Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




जखर्‍या 8:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 तुम्ही करायचे ते हेच की, तुम्ही सर्व आपल्या शेजार्‍याबरोबर खरे बोला; आपल्या वेशीत खरेपणाने वागा व शांतिदायक न्याय करा;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 पण तुम्हास पुढील गोष्टी करणे भाग आहे! तुमच्या शेजाऱ्याला सत्य सांगा. आपल्या वेशीत शांती, न्याय व सत्याने न्याय करा. त्यामुळे शांतता येईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 आता तुम्ही या गोष्टी करावयाच्या आहेत: एकमेकांशी सत्य बोला, सत्यता व शांततेने तुमच्या न्यायलयात योग्य निर्णय द्या;

Faic an caibideil Dèan lethbhreac




जखर्‍या 8:16
29 Iomraidhean Croise  

जो सात्त्विकतेने चालतो व नीतीने वागतो, मनापासून सत्य बोलतो,


परमेश्वराचे नेत्र नीतिमानांकडे असतात; त्याचे कान त्यांच्या हाकेकडे असतात.


ज्याच्या तोंडून सत्याचे उद्‍गार श्वासाप्रमाणे बाहेर पडतात, तो न्याय्यत्व प्रकट करतो. परंतु असत्य साक्षी कपट उच्चारतो.


सत्याची वाणी सर्वकाळ टिकेल; असत्य बोलणारी जिव्हा केवळ क्षणिक आहे.


त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसणार; तो दाविदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालवील आणि तेथून पुढे ते सर्वकाळ न्यायाने व नीतिमत्तेने दृढ व स्थिर करील. सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेईल.


परमेश्वर म्हणतो : तुम्ही न्यायनिवाडा करा; जुलम्याच्या हातातून लुबाडलेल्यांना सोडवा; परका, पोरका व विधवा ह्यांच्यावर अन्याय करू नका; त्यांना उपद्रव देऊ नका; ह्या स्थळी निर्दोष रक्त पाडू नका.


वाढीदिढी करत नाही, व्याज घेत नाही, वाइटापासून आपला हात आवरतो, मनुष्यामनुष्यात सत्य निर्णय करतो,


प्रभू परमेश्वर म्हणतो, इस्राएलाच्या अधिपतींनो, झाले ते पुरे; आता तुम्ही बलात्कार व जुलूम ह्यांपासून दूर राहा, न्याय व नीती ह्यांचे पालन करा, आणि माझ्या लोकांना त्यांच्या वतनांतून घालवून देण्याचे सोडा, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.


तुम्ही चोरी करू नये, एकमेकांशी कपटाने वागू नये व लबाडी करू नये.


वाइटाचा द्वेष करा, बर्‍याची आवड धरा, वेशीत न्याय स्थापित करा; परमेश्वर, सेनाधीश देव योसेफाच्या अवशेषावर कदाचित दया करील.


न्याय पाण्याप्रमाणे व नीतिमत्ता प्रचंड लोंढ्याप्रमाणे वाहो.


तेथील श्रीमंत दुष्टतेने भरले आहेत, तेथील रहिवासी खोटे बोलतात; त्यांची जीभ त्यांच्या मुखात साक्षात कपटरूप आहे;


हे मनुष्या, बरे काय ते त्याने तुला दाखवले आहे; नीतीने वागणे, आवडीने दया करणे व आपल्या देवासमागमे राहून नम्रपणे चालणे ह्यांवाचून परमेश्वर तुझ्याजवळ काय मागतो?


इस्राएलाचे अवशिष्ट जन काही अनिष्ट करणार नाहीत, लबाडी करणार नाहीत, त्यांच्या मुखात कपटी जिव्हा आढळायची नाही; ते चरतील व विश्रांती मिळवतील, कोणी त्यांना भेडसावणार नाही.”


“सेनाधीश परमेश्वर म्हणाला आहे : तुम्ही खरा न्याय करा व एकमेकांना प्रेम व करुणा दाखवा,


“सेनाधीश परमेश्वर म्हणतो, चौथ्या, पाचव्या, सातव्या व दहाव्या महिन्यातले उपास यहूदाच्या घराण्यास हर्ष व आनंद देणारे होतील; ते आनंदाच्या उत्सवांचे दिवस होतील; म्हणून सत्य व शांती ह्यांची आवड धरा.


परमेश्वर असे म्हणतो, मी सीयोनेस परत आलो आहे, मी यरुशलेमेत वस्ती करणार; यरुशलेमेस ‘सत्यनगर’ म्हणतील व सेनाधीश परमेश्वराच्या पर्वतास ‘पवित्र गिरी’ म्हणतील.


जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील.


म्हणून मी हे म्हणतो व प्रभूमध्ये निश्‍चितार्थाने सांगतो की, परराष्ट्रीय भ्रष्ट मनाने चालत आहेत त्याप्रमाणे तुम्ही ह्यापुढे चालू नये;


म्हणून लबाडी सोडून देऊन तुम्ही प्रत्येक जण आपापल्या शेजार्‍याबरोबर खरे बोला, कारण आपण एकमेकांचे अवयव आहोत.


कोणी ह्या गोष्टीचे उल्लंघन करून आपल्या बंधूचा गैरफायदा घेऊ नये; कारण प्रभू ह्या सर्व गोष्टींबद्दल शासन करणारा आहे, हे आम्ही तुम्हांला आगाऊ सांगितले होते व बजावलेही होते.


परंतु भेकड, विश्वास न ठेवणारे, अमंगळ, ‘खून करणारे,’ जारकर्मी, चेटकी, मूर्तिपूजक, व सर्व लबाड माणसे ह्यांच्या वाट्यास ‘अग्नीचे व गंधकाचे’ सरोवर येईल; हेच ते दुसरे मरण आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan