कवाडे लावली आणि कड्या व अडसर लावले.


आम्ही सगळे अस्वलांसारखे गुरगुरतो, पारव्यांसारखे घुमत राहतो; आम्ही न्यायाची अपेक्षा करतो तर त्याचा पत्ता नाही; तारणाची आशा धरतो तर ते आमच्यापासून दूर राहते;


सिद्कीयाच्या कारकिर्दीच्या अकराव्या वर्षी चौथ्या महिन्याच्या नवव्या दिवशी नगराच्या तटास त्यांनी खिंडार पाडले; अशा प्रकारे यरुशलेम हस्तगत केल्यावर असे झाले की,


वेणा देणार्‍या स्त्रीच्या शब्दासारखा शब्द मी ऐकत आहे; प्रथम प्रसूत होणार्‍या स्त्रीच्या वेदनांप्रमाणे वेदना ऐकत आहे; सीयोनेच्या कन्येचा स्वर ऐकू येत आहे; ती उसासे टाकत आहे, ती आपले हात पसरत आहे; ती म्हणत आहे, “हाय रे हाय! कारण ह्या मनुष्यघातक्यापुढे माझा जीव घाबरा होत आहे.”


प्रत्येक उंच टेकडीवर, सर्व डोंगरांच्या माथ्यांवर, प्रत्येक हिरव्या झाडाखाली, प्रत्येक दाट पालवीच्या एला झाडाखाली ज्या ज्या स्थळी त्यांनी आपल्या सर्व मूर्तींपुढे सुवासिक धूप अर्पण केला, तेथल्या त्यांच्या मूर्तींच्या मध्ये त्यांच्या वेद्यांभोवती त्यांचे वध पावलेले पडतील, तेव्हा तुम्हांला समजेल की मी परमेश्वर आहे.


प्रभू परमेश्वर म्हणतो, “त्या दिवशी मंदिरांतील गीते आक्रंदनाची होतील, प्रेतांच्या राशी पडतील; सर्व ठिकाणी ती मुकाट्याने बाहेर फेकतील.


हा संतापाचा दिवस आहे, दुःखाचा व क्लेशाचा दिवस आहे, विध्वंसाचा व उजाडीचा दिवस आहे, अंधकाराचा व उदासीनतेचा दिवस आहे, अभ्रांचा व निबिड अंधकाराचा दिवस आहे.


प्रभू परमेश्वरापुढे तुम्ही मौन धरून राहा! कारण परमेश्वराचा दिवस येऊन ठेपला आहे; परमेश्वराने यज्ञबलीची सिद्धता केली आहे, त्याने आपल्या आमंत्रितांना पवित्र केले आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan