Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




जखर्‍या 5:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 मग मी डोळे वर करून पाहिले तेव्हा पाहा, दोन स्त्रिया निघाल्या, त्यांच्या पंखांत वारा भरला होता; त्यांचे पंख करकोच्याच्या पंखांसारखे होते; त्यांनी ती एफा उचलून आकाश व पृथ्वी ह्यांच्या मधल्या मार्गाने नेली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 नंतर मी माझे डोळे वर केले व पाहिले, तर मला करकोच्यासारखे पंख असलेल्या दोन स्त्रिया दिसल्या. त्या उडाल्या, त्यांच्या पंखात वारा भरला होता. त्यांनी ती टोपली उचलून आकाश व पृथ्वी यांच्या मधून नेली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 मग मी वर बघितले—आणि मला दोन स्त्रिया उडतांना दिसल्या, त्यांच्या पंखात वारा भरलेला होता! त्यांचे पंख करकोचाच्या पंखांप्रमाणे होते आणि त्यांनी ती टोपली आकाश व पृथ्वीच्या मध्ये उचलली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




जखर्‍या 5:9
9 Iomraidhean Croise  

त्यांवर पक्षी आपली घरटी बांधतात; करकोचाचे घर देवदारूंमध्ये असते.


आकाशातील करकोची आपला नेमलेला समय जाणते; होला, निळवी व सारस आपल्या येण्याच्या वेळचे स्मरण ठेवतात; पण माझे लोक परमेश्वराचा निर्णय ओळखत नाहीत.


मुखाला कर्णा लाव. गरुडासारखा तो परमेश्वराच्या मंदिरावर उतरेल, कारण त्यांनी माझा करार मोडला आहे, माझ्या नियमशास्त्राचे त्यांनी अतिक्रमण केले आहे.


पक्ष्यांपैकी ओंगळ समजून खाऊ नयेत ते हे, कारण ते ओंगळ आहेत : गरुड, लोळणारा गीध, कुरर,


करकोचा, निरनिराळ्या जातींचे बगळे,3 टिटवी आणि वाघूळ.


मग माझ्याबरोबर भाषण करणार्‍या दिव्यदूताला मी विचारले, “ते ती एफा घेऊन कोठे जात आहेत?”


जेथे प्रेत असेल तेथे गिधाडे जमतील.


दुरून, पृथ्वीच्या सीमेवरून गरुडाप्रमाणे झेप घेणारे राष्ट्र परमेश्वर तुझ्यावर आणील; त्याची भाषा तुला समजणार नाही;


Lean sinn:

Sanasan


Sanasan