Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




जखर्‍या 8:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 कारण सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “तुमच्या पूर्वजांनी मला क्रोध आणला, तेव्हा तुमचे अनिष्ट करण्याचे मी योजले ह्याविषयी मला अनुताप झाला नाही, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “तुमच्या पूर्वजांनी मला संतापविले. म्हणून मी त्यांचा नाश करण्याचा निर्धार केला. माझा निश्चय बदलायचा नाही असे मी ठरविले होते.” सेनाधीश परमेश्वर असे म्हणाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “जसा तुमच्यावर अरिष्ट आणण्याचा व तुमच्या पूर्वजांनी मला क्रोध आणला तेव्हा मुळीच करुणा न करण्याचा मी निर्धार केला,

Faic an caibideil Dèan lethbhreac




जखर्‍या 8:14
12 Iomraidhean Croise  

पण ते देवाच्या दूतांची टर उडवून त्यांची वचने तुच्छ मानीत व त्यांच्या संदेष्ट्यांची निर्भर्त्सना करीत; शेवटी परमेश्वराचा कोप त्याच्या लोकांवर भडकला व त्यांचा बचाव करण्याचा काही उपाय राहिला नाही.


परमेश्वराची योजना सर्वकाळ टिकते; त्याच्या मनातील संकल्प पिढ्यानपिढ्या कायम राहतात.


सेनाधीश परमेश्वर शपथ वाहून म्हणाला आहे की, “मी कल्पिले तसे होईलच; मी योजले तसे घडेलच;


ज्या नगरांचा विध्वंस करून परमेश्वर अनुताप पावला नाही त्यांच्यासारखा तो मनुष्य होवो; सकाळी आरोळी, दुपारी रणशब्द त्याच्या कानी पडो.


परमेश्वर म्हणतो, तुमच्याविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो; ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत; ते तुम्हांला तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत.


आणि असे होईल की उपटण्याच्या व मोडून टाकण्याच्या, पाडून टाकण्याच्या व नाश करण्याच्या आणि पीडा करण्याच्या कामी मी जशी त्यांच्यावर नजर ठेवली तशी बांधून काढण्याच्या व लागवड करण्याच्या कामी मी त्यांच्यावर नजर ठेवीन, असे परमेश्वर म्हणतो.


कारण परमेश्वर म्हणतो, ज्या प्रकारे मी ह्या लोकांवर हे सर्व मोठे अरिष्ट आणले आहे त्याच प्रकारे त्यांच्या हितसंबंधाचे जे मी बोललो ते सर्व त्यांना प्राप्त करून देईन.


ह्यामुळे पृथ्वी शोक करील, वर आकाश काळे होईल; कारण मी असे बोललो आहे, मी हे योजले आहे; मी अनुताप पावणार नाही; मी माघार घेणार नाही.”


मी परमेश्वर हे बोललो आहे; हे घडेलच, हे मी करीनच; मी मागे हटणार नाही, गय करणार नाही, ह्याचा मला अनुताप होणार नाही; तुझ्या आचारांनुसार, तुझ्या कर्मांनुसार, ते तुझा न्याय करतील, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”


“परमेश्वर तुमच्या वाडवडिलांवर फार कोपायमान झाला,


असे असता माझे सेवक म्हणजे संदेष्टे ह्यांना जी वचने व नियम मी आज्ञापले होते त्यांनी तुमच्या पूर्वजांना गाठले नाही काय? तेव्हा त्यांनी वळून म्हटले, आमचा आचार व कर्मे ह्यांप्रमाणे आमचे करण्याचा सेनाधीश परमेश्वराचा मानस होता त्याप्रमाणे त्याने आमचे केले आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan