Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




जखर्‍या 9:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 पाहा, प्रभू त्याची सत्ता काढून घेईल, त्याची तटबंदी समुद्रात टाकील; ते अग्नीने भस्म होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 पाहा! परमेश्वर, तिला तिच्या भूमीवरून हाकलून लावेल आणि तो तिच्या सागरी शक्तीचा नाश करील; अशाप्रकारे तिला आगीत भस्मसात करील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 परंतु प्रभू तिची सर्व संपत्ती हिरावून घेतील आणि तिची समुद्रावरील शक्ती नष्ट करतील, आणि ती अग्नीत भस्म होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




जखर्‍या 9:4
14 Iomraidhean Croise  

दुष्टाईने मिळवलेली संपत्ती हितकर नाही, पण नीतिमत्ता मरणापासून मुक्त करते.


क्रोधाच्या समयी धन उपयोगी पडत नाही, पण नीतिमत्ता मृत्यूपासून सोडवते.


परमेश्वराने आपला हात समुद्रावर उगारला आहे; त्याने राष्ट्रांना थरथर कापवले आहे; त्याने कनानासंबंधाने अशी आज्ञा केली आहे की त्याचे दुर्ग नष्ट करावे.


ते तुझ्याविषयी शोक करून म्हणतील, ‘अगे कीर्तिमान नगरी, तू जशी काय समुद्रातून उद्भवून बसली होतीस, तू समुद्रावर पराक्रमी होतीस, तू व तुझे रहिवासी ह्यांचा तेथील सर्व लोकांना वचक असे, ती तू कशी नष्ट झालीस!


तुझा व्यापार मोठा असल्यामुळे तुझ्या हृदयात अपकारबुद्धी शिरून तू पातक केलेस; म्हणून मी तुला भ्रष्ट समजून परमेश्वराच्या पर्वतावरून लोटून दिले. हे पाखर घालणार्‍या करूबा! त्या अग्नीप्रमाणे झगझगणार्‍या पाषाणांमधून काढून मी तुझा नाश केला आहे.


खोटा व्यापार चालवून तू बहुत पातके केलीस, त्यांनी तू आपली पवित्रस्थाने विटाळलीस म्हणून तुझ्यातून अग्नी निघून तुला खाऊन टाकील, असे मी केले आहे आणि तुला पाहणार्‍यांच्या डोळ्यांदेखत मी पृथ्वीवर तुझी राखरांगोळी केली आहे.


“मानवपुत्रा, सोरेच्या अधिपतीस सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, तुझे हृदय उन्मत्त होऊन तू म्हणतोस, ‘मी देव आहे, भर समुद्रात मी देवाच्या आसनावर बसलो आहे;’ पण तू देव नव्हेस, मानव आहेस; आपले चित्त देवाच्या चित्तासारखे आहे असा तू आव आणतोस;


ते तुला गर्तेत उतरवतील; भर समुद्रात वध पावणार्‍यांच्या मृत्यूसारखा तुझा मृत्यू होईल.


आणि तुमचे पुत्र व कन्या ह्यांना विकून यहूद्यांच्या हाती देईन आणि ते त्यांना दूरच्या राष्ट्रांना म्हणजे शबाई लोकांना विकतील असे परमेश्वराने म्हटले आहे.”


तर मी सोराच्या तटावर अग्नी पाठवीन, तो त्याचे महाल जाळून भस्म करील.”


अष्कलोन हे पाहून घाबरेल; गज्जाही हे पाहून वेणा देईल, व एक्रोनही असेच करील, कारण त्याची आशा नष्ट होऊन ते लज्जित होईल; गज्जात राजा नाही असे होईल, अष्कलोनात वस्ती व्हायची नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan