Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




जखर्‍या 7:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 आणि सेनाधीश परमेश्वराच्या मंदिरात राहणारे याजक व संदेष्टे ह्यांना असे विचारण्यास पाठवले की, “आम्ही वर्षानुवर्ष करत आलो तसे पाचव्या महिन्यात एकान्ती बसून रुदन करावे काय?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 ते संदेष्ट्यांना आणि सेनाधीश परमेश्वराच्या मंदिरातील याजकांना म्हणाले: “प्रत्येक वर्षाच्या पाचव्या महिन्यात आम्ही उपवास करून शोक प्रकट करत आहोत. हे आम्ही असेच चालू ठेवायचे का?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 सर्वसमर्थ याहवेहच्या मंदिराच्या याजकांना आणि संदेष्ट्यांना विचारून, “मी इतकी वर्षे करत आलो त्याप्रमाणे मी पाचव्या महिन्यात शोक व उपवास करावा काय?”

Faic an caibideil Dèan lethbhreac




जखर्‍या 7:3
21 Iomraidhean Croise  

बांधकाम करणार्‍यांनी परमेश्वराच्या मंदिराचा पाया घातला तेव्हा इस्राएलाचा राजा दावीद ह्याने लावून दिलेल्या क्रमाप्रमाणे परमेश्वराचे स्तवन करण्यास आपले पोशाख ल्यालेले व हाती कर्णे घेतलेले याजक आणि हाती झांजा घेतलेले आसाफ वंशातले लेवी ह्यांना उभे केले.


रडण्याचा समय व हसण्याचा समय; शोक करण्याचा समय व नृत्य करण्याचा समय असतो;


ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झाला आहे. तू ज्ञानाचा अव्हेर केलास म्हणून मीही तुझा अव्हेर करीन; म्हणजे अर्थात मी याजकाचे काम तुला करू देणार नाही; तू आपल्या देवाचे नियमशास्त्र विसरलास म्हणून मीही तुझ्या मुलांना विसरेन.


देवडी व वेदी ह्यांच्यामध्ये याजक, परमेश्वराचे सेवक, रुदन करत म्हणोत, ‘हे परमेश्वरा, आपल्या लोकांवर करुणा कर; आपल्या वतनाची अप्रतिष्ठा होऊ देऊ नकोस; होऊ देशील तर राष्ट्रे त्याची निर्भर्त्सना करतील; ‘त्यांचा देव आता कोठे गेला’ असे राष्ट्रांनी का म्हणावे?”’


सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “याजकांना शास्त्राचा अर्थ विचारा की,


मग सेनाधीश परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की,


“तू ह्या देशातील सर्व लोकांना व याजकांना विचार : तुम्ही सत्तर वर्षे पाचव्या व सातव्या महिन्यात उपोषण व रुदन केले तेव्हा खरोखर माझ्यासाठी उपोषण केले काय?


“सेनाधीश परमेश्वर म्हणतो, चौथ्या, पाचव्या, सातव्या व दहाव्या महिन्यातले उपास यहूदाच्या घराण्यास हर्ष व आनंद देणारे होतील; ते आनंदाच्या उत्सवांचे दिवस होतील; म्हणून सत्य व शांती ह्यांची आवड धरा.


कारण याजकाच्या वाणीच्या ठायी ज्ञान असावे, त्याच्या तोंडून नियमशास्त्र ऐकण्यास लोकांनी आतुर असावे; कारण तो सेनाधीश परमेश्वराचा निरोप्या आहे;


येशू त्यांना म्हणाला, “वर्‍हाड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत ते शोक करणे शक्य आहे काय? तरी असे दिवस येतील की, वर त्यांच्यापासून काढून घेतला जाईल, तेव्हा ते उपास करतील.


एकमेकांशी वंचना करू नका, तरी उपास व प्रार्थनेसाठी प्रसंग मिळावा म्हणून पाहिजे असल्यास काही वेळ परस्पर संमतीने एकमेकांपासून दूर राहा. मग पुन्हा एकत्र व्हा, अशा हेतूने की, तुमच्या असंयमामुळे सैतानाने तुम्हांला परीक्षेत पाडू नये.


ते याकोबाला तुझे नियम व इस्राएलाला तुझे नियमशास्त्र शिकवतील; ते तुला धूपाचा सुवास अर्पण करतील, तुझ्या वेदीवर नि:शेष होमबली अर्पण करतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan