Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




जखर्‍या 5:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 तो मला म्हणाला, “ह्या सर्व देशाला प्राप्त होणारा शाप तो हा पट आहे; चोरी करणार्‍या सर्वांना ह्या लेखानुसार एका बाजूने घालवतील व खोटी शपथ वाहणार्‍या सर्वांना ह्या लेखानुसार दुसर्‍या बाजूने घालवतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 तेव्हा देवदूताने मला सांगितले, “त्या पटावर एक शाप लिहिला आहे आणि त्यावरील लेखानुसार प्रत्येक चोर यावरील एका बाजूस लिहीलेल्या शापानुसार देशातून घालवला जाईल आणि दुसऱ्या बाजूवरील लेखानूसार खोटी शपथ वाहणाऱ्या प्रत्येकाला देशातून घालवले जाईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 मग तो मला म्हणाला, “हा तो शाप आहे, जो या सर्व भूमीवर येणार आहे; चर्मपत्राच्या गुंडाळीच्या एका बाजूस जे लिहिलेले आहे ते असे, देशातून प्रत्येक चोर घालवून दिला जाईल आणि दुसर्‍या बाजूस म्हटले आहे, जो कोणी शपथ घेऊन खोटे बोलतो, त्या दोषीलाही देशातून घालवून दिले जाईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




जखर्‍या 5:3
42 Iomraidhean Croise  

चोरी करू नकोस.


चोराचा भागीदार आपल्या आत्म्याचा द्वेष्टा होय; तो शपथ ऐकतो तरी काही सांगत नाही.


परमेश्वराचा शाप दुर्जनांच्या घरावर असतो; पण नीतिमानांच्या वस्तीला तो आशीर्वाद देतो.


माझी अतितृप्ती झाल्यास मी कदाचित तुझा अव्हेर करीन, आणि “परमेश्वर कोण आहे?” असे म्हणेन; मी दरिद्री राहिल्यास कदाचित चोरी करीन, आणि माझ्या देवाच्या नामाची निंदा करीन.


ह्यास्तव पृथ्वी शापाने ग्रासली आहे, तिचे रहिवासी पापाचे फळ भोगत आहेत; पृथ्वीचे रहिवासी जळून भस्म झाले आहेत, मानव थोडेच उरले आहेत.


म्हणून मी पवित्र अधिपतींना अपवित्र ठरवले, याकोबाला शापवश व इस्राएलास निंदावश केले आहे.


हे याकोबाच्या घराण्या, ऐक, तुला इस्राएल हे नाव आहे, तू यहूदाच्या झर्‍यातून निघाला आहेस; तू परमेश्वराच्या नामाची शपथ वाहतोस व इस्राएलाच्या देवाचे स्तवन करतोस, पण सत्याने व नीतिमत्तेने नव्हे.


कारण जारकर्म्यांनी देश व्यापला आहे; शापामुळे भूमी शोक करीत आहे; रानातील कुरणे वाळली आहेत; लोकांची गती वाईट आहे, त्यांचा पराक्रम म्हटला तर अधर्म;


तर मी हे मंदिर शिलोसारखे करीन, आणि हे नगर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांना शापमूलक करीन.”’


“परमेश्वराच्या जीविताची शपथ,” असे ते म्हणतात, तरी ती शपथ खोटी आहे.


हे काय? तुम्ही चोरी, खून, व्यभिचार करता, खोटी शपथ वाहता, बआलाच्या मूर्तीला धूप दाखवता व ज्यांना तुम्ही ओळखत नाही अशा अन्य देवांच्या मागे लागता


मी पाहिले तेव्हा माझ्याकडे एक हात पुढे झाला; आणि पाहा, त्या हातात ग्रंथाचा पट होता;


सर्व इस्राएल लोकांनी तुझ्या नियमशास्त्राचे उल्लंघन केले आहे; त्यांनी पराङ्मुख होऊन तुझी वाणी ऐकली नाही; म्हणून आमच्यावर शापाचा वर्षाव झाला आहे; देवाचा सेवक मोशे ह्याच्या नियमशास्त्रात लिहिलेल्या शपथेप्रमाणे झाले आहे. कारण आम्ही त्याच्याविरुद्ध पाप केले आहे.


शपथ वाहून ती मोडणे, मनुष्यवध करणे, चोरी करणे, व्यभिचार करणे ह्यांना ऊत आला आहे; रक्तपातामागून रक्तपात होत आहेत.


तुम्ही चोरी करू नये, एकमेकांशी कपटाने वागू नये व लबाडी करू नये.


माझ्या नावाची खोटी शपथ वाहून आपल्या देवाच्या नावाला कलंक लावू नये, मी परमेश्वर आहे.


परमेश्वराचे असे म्हणणे आहे की, “हे जे आपल्या महालात बलात्कार व विध्वंस ह्यांच्या योगे धनसंचय करतात त्यांना सरळ आचरण करण्याचे ठाऊक नाही.”


सेनाधीश परमेश्वर म्हणतो, मी हा पट चालवला आहे, तो चोराच्या घरात व माझ्या नामाची खोटी शपथ घेणार्‍याच्या घरात शिरेल; तो त्याच्या घरात बिर्‍हाड करून राहील आणि त्याच्या तुळयांचे व चिर्‍यांचे भस्म करील.”


तुम्ही कोणी मनात आपल्या शेजार्‍याचे अनिष्ट चिंतू नका; खोट्या शपथेची आवड धरू नका; कारण ह्या सर्वांचा मला तिटकारा आहे, असे परमेश्वर म्हणतो.


मी न्याय करायला तुमच्याकडे येईन; आणि जादूगार, व्यभिचारी, खोटे साक्षी ह्यांच्याविरुद्ध आणि मजुरांची मजुरी अडकवून ठेवणारे, विधवा व अनाथ ह्यांच्यावर जुलूम करणारे, आणि मला न भिता परक्याला न्याय मिळू न देणारे ह्यांच्याविरुद्ध साक्ष देण्याची मी त्वरा करीन.


तो वडिलांचे हृदय त्यांच्या पुत्रांकडे व पुत्रांचे हृदय त्यांच्या वडिलांकडे वळवील; नाहीतर कदाचित मी येईन आणि भूमीला शापाने ताडन करीन.”


मग डावीकडच्यांनाही तो म्हणेल, ‘अहो शापग्रस्तहो, माझ्यापुढून निघा आणि सैतान व त्याचे दूत ह्यांच्यासाठी जो सार्वकालिक अग्नी सिद्ध केला आहे त्यात जा.


कारण तो अवघ्या ‘पृथ्वीच्या’ पाठीवर ‘राहणार्‍या’ सर्व ‘लोकांवर’ त्याप्रमाणे येईल.


चोरी करणार्‍याने पुन्हा चोरी करू नये; तर त्यापेक्षा गरजवंताला देण्यास आपल्याजवळ काही असावे म्हणून जे चांगले ते आपल्या हातांनी करून उद्योग करत राहावे.


आणि हेही ठाऊक आहे की, नियमशास्त्र नीतिमानांसाठी केलेले नाही, तर अधर्मी व अनावर, भक्तिहीन व पापी, अपवित्र व अमंगळ, बापाला ठार मारणारे व आईला ठार मारणारे, मनुष्यहत्या करणारे,


माझ्या बंधूंनो, मुख्यत: शपथ वाहू नका; स्वर्गाची, पृथ्वीची, किंवा दुसरी कशाचीही शपथ वाहू नका; तुम्ही दोषी ठरू नये म्हणून तुम्हांला ‘होय’ म्हणायचे तर ‘होय’ म्हणा; ‘नाही’ म्हणायचे तर ‘नाही’ म्हणा.


पाहा, ज्या कामकर्‍यांनी तुमची शेते कापली त्यांची ‘तुम्ही’ अडकवून ठेवलेली ‘मजुरी ओरडत आहे;’ आणि कापणी करणार्‍यांचा आक्रोश ‘सेनाधीश प्रभूच्या कानी’ गेला आहे.


त्यांच्याशी आम्ही असेच वागणार; त्यांना आम्ही जीवदान देणार; तसे न केल्यास त्यांच्याशी शपथ वाहिल्यामुळे आम्ही क्रोधास पात्र ठरू.”


परंतु भेकड, विश्वास न ठेवणारे, अमंगळ, ‘खून करणारे,’ जारकर्मी, चेटकी, मूर्तिपूजक, व सर्व लबाड माणसे ह्यांच्या वाट्यास ‘अग्नीचे व गंधकाचे’ सरोवर येईल; हेच ते दुसरे मरण आहे.”


कुत्रे, चेटकी, जारकर्मी, खून करणारे, मूर्तिपूजक, लबाडीची आवड धरणारे, व लबाडी करणारे सर्व लोक बाहेर राहतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan