Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




जखर्‍या 6:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 काळे घोडे असलेला रथ उत्तर देशाकडे जात आहे; पांढरे घोडे त्यांच्या मागून (पश्‍चिम देशाकडे) जात आहेत; कबरे घोडे दक्षिण देशाकडे जात आहेत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 काळे घोडे उत्तर देशाला, पांढरे घोडे पश्चिम देशाला व ठिपके असलेले राखाडी घोडे दक्षिण देशाला जात आहेत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 काळ्या घोड्यांचा रथ उत्तरेला जाईल आणि पांढर्‍या घोड्यांचा रथ पश्चिमेकडे, पंचरंगी घोड्यांचा रथ दक्षिणेकडे जाईल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




जखर्‍या 6:6
14 Iomraidhean Croise  

दक्षिणेतल्या पशूंविषयीची देववाणी : ज्यात सिंहीण व सिंह, सर्प व उडता आग्या साप ही असतात अशा कष्टमय व संकटमय देशात जवान गाढवांच्या पाठीवर आपली दौलत व उंटांच्या मदारींवर आपले खजिने लादून ज्याच्यापासून काही लाभ होणार नाही अशा राष्ट्राकडे ते घेऊन जातात.


मी उत्तरेला म्हणेन, ‘देऊन टाक’; दक्षिणेला म्हणेन, ‘अटकाव करू नकोस’; माझे पुत्र दुरून व माझ्या कन्या दिगंतापासून घेऊन या;


म्हणून पाहा, मी उत्तरेकडील सर्व राष्ट्रांना व माझा सेवक बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याला बोलावून आणतो, असे परमेश्वर म्हणतो; त्यांना या देशावर, त्यातील रहिवाशांवर आणि आसपासच्या सर्व राष्ट्रांवर आणतो; मी त्यांचा अगदी नाश करून ती विस्मयास व उपहासास पात्र आणि कायमची उजाड करीन.


सीयोनेच्या दिशेकडे ध्वजा उभारा; आश्रयासाठी पळा, थांबू नका, कारण मी उत्तरेकडून अरिष्ट, मोठा नाश आणत आहे.


तो दिवस प्रभू सेनाधीश परमेश्वर ह्याचा आहे, आपल्या शत्रूंवर सूड उगवण्याचा तो दिवस आहे. तलवार खाऊन तृप्त होईल, ती त्यांचे रक्त पोटभर पिईल; कारण प्रभू, सेनाधीश परमेश्वर ह्याने उत्तरेच्या देशात फरात नदीच्या तीरी यज्ञ मांडला आहे.


आकाश व पृथ्वी आणि त्यांतील सर्वकाही बाबेलवर जयजयकार करतील; कारण त्याचा विध्वंस करणारे उत्तरेकडून येत आहेत असे परमेश्वर म्हणतो.


बन्यामीनवंशजहो, यरुशलेमेतून रक्षणार्थ पळून जा, तकोवात रणशिंग फुंका, बेथ-हक्करेमावर ध्वज उभारा; कारण उत्तरेकडून अरिष्ट व मोठा नाश डोकावत आहे.


मी पाहिले तो उत्तरेकडून तुफानाचा वारा सुटला, तेव्हा एक विशाल मेघ येत असून त्यामध्ये लपेटलेला एक अग्निगोल होता; त्याभोवती प्रभा फाकली असून अग्नीच्या मध्यभागातून तृणमण्याच्यासारखे तेज झळकत होते.


अंतसमयी दक्षिणेचा राजा त्याला टक्कर देईल; उत्तरेचा राजा रथ, स्वार व पुष्कळ तारवे घेऊन वावटळीसारखा त्याच्यावर येईल; तो अनेक देशात शिरेल व त्यांना पादाक्रांत करून पार निघून जाईल.


तो दक्षिणेच्या राजाच्या मुलखात जाईल आणि तेथून स्वदेशी परतेल.


त्याने तिसरा शिक्का फोडला, तेव्हा तिसरा प्राणी, “ये”, असे म्हणाला, ते मी ऐकले. मग मी पाहिले तो एक ‘काळा घोडा’, आणि त्याच्यावर बसलेला कोणीएक माझ्या दृष्टीस पडला; त्याच्या हातात तराजू होते;


Lean sinn:

Sanasan


Sanasan