Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




जखर्‍या 6:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 पुन्हा मी आपले डोळे वर केले तेव्हा पाहा, दोन पर्वतांमधून चार रथ येत आहेत असे दिसले; ते पर्वत पितळेचे होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 मग मी वळून आपले डोळे वर करून बघितले तेव्हा दोन पर्वतांमधून चार रथ जातांना दिसले. ते पर्वत पितळेचे होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 मग मी पुन्हा वर पाहिले, तो दोन पर्वतांमधून चार रथ येत असलेले मला दिसले. ते पर्वत कास्याचे होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




जखर्‍या 6:1
22 Iomraidhean Croise  

अलीशाने प्रार्थना केली की, “हे परमेश्वरा, ह्याचे डोळे उघड, ह्याला दृष्टी दे.” परमेश्वराने त्या तरुणाचे डोळे उघडले, तो पाहा, अलीशाच्या सभोवतालचा डोंगर अग्नीचे घोडे व रथ ह्यांनी व्यापून गेला आहे असे त्याला दिसले.


त्याने कोणाला शांतिसमाधान दिले तर त्याला कोण दोष देईल? त्याने तोंड फिरवले तर त्याचे दर्शन कोणाला होईल? हे राष्ट्रासंबंधाने असो की एका व्यक्तीसंबंधाने असो, सारखेच;


परमेश्वराची योजना सर्वकाळ टिकते; त्याच्या मनातील संकल्प पिढ्यानपिढ्या कायम राहतात.


तुझे नीतिमत्त्व महान1 पर्वतांसारखे आहे; तुझे निर्णय अथांग महासागरासारखे आहेत; हे परमेश्वरा, तू मनुष्य व पशू ह्यांचा प्रतिपाळ करतोस.


परमेश्वरापुढे शहाणपण, बुद्धी व युक्ती ही मुळीच चालत नाहीत.


“येथून पुढेही मीच तो आहे; माझ्या हातातून कोणाला सोडवून घेता येणार नाही; मी करतो ते कोणाच्याने पालटवणार?”


कारण पाहा, आपला क्रोध अग्नीच्या द्वारे प्रकट करावा, आपल्या धमकीबरोबर ज्वाला निघाव्यात म्हणून परमेश्वर अग्नीतून येईल, त्याचे रथ वावटळीसमान असतील.


पाहा, ढगांप्रमाणे तो येत आहे, त्याचे रथ वादळाप्रमाणे आहेत; त्याचे घोडे गरुडांपेक्षा वेगवान आहेत. आम्ही हायहाय करणार, आमचे वाटोळे झाले आहे!


तरीपण ह्याचे बुंध जमिनीत राहू द्या; ह्याला लोखंड व पितळ ह्यांच्या पट्ट्याने बांधून रानातल्या कोवळ्या गवतात राहू द्या; ह्याला आकाशातल्या दहिवराने भिजू द्या; भूमीवरील गवताचा वाटा ह्याला वनपशूंबरोबर मिळो;


पृथ्वीवरील सर्व रहिवासी केवळ क:पदार्थ होत; तो आकाशातील आपल्या सैन्याचे व पृथ्वीवरील रहिवाशांचे इच्छेस येईल ते करतो; “तू असे काय करतोस?” असे त्याचा हात धरून कोणाच्याने त्याला म्हणवत नाही.


एक शिंग मोडून त्याच्या जागी चार शिंगे निघाली ह्याचा अर्थ असा की त्या राज्यातून चार राज्ये उद्भवतील; मग त्यांचे बल पहिल्या राज्याइतके राहायचे नाही.


मी पुन्हा डोळे वर करून पाहिले तेव्हा पाहा, एक उडता पट दृष्टीस पडला.


दिव्यदूताने मला उत्तर केले, “हे आकाशातले चार वारे1 आहेत; ते अखिल पृथ्वीच्या प्रभूच्या हुजुरास असून आता बाहेर निघत आहेत.


ह्यासाठी की, जे काही घडावे म्हणून तू स्वहस्ते व स्वसंकल्पाने पूर्वी योजले होते ते त्यांनी करावे.


आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे जो अवघे चालवतो त्याच्या योजनेप्रमाणे आम्ही पूर्वी नेमलेले असून ख्रिस्ताच्या ठायी वतनदार1 झालो आहोत;


तो कंगालांना धुळीतून उठवतो, दरिद्र्यांना उकिरड्यावरून उचलून उभे करतो, म्हणजे मग ते सरदारांच्या शेजारी बसतात, आणि वैभवी सिंहासन त्यांना प्राप्त होते; कारण पृथ्वीचे आधारस्तंभ परमेश्वराच्या हातचे आहेत, त्यांवर त्याने दुनिया ठेवली आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan