Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




जखर्‍या 4:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 तर कार्याच्या अल्पारंभाचा दिवस कोणी तुच्छ मानतो काय? ते सात डोळे जरूब्बाबेलच्या हातातील ओळंबा आनंदाने पाहतील; ते परमेश्वराचे डोळे जगभर फिरत असतात.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 लहानशा आरंभाच्या दिवसास कोणी तुच्छ लेखले आहे काय? हे सात दिवे म्हणजे सर्व दिशांना पाहणारे परमेश्वराचे डोळेच होत. ते पृथ्वीवरील सर्वकाही पाहतात. आणि ते जरुब्बाबेलाच्या हाती ओळंबा पाहतील व हे लोक मोठा आनंद करतील”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 “ही सुरुवात अगदी लहान असली तरी तिला तुच्छ मानण्यास कोण धजावेल, कारण याहवेहचे सात नेत्र संपूर्ण पृथ्वीभर फिरतात व जरूब्बाबेलाच्या हातात शिखरशिला आहे, हे पाहून हर्षाने प्रफुल्लित होतात?”

Faic an caibideil Dèan lethbhreac




जखर्‍या 4:10
26 Iomraidhean Croise  

परमेश्वराचे नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करीत असतात, जे कोणी सात्त्विक चित्ताने त्याच्याशी वागतात त्यांचे साहाय्य करण्यात तो आपले सामर्थ्य प्रकट करतो. हा तू मूर्खपणा केलास म्हणून ह्यापुढे तुझ्यामागे लढाया लागणार.”


तुझा आरंभ अल्प असला तरी तुझा शेवट समृद्धीचा होईल.


तो आपल्या निवासस्थानातून पृथ्वीवर राहणार्‍या सर्वांना न्याहाळून पाहतो.


परमेश्वराचे नेत्र सर्वत्र आहेत. ते बरेवाईट पाहत असतात.


परंतु नीतिमानांचा मार्ग मध्यान्हापर्यत उत्तरोत्तर वाढणार्‍या उदयप्रकाशासारखा आहे.


म्हणजे तुम्ही तिचे स्तन चोखून तृप्त व्हाल, सांत्वन पावाल व तिचे विपुल वैभव भोगून संतुष्ट व्हाल.”


ते पाहून तुमचे हृदय आनंदित होईल, कोवळ्या हिरवळीप्रमाणे तुमची हाडे तरतरीत होतील; परमेश्वराचा हात त्याच्या सेवकांच्या ठायी प्रकट होईल आणि त्याचा क्रोध शत्रूंवर होईल.


कारण माझे डोळे त्यांच्या सर्व मार्गांवर आहेत; ते मला गुप्त नाहीत; त्यांचे दुष्कर्म माझ्या डोळ्यांपासून लपलेले नाही.


ते प्राणी विजेसारखे नागमोडीच्या गतीने इकडून तिकडे धावत.


चला, आपण परमेश्वरास ओळखू; परमेश्वराचे ज्ञान मिळवण्यास झटू; त्याचा उदय अरुणोदयाप्रमाणे निश्‍चित आहे; तो पर्जन्याप्रमाणे भूमी शिंपणार्‍या वळवाच्या पर्जन्याप्रमाणे आमच्याकडे येईल.”


आणि असे झाले की त्यांनी देशातील झाडपाला खाऊन फस्त केला तेव्हा मी म्हणालो, “हे प्रभू परमेश्वरा, मी विनंती करतो, क्षमा कर, याकोबाचा कसा टिकाव लागेल? कारण तो दुर्बळ आहे.”


तेव्हा मी म्हणालो, “हे प्रभू परमेश्वरा, मी विनंती करतो की हे थांबव; याकोबाचा कसा टिकाव लागेल, कारण तो दुर्बळ आहे!”


‘ज्याने ह्या मंदिराचे पूर्वीचे वैभव पाहिले आहे असा तुमच्यामध्ये कोणी उरला आहे काय? आता त्याची काय दशा तुम्हांला दिसते? ते शून्य झाले आहे असे तुमच्या नजरेस पडत नाही काय?


मी यहोशवापुढे ठेवलेला चिरा पाहा; एका चिर्‍याला सात डोळे आहेत, पाहा, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, मी त्यावर नक्षी खोदीन व त्या देशाचा अधर्म एका दिवसात दूर करीन.


हद्राख देशाविषयी परमेश्वराची वाणी : ती दिमिष्कास पोचवून तेथे स्थिर होईल; कारण परमेश्वराची नजर मनुष्यजातीकडे व इस्राएलाच्या सर्व वंशांकडे आहे;


तरी उत्सव आणि आनंद करणे योग्य आहे; कारण हा तुझा भाऊ मेला होता, तो जिवंत झाला आहे; हरवला होता, तो सापडला आहे.”’


तेव्हा राजासन व चार प्राणी ह्यांच्यामध्ये व वडीलमंडळ ह्यांच्यामध्ये, ज्याचा जणू काय ‘वध करण्यात’ आला होता, असा ‘कोकरा’ उभा राहिलेला मी पाहिला; त्याला सात शिंगे व ‘सात डोळे होते;’ ते ‘सर्व पृथ्वीवर’ पाठवलेले देवाचे सात आत्मे आहेत.


तेव्हा देवासमोर उभे राहिलेले सात देवदूत मी पाहिले. त्यांना सात कर्णे देण्यात आले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan