Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




जखर्‍या 9:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 हद्राख देशाविषयी परमेश्वराची वाणी : ती दिमिष्कास पोचवून तेथे स्थिर होईल; कारण परमेश्वराची नजर मनुष्यजातीकडे व इस्राएलाच्या सर्व वंशांकडे आहे;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 हद्राख देश आणि त्या देशाची राजधानी दिमिष्क यांच्याबद्दल परमेश्वराचे वचन: “कारण जशी इस्राएलाच्या वंशांवर तशी मानवजातीवर परमेश्वराची दृष्टी आहे;”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 ही एक भविष्यवाणी आहे: हद्राख देशाविरुद्ध याहवेहचे वचन आले, आणि याचा प्रभाव दिमिष्कवरही पडेल; कारण सर्व लोकांची व इस्राएलच्या सर्व कुळांची दृष्टी याहवेहवर लागलेली आहे;

Faic an caibideil Dèan lethbhreac




जखर्‍या 9:1
22 Iomraidhean Croise  

त्याने आपल्या दासांच्या टोळ्या करून त्यांच्यावर रात्रीची चाल केली आणि त्यांना मार देऊन दिमिष्काच्या उत्तरेस होबापर्यंत त्यांचा पाठलाग केला.


हे आमच्या देवा, तू त्यांचे शासन करणार नाहीस का? कारण आमच्यावर चालून आलेल्या ह्या मोठ्या समूहाशी सामना करण्यास आम्हांला ताकद नाही; आम्ही काय करावे ते आम्हांला सुचत नाही; पण आमचे डोळे तुझ्याकडे लागले आहेत.”


सर्वांचे डोळे तुझ्याकडे लागतात; आणि तू त्यांना त्यांचे अन्न यथाकाळी देतोस.


माझे नेत्र परमेश्वराकडे नित्य लागले आहेत, म्हणून तो माझे पाय जाळ्यातून सोडवील.


बाबेलविषयी आमोजाचा पुत्र यशया ह्याला दृष्टान्तात प्राप्त झालेली देववाणी :


परमेश्वराने सर्व राष्ट्रांपुढे आपल्या पवित्र हाताची अस्तनी मागे सारली आहे;1 सगळ्या दिगंतांना आमच्या देवाने केलेले तारण दिसून येत आहे.


हे परमेश्वरा, माझ्या सामर्थ्या, माझ्या दुर्गा, संकटसमयीच्या माझ्या आश्रया, पृथ्वीच्या दिगंतापासून राष्ट्रे तुझ्याकडे येऊन म्हणतील, “आमच्या पूर्वजांना खोट्या, निरर्थक व निरुपयोगी अशा वस्तूंचाच काय तो वतनभाग मिळाला.


तू चातुर्याने थोर व कृतीने पराक्रमी असून प्रत्येकाला ज्याच्या-त्याच्या आचरणाप्रमाणे व कर्मफलाप्रमाणे द्यावे म्हणून मानवजातीचे अखिल मार्ग तुझ्या दृष्टीला खुले आहेत;


परमेश्वर म्हणतो, “सोराचे तीन काय पण चार अपराध झाले, म्हणून मी शासन करण्यापासून माघार घेणार नाही; कारण त्यांनी झाडून सारे बंदिवान अदोमाच्या हाती दिले व ते भाऊबंदांबरोबर केलेला करार स्मरले नाहीत.


परमेश्वर म्हणतो, “जसा मेंढपाळ सिंहाच्या तोंडातून दोन तंगड्या अथवा कानाचा एखादा तुकडा वाचवतो तसे पलंगाच्या कोपर्‍यात रेशमी गादीवर बसणारे इस्राएलाचे वंशज आपला जीव वाचवतील.”


निनवेविषयीची देववाणी : नहूम एल्कोशकर ह्याला प्राप्त झालेल्या दृष्टान्ताचे पुस्तक.


तर कार्याच्या अल्पारंभाचा दिवस कोणी तुच्छ मानतो काय? ते सात डोळे जरूब्बाबेलच्या हातातील ओळंबा आनंदाने पाहतील; ते परमेश्वराचे डोळे जगभर फिरत असतात.”


सेनाधीश परमेश्वर म्हणतो, मी हा पट चालवला आहे, तो चोराच्या घरात व माझ्या नामाची खोटी शपथ घेणार्‍याच्या घरात शिरेल; तो त्याच्या घरात बिर्‍हाड करून राहील आणि त्याच्या तुळयांचे व चिर्‍यांचे भस्म करील.”


मलाखीच्या द्वारे इस्राएलास प्राप्त झालेले परमेश्वराचे वचन.


Lean sinn:

Sanasan


Sanasan