शौलाबरोबर युद्ध करण्यासाठी दावीद पलिष्ट्यांसह आला तेव्हा मनश्शेच्या लोकांपैकी काही लोक दाविदाला सोडून गेले होते. (तरी दाविदाने पलिष्ट्यांना साहाय्य केले नाही, कारण पलिष्ट्यांच्या सरदारांनी आपसांत सल्लामसलत करून त्याला घालवून दिले; ते म्हणाले, “तो आमची शिरे जोखमीत घालून आपला स्वामी शौल ह्याला पुन्हा जाऊन मिळायचा.”)