Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




जखर्‍या 9:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 त्याच्या सीमेवरल्या हमाथाकडे आणि सोर व सीदोन ह्यांच्याकडेही ती आहे; कारण ती फार शहाणी आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 तसेच सोर व सीदोन आणि हद्राखच्या सीमेवरील हमाथ याविषयीची भविष्यवाणी; कारण तेथील लोक अतिबुध्दिवान आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 सोर व सीदोनवर, आणि त्याच्या सीमेलगत असलेल्या हमाथवरही लागलेली आहे, जरी ते अत्यंत कुशल आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




जखर्‍या 9:2
20 Iomraidhean Croise  

“चल, सीदोनातील सारफथ नगरात जाऊन राहा; पाहा, तुझे पोषण करण्याची तेथल्या एका विधवेला मी आज्ञा केली आहे.”


यरुशलेमेत त्याला राज्य करता येऊ नये म्हणून फारो-नखो ह्याने हमाथ देशातले रिब्ला येथे त्याला बेड्या घालून ठेवले आणि त्याच्या देशावर शंभर किक्कार1 चांदी व एक किक्कार सोने एवढी खंडणी बसवली.


बाबेलच्या राजाने त्यांना हमाथ देशातील रिब्ला येथे मार देऊन ठार केले. ह्या प्रकारे यहूदी लोकांना त्यांच्या देशातून कैद करून नेले.


सोर व सीदोन ह्यांचे सर्व राजे व समुद्रापलीकडील देशांचे राजे ह्यांना,


पलिष्ट्यांच्या नाशाचा दिवस येत आहे; सोर व सीदोन ह्यांना साहाय्य करणारा जो कोणी उरला असेल त्याचा उच्छेद होईल; परमेश्वर पलिष्ट्यांचा म्हणजे कफतोर द्वीपांतील अवशिष्ट लोकांचा नाश करणार आहे.


दिमिष्काविषयी : “हमाथ व अर्पाद फजीत झाले आहेत; त्यांनी वाईट वर्तमान ऐकले आहे, त्यांच्या काळजाचे पाणी पाणी झाले आहे; समुद्र क्षुब्ध झाला आहे; तो शांत होऊ शकत नाही.


परमेश्वराचे वचन पुन्हा मला प्राप्त झाले की,


परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की,


“मानवपुत्रा, सोरेच्या राजाविषयी विलाप करून त्याला सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, तू पूर्णतेची मुद्राच आहेस; तू ज्ञानपूर्ण व सर्वांगसुंदर आहेस.


(दिमिष्काच्या व हमाथाच्या सरहद्दींमधील) हमाथ, बेरोथा, सिब्राईम व हौरानाच्या सीमेवरील हासेर-हत्तीकोनपर्यंत.


परमेश्वर म्हणतो, “दिमिष्काचे तीन काय पण चार अपराध झाले, म्हणून मी शासन करण्यापासून माघार घेणार नाही; कारण मळणी करण्याच्या लोखंडी यंत्रांनी त्यांनी गिलादाला मळले.


परमेश्वर, सेनाधीश देव म्हणतो, “पाहा, हे इस्राएलाच्या घराण्या, मी तुमच्यावर एक राष्ट्र उठवीन; ते हमाथाच्या सीमेपासून अराबाच्या ओहोळापर्यंत तुम्हांला पिडतील.”


इस्राएलवंशजांच्या ह्या सैन्यातले बंदिवान झालेले लोक कनान्यांचे सारफथापर्यंतचे वतन ताब्यात घेतील आणि यरुशलेमेतून बंदिवान करून सफारदात नेण्यात आलेले लोक दक्षिणेतल्या नगरांचा ताबा घेतील.


मग त्यांनी जाऊन सीन रानापासून हमाथाच्या वाटेवरील रहोबापर्यंत देश हेरला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan