Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




जखर्‍या 9:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 सोराने आपणासाठी मजबूत दुर्ग बांधला, धुळीप्रमाणे रुप्याचा व रस्त्यावरील चिखलाप्रमाणे सोन्याचा संचय केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 सोराने स्वतःसाठी एक मजबूत किल्ला बांधला आहे आणि धुळीएवढी चांदी आणि चिखलाप्रमाणे रस्त्यात शुद्ध सोन्याचे ढिग लावले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 सोर नगरीने स्वतःसाठी भक्कम गड बांधले आहेत; तिने रुपे धुळीच्या व सोने रस्त्यावरील कचऱ्याच्या राशीप्रमाणे साठवून ठेवले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




जखर्‍या 9:3
16 Iomraidhean Croise  

नंतर ते सोर नावाचा दुर्ग आणि हिव्वी व कनानी ह्यांची सर्व नगरे येथे गेले; तेथून यहूदा देशाच्या दक्षिण दिशेस बैर-शेबा येथवर गेले.


शलमोन राजाची सर्व पानपात्रे सोन्याची होती; लबानोन येथील वनगृहातील सर्व पात्रे शुद्ध सोन्याची होती; चांदीचे एकही नव्हते; शलमोनाच्या वेळी चांदीला कोणी विचारत नव्हते.


राजाने यरुशलेमेत चांदी धोंड्यांप्रमाणे व गंधसरू तळवटीतल्या उंबराच्या झाडांप्रमाणे विपुल केले.


तू आपले सुवर्ण धुळीत टाक; ओफीरचे सोने ओढ्यातल्या गोट्यांत फेकून दे;


त्याने रुप्याचा संचय धुळीसारखा केला, वस्त्रे चिखलासारखी विपुल केली;


सोन्याचा संचय करणारे, आपली घरे चांदीने भरून ठेवणारे सरदार ह्यांच्याबरोबर मी विसावा पावलो असतो.


परमेश्वराने आपला हात समुद्रावर उगारला आहे; त्याने राष्ट्रांना थरथर कापवले आहे; त्याने कनानासंबंधाने अशी आज्ञा केली आहे की त्याचे दुर्ग नष्ट करावे.


सोर ही राजमुकुटदात्री; तिचे व्यापारी सरदार, तिचे उदमी जगातले महाजन; तिच्याविरुद्ध हे कोणी योजले?


ते तुझी संपत्ती लुटतील, तुझा माल लुटतील; तुझे तट उद्ध्वस्त करतील, तुझे रंगमहाल पाडून टाकतील; तुझे पाषाण, लाकूड, माती वगैरे सर्वकाही पाण्यात बुडवून टाकतील.


तुझे धन, तुझा माल, तुझे व्यापाराचे जिन्नस, तुझे नावाडी, तुझे खलाशी, तुझी फूटतूट दुरुस्त करणारे, तुझ्या मालाची देवघेव करणारे, तुझ्यातले सर्व लढवय्ये, तुझ्यात असलेले सगळे लोक तुझ्या पतनाच्या दिवशी भर समुद्रात पडले.


जलमार्गाने तुझा माल जात असे तेव्हा तू बहुत राष्ट्रांची चंगळ करीत असायचीस; तू आपल्या विपुल मालाने व मोठ्या सौद्याने जगातील राजांना सधन करीत असायचीस.


समुद्रलहरींनी तू खोल पाण्यात फुटलीस तेव्हा तुझा माल व तुझी सर्व मंडळी तुझ्याबरोबर बुडाली.


परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की,


परमेश्वर म्हणतो, “सोराचे तीन काय पण चार अपराध झाले, म्हणून मी शासन करण्यापासून माघार घेणार नाही; कारण त्यांनी झाडून सारे बंदिवान अदोमाच्या हाती दिले व ते भाऊबंदांबरोबर केलेला करार स्मरले नाहीत.


तेथून ती वळसा घेऊन रामापर्यंत जाते व तेथून सोर नामक तटबंदीच्या नगरापर्यंत जाते; तेथून ती होसाकडे वळते आणि अकजीब प्रदेशातून जाऊन समुद्रास मिळते;


Lean sinn:

Sanasan


Sanasan