Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




जखर्‍या 5:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 मग तो म्हणाला, “ही स्त्री दुष्टता आहे.” तेव्हा त्याने तिला एफामध्ये कोंबून तोंडावर शिशाचे वाटोळे झाकण बसवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 देवदूत म्हणाला, “ही स्त्री दुष्टता आहे!” मग त्याने त्या तिला मापन-टोपलीच्या मध्यभागी टाकले आणि त्याने शिशाचे वजन मापन-टोपलीच्या मुखावर टाकले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 याहवेहचा स्वर्गदूत म्हणाला, “ती दुष्टाई आहे.” असे म्हणून त्याने तिला पुन्हा त्या टोपलीत ढकलले आणि त्या टोपलीचे शिसाचे झाकण बंद केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




जखर्‍या 5:8
11 Iomraidhean Croise  

तुझ्या चौथ्या पिढीचे लोक इकडे माघारी येतील, कारण अमोरी लोकांच्या पापाचा घडा अद्यापि भरला नाही.


कारण माझे अपराध माझ्या डोक्यावरून गेले आहेत; जड ओझ्याप्रमाणे ते मला फार भारी झाले आहेत.


दुर्जनाला त्याची स्वत:चीच दुष्कर्मे पछाडतात; तो आपल्याच पापाच्या पाशात सापडतो.


माझ्या अपराधांचे जू त्याने आपल्या हातांनी जखडले आहे; माझे अपराध एकत्र गुंफले आहेत; ते माझ्या मानेला लागले आहेत; त्याने माझे बळ खचवले आहे; ज्यांच्यापुढे मला उठता येत नाही अशांच्या हाती प्रभूने मला दिले आहे.


कनानाच्या1 हाती खोटा ताजवा आहे; जुलूम करणे त्याला आवडते.


तुम्ही म्हणता, “चंद्रदर्शन कधी आटोपेल? म्हणजे आम्हांला धान्य विकता येईल; शब्बाथ केव्हा संपेल म्हणजे आम्ही गहू बाहेर काढू, एफा लहान करू, शेकेल मोठा करू व खोट्या तागडीने फसवू;


दगलबाजीची तागडी ठेवून, खोट्या वजनांची थैली बाळगून मी शुद्ध ठरणार काय?


मी आणखी पाहिले तेव्हा शिशाचे वाटोळे झाकण काढले असून एफामध्ये एक स्त्री बसलेली आहे असे माझ्या दृष्टीस पडले.


तेव्हा तुम्ही आपल्या पूर्वजांचे माप भरा.


परराष्ट्रीयांचे तारण व्हावे म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर बोलतो, ते बोलण्याची ते मनाई करतात; हे ह्यासाठी की, त्यांनी आपल्या पापांचे माप सर्वदा भरत राहावे. त्यांच्यावरील क्रोधाची परिसीमा झाली आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan