Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




जखर्‍या 7:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 यरुशलेम वसलेले व आबादीआबाद होते आणि त्याच्या सभोवतालची गावे, तसेच दक्षिणदेश व तळवट ह्यांत वस्ती होती तेव्हा परमेश्वराने पूर्वीच्या आपल्या संदेष्ट्याच्या द्वारे जी वचने पुकारून सांगितली ती ही नव्हत काय?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 याच गोष्टी सांगण्यासाठी परमेश्वराने फार पूर्वीच या आधीच्या संदेष्ट्यांच्या द्वारे घोषीत केले होते. जेव्हा यरूशलेम ही एक भरभराट झालेली आणि लोकांनी गजबजलेली नगरी होती, यरूशलेमेच्या भोवतालच्या गावात, नेगेबला व पश्चिमेकडील डोंगरपायथ्याशी वस्ती होती. तेव्हादेखील देवाने हीच वचने सांगितली होती.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 ज्यावेळी यरुशलेम आणि तिच्या सभोवतीची उपनगरात शांती व समृद्ध होती आणि नेगेव व दक्षिणेकडील तळवटीच्या प्रदेशातील लोकांचा तिथे जम बसला होता, त्यावेळीच याहवेहनी संदेष्ट्यांद्वारे लोकांना इशारा दिला नव्हता का?’ ”

Faic an caibideil Dèan lethbhreac




जखर्‍या 7:7
23 Iomraidhean Croise  

कान द्या, माझ्याकडे या; ऐका, म्हणजे तुमचा जीव वाचेल; आणि मी तुमच्याबरोबर सर्वकाळचा करार करीन, म्हणजे दाविदाला देऊ केलेले अढळ प्रसाद तुम्हांला देईन.


दक्षिणेतील नगरे बंद पडली आहेत ती उघडायला कोणी नाही; यहूदाला सर्वस्वी बंदिवान करून नेले आहे, तो पूर्णपणे बंदिवान झाला आहे.


यहूदाच्या नगरांतून, यरुशलेमेच्या परिसरातून बन्यामीन प्रांतांतून, तळवटीतून, डोंगरवटीतून व दक्षिणेतून ते येऊन होमबली, यज्ञबली, अन्नार्पण व धूप अर्पण करतील. असे ते परमेश्वराच्या मंदिरात स्तुत्यर्पणे आणतील.


तुझी सुखसोय असता मी तुझ्याबरोबर बोललो, तेव्हा तू म्हणालीस, ‘मी ऐकणार नाही.’ माझे म्हणणे ऐकू नये ही लहानपणापासून तुला खोड आहे.


बन्यामीन प्रांतात, यरुशलेमेच्या सभोवतालच्या प्रदेशांत, यहूदाच्या नगरांत, डोंगराळ प्रदेशातील नगरांत, मैदानातल्या नगरांत व दक्षिणेकडल्या नगरांत लोक पैसा देऊन शेते घेतील, त्यांची खरेदीखते करतील, त्यांवर शिक्का मारतील व साक्षीदार घेतील; कारण मी त्यांचा बंदिवास उलटवीन असे परमेश्वर म्हणतो.”


डोंगरवटीतल्या शहरांत, मैदानांतल्या शहरांत, दक्षिणेतल्या शहरांत, बन्यामिनाच्या प्रांतांत, यरुशलेमेच्या सभोवतालच्या प्रदेशांत आणि यहूदाच्या नगरांत मोजदाद करणार्‍याच्या हाती पुन्हा कळप जातील, असे परमेश्वर म्हणतो.


मी तर आपले सर्व सेवक जे संदेष्टे त्यांना तुमच्याकडे पाठवत आलो; मोठ्या निकडीने त्यांना तुमच्याकडे पाठवून सांगत असे की, ‘ह्या अमंगळ कर्माचा मला वीट आहे; ती करू नका’.


तर मी त्यांना एवढीच आज्ञा केली की, ‘माझे वचन ऐका, म्हणजे मी तुमचा देव होईन व तुम्ही माझे लोक व्हाल; तुमचे बरे व्हावे म्हणून जो सरळ मार्ग मी तुम्हांला सांगतो त्याने चाला.’


जर तुम्ही आपले मार्ग व आपली कृती पूर्णपणे सुधाराल, माणसामाणसांत खरा न्याय कराल,


पूर्वीच्या संदेष्ट्यांच्या द्वारे सेनाधीश परमेश्वराने आपल्या आत्म्याच्या द्वारे पाठवलेले नियमशास्त्र व वचने ऐकू नयेत म्हणून त्यांनी आपले मन पाषाणासारखे कठीण केले; ह्यास्तव सेनाधीश परमेश्वराचा त्यांच्यावर मोठा कोप झाला.


तुम्ही खातापिता तेव्हा आपल्यासाठीच खातपीत नाही काय?


मग परमेश्वराचे वचन जखर्‍यास प्राप्त झाले की,


आणि नेगेब व सोअरापर्यंतची तळवट म्हणजे खजुरीचे नगर यरीहो ह्याचे मैदान, हे सर्व परमेश्वराने त्याला दाखवले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan