Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




जखर्‍या 8:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 शांततेचे बीजारोपण होत आहे; द्राक्षी आपले फळ देईल, भूमी आपला उपज देईल आणि आकाश आपले दहिवर देईल. ह्या अवशिष्ट लोकांना मी ह्या अवघ्यांचे वतन देईन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 “ते लोक शांततेत लागवड करतील. त्यांच्या द्राक्षवेलींना द्राक्षे लागतील. जमीन चांगली पिके देईल आणि आकाश पाऊस देईल. मी या सर्व गोष्टी माझ्या उर्वरित लोकांस वतन देईन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 “ते बियाणे चांगले वाढेल, द्राक्षवेली फळे देतील, भूमी पीक देईल, आणि आकाश त्याचे दव पाडेल. मी या लोकांच्या अवशिष्टास त्यांचा वारसाहक्क म्हणून हे सर्व देईन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




जखर्‍या 8:12
39 Iomraidhean Croise  

इसहाकाने त्या देशात धान्याची पेरणी केली आणि त्याला त्याच वर्षी शंभरपट पीक मिळाले, आणि परमेश्वराने त्याचे कल्याण केले;


देव तुला आकाशाचे दहिवर पृथ्वीवरील सुपीक जमिनी आणि विपुल धान्य व द्राक्षारस देवो;


एलीया तिश्बी हा गिलाद येथे उपरा म्हणून राहणार्‍यांपैकी एक होता; तो अहाबास म्हणाला, “इस्राएलाचा देव परमेश्वर ज्याच्या हुजुरास मी असतो त्याच्या जीविताची शपथ वाहून सांगतो की, जी वर्षे आता येणार त्यात दहिवर अथवा पाऊस पडणार नाही; हे सर्व माझ्या सांगण्याप्रमाणे होईल.”


पर्वत व डोंगर नीतीच्या द्वारे लोकांना शांतिदायक होवोत.


जे उत्तम ते परमेश्वर देईल; आणि आमची भूमी आपले फळ देईल.


राजाचा कोप सिंहाच्या गर्जनेसारखा आहे; त्याची प्रसन्नता गवतावर पडलेल्या दहिवरासारखी आहे.


तू भूमीत आपले बी पेरशील त्यावर तो पाऊस पाडील; भूमी पीक देईल ते अन्न रसभरीत व सत्त्वपूर्ण असेल; त्या काळी तुझी गुरेढोरे विस्तीर्ण कुरणात चरतील.


तुमच्या अप्रतिष्ठेचा मोबदला तुम्हांला दुप्पट मिळेल; आपल्या उपमर्दाबद्दल मिळालेल्या वतनभागानेच ते आनंद पावतील; असे ते आपल्या देशात दुप्पट वतन पावतील; त्यांना सार्वकालिक आनंद प्राप्त होईल.


ते येऊन सीयोनेच्या माथ्यावर आनंदाने गातील; परमेश्वराची उपयुक्त वरदाने म्हणजे धान्य, नवा द्राक्षारस, ताजे तेल व गुरामेंढरांचे वत्स ह्यांकडे लोटतील; त्यांचा जीव भरपूर पाणी दिलेल्या बागेप्रमाणे होईल; ह्यापुढे ते म्लान होणार नाहीत.


ते ह्यापुढे परराष्ट्रांना भक्ष्य होणार नाहीत; वनपशू त्यांना फाडून खाणार नाहीत; तर ते निर्भय वसतील, कोणी त्यांना भीती घालणार नाही.


माणसे म्हणजे माझे इस्राएल लोक, तुमच्यावर पुन्हा येजा करतील असे मी करीन; ते तुमचा1 ताबा घेतील, तुम्ही त्यांचे वतन व्हाल, तुम्ही2 इतःपर त्यांना अपत्यहीन करणार नाही.


वृक्षांची फळे व शेतांचा उपज ह्यांची वृद्धी मी करीन, म्हणजे राष्ट्रांमध्ये तुम्हांला ह्यापुढे दुष्काळामुळे होणारी विटंबना भोगावी लागणार नाही.


कारण पाहा, मी तुम्हांला अनुकूल आहे, मी तुमच्याकडे वळेन व तुमच्यावर नांगरणी-पेरणी होईल.


ह्यास्तव ते सकाळच्या अभ्रासारखे, लवकर उडून जाणार्‍या दहिवरासारखे होतील, खळ्यातून वावटळीने उडणार्‍या भुसाप्रमाणे, धुराड्यातून निघणार्‍या धुराप्रमाणे ते होतील.


मी इस्राएलास दहिवरासारखा होईन; तो भूकमलाप्रमाणे फुलेल, लबानोनाप्रमाणे मूळ धरील.


परमेश्वराने आपल्या लोकांची विनवणी ऐकून म्हटले : “पाहा, मी तुम्हांला धान्य, नवा द्राक्षारस व तेल पाठवून देतो, त्यांनी तुम्ही तृप्त व्हाल; ह्यापुढे राष्ट्रांमध्ये मी तुम्हांला निंदास्पद करणार नाही.


वनपशूंनो, भिऊ नका, कारण वनातली कुरणे हिरवी होत आहेत, झाडे फळे देत आहेत, अंजिराचे झाड व द्राक्षीचा वेल आपले सत्त्व देत आहेत.


तुम्ही माझ्या विधींप्रमाणे चालाल आणि माझ्या आज्ञा पाळून त्याप्रमाणे वागाल,


इस्राएलाचे अवशिष्ट जन काही अनिष्ट करणार नाहीत, लबाडी करणार नाहीत, त्यांच्या मुखात कपटी जिव्हा आढळायची नाही; ते चरतील व विश्रांती मिळवतील, कोणी त्यांना भेडसावणार नाही.”


म्हणून तुमच्यामुळे आकाशाने दहिवर आवरून धरले आहे, भूमीने आपला उपज आवरून धरला आहे.


ह्यास्तव आजपासून मागच्या म्हणजे नवव्या महिन्याच्या चोविसाव्या तारखेस परमेश्वराच्या मंदिराचा पाया घातला त्या मागच्या काळाकडे लक्ष पुरवा.


कोठारांत काही धान्य आले आहे काय? द्राक्षलता, अंजिराचे झाड, डाळिंब व जैतून ह्यांना काही फळ आले नाही. आजच्या दिवसापासून मी तुम्हांला आशीर्वाद देईन.”


सेनाधीश परमेश्वर म्हणतो : त्या दिवसांत ह्या अवशिष्ट राष्ट्रांना ही गोष्ट अचंब्याची वाटते म्हणून माझ्याही दृष्टीने अचंब्याची होईल काय? असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


तुमच्या भूमीच्या पिकाची नासाडी होऊ नये म्हणून ते खाऊन टाकणार्‍यास मी तुमच्यासाठी धमकावीन; तुमच्या बागेतील द्राक्षलतांचे फळ अकाली गळणार नाही, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


तर तुम्ही पहिल्याने देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळवण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हांला मिळतील.


म्हणून माणसाविषयी कोणी अभिमान बाळगू नये. कारण सर्वकाही तुमचे आहे;


पर्जन्याप्रमाणे माझ्या बोधाची वृष्टी होवो, माझे भाषण दहिवराप्रमाणे ठिबको; कोवळ्या गवतावर जशी पावसाची झिमझिम, हिरवळीवर जशा पावसाच्या सरी, तसे ते वर्षो.


योसेफाविषयी तो म्हणाला, ‘परमेश्वर त्याच्या देशाला आशीर्वाद देवो, आकाशातल्या अमूल्य वस्तू, दहिवर आणि खाली पसरलेले जलाशय,


इस्राएल सुरक्षित राहतो; धान्य व द्राक्षारस ह्यांनी समृद्ध अशा प्रदेशी याकोबाचा झरा अलग उफाळत आहे, आणि त्याच्यावरचे आकाश दहिवर वर्षते.


पण शांती करणार्‍यांसाठी नीतिमत्त्वरूपी फळ देणारे बी शांतीत पेरले जाते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan