Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




जखर्‍या 2:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 “पाहा, मी आपला हात त्यांच्यावर उगारीन, व त्यांची सेवा करणारे त्यांना लुटतील; तेव्हा तुम्हांला समजेल की, सेनाधीश परमेश्वराने मला पाठवले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 “मी आपला हात त्यांच्यावर उगारीन, आणि ते त्यांच्या गुलामांसाठी लूट होतील तेव्हा तुम्हास कळेल की सेनाधीश परमेश्वराने मला पाठवले आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 मी निश्चितच त्यांच्याविरुद्ध माझा हात उगारेन, म्हणजे त्यांचेच गुलाम त्यांची लुटालूट करतील. मग तुम्हाला कळेल की सर्वसमर्थ याहवेहने मला पाठविले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




जखर्‍या 2:9
30 Iomraidhean Croise  

त्याचा आजचा मुक्काम नोबास आहे; तो सीयोनकन्येच्या डोंगराला, यरुशलेमेच्या टेकडीला, हाताने धमकावत आहे.


परमेश्वर मिसरी समुद्राची खाडी नष्ट करील; तो आपला उष्ण श्वास सोडून आपला हात नदावर (फरातावर) परजील; त्यावर प्रहार करून त्याचे सात फाटे करील; त्यांवरून लोकांना जोडे घालून जाता येईलसे करील.


अगे सीयोननिवासिनी, जयघोष कर, गजर कर; इस्राएलाचा पवित्र प्रभू तुझ्या ठायी थोर आहे.”


उघड्या डोंगरावर ध्वज उभारा, लोकांना मोठ्याने हाका मारा; हाताने खुणवा म्हणजे ते सरदारांच्या वेशीत प्रवेश करतील.


विदेशी लोक त्यांना नेऊन स्वस्थानी पोचवतील; आणि इस्राएलाचे घराणे परमेश्वराच्या भूमीत त्यांना दासदासी करून ठेवील; ज्यांनी त्यांना बंदिवान करून नेले होते त्यांना ते बंदीत ठेवतील; असे ते आपणांस पिडणार्‍यांवर स्वामित्व करतील.


त्या काळी मिसरी लोक बायकांसारखे होतील; सेनाधीश परमेश्वर त्यांच्यावर आपला हात उगारील त्यामुळे ते थरथर कापतील व भयभीत होतील.


त्या दिवशी यहूदा देशात हे गीत गातील : आमचे नगर तटबंदी केलेले आहे; तारण हेच त्याचे कोट व तट नेमले आहेत.


अरे लुटार्‍या, तुला लुटले नाही; अरे ठका, तुला ठकवले नाही; तुला धिक्कार असो! तुझे लुटणे आटपले म्हणजे तुला लुटतील; तुझे ठकवणे आटपले म्हणजे तुला ठकवतील.


आणखी तेथे आमच्यासाठी प्रतापी परमेश्वराचा निवास होईल; ते रुंद नदीनाल्याचे ठिकाण होईल; त्यात वल्ह्याच्या तारवाचा, मोठ्या जहाजाचा प्रवेश होणार नाही.


तुझे दोर ढिले पडले आहेत; ते डोलकाठीचा आधार स्थिर राखत नाहीत; ते शीड पसरत नाहीत; ते विपुल लूट वाटतात; लंगडेही लूट करतात.


आणि परमेश्वर सीयोन डोंगराच्या प्रत्येक स्थानावर व त्याच्या सणामेळ्यांवर दिवसा धूम्रमय मेघ व रात्री प्रज्वलित अग्नीचा प्रकाश निर्माण करील; कारण त्याच्या सर्व वैभवावर छत्र होईल.


तुम्ही माझ्याजवळ या, हे ऐका; प्रारंभापासून मी गुप्तपणे बोललो नाही; ते होऊ लागल्यापासून तेथे मी आहेच.” आणि आता प्रभू परमेश्वराने मला व आपल्या आत्म्याला पाठवले आहे.


ह्यापुढे तुझ्या देशात कसलाही जुलूम अगर तुझ्या सीमांच्या आत उजाडी व नाश ह्यांचे नावही ऐकू येणार नाही; तारण माझा कोट व कीर्ती माझी वेस आहे असे तू म्हणशील.


ह्यापुढे दिवसा प्रकाश देण्यास तुला सूर्याची, रात्री प्रकाश देण्यास तुला चंद्राची गरज लागणार नाही, कारण परमेश्वर तुझा सार्वकालिक दीप होईल, तुझा देव तुझे तेज होईल.


सर्व राष्ट्रे त्याची सेवा करतील, त्याच्या पुत्रपौत्रांचीही सेवा करतील; मग त्याच्या देशाची वेळ येईल तेव्हा बहुत राष्ट्रे व थोर राजे त्याच्याकडून सेवा करवून घेतील.


कोणी संदेष्टा शांतीचा संदेश देतो तेव्हा त्या संदेष्ट्याचे वचन प्रत्ययास आले म्हणजे समजावे की खरोखर परमेश्वराने त्याला पाठवले आहे.”


पाहा, दूर देशातून माझ्या लोकांच्या कन्येची आरोळी ऐकू येते की, “सीयोनेत परमेश्वर नाही ना? त्यात तिचा राजा नाही ना?” “त्यांनी आपल्या मूर्तींनी व परक्या खोट्या दैवतांनी मला का चिडवले आहे?”


ते रानातून लाकडे आणणार नाहीत, जंगलांतले लाकूड तोडणार नाहीत; तर ही शस्त्रे ते जाळतील; त्यांना ज्यांनी लुटले त्यांना ते लुटतील व त्यांना ज्यांनी नागवले त्यांना ते नागवतील, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.


तुम्ही समजाल की इस्राएल लोकांमध्ये मी आहे; मी परमेश्वर तुमचा देव आहे; अन्य कोणी नाही, व माझी प्रजा कधीही फजीत होणार नाही.


लबानोनावर केलेला जुलूम तुला घेरील, जनावरांचा झालेला नाश तुला घाबरवील; माणसांचा रक्तपात आणि भूमीवर, शहरांवर व त्यांतील सर्व रहिवाशांवर केलेला जुलूम ह्यामुळे असे होईल.


तू पुष्कळ राष्ट्रांना लुटले म्हणून सर्व अवशिष्ट लोक तुला लुटतील; माणसांचा रक्तपात आणि भूमीवर, शहरांवर व त्यांतील सर्व रहिवाशांवर केलेला जुलूम, ह्यामुळे असे होईल.


म्हणून सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, आपल्या जीविताची शपथ वाहून म्हणतो, “मवाब सदोमासारखे निश्‍चये होईल, अम्मोन वंशज गमोर्‍यासारखे होतील; खाजकुयरीचे वतन व मिठागर ही सर्वकाळ वैराण होतील; माझ्या लोकांचे अवशिष्ट जन त्यांना लुटतील; माझ्या राष्ट्रांचे अवशिष्ट राहिलेले लोक त्यांचा ताबा घेतील.”


परमेश्वराने तुझा दंड दूर केला आहे, तुझ्या शत्रूचे निवारण केले आहे; इस्राएलाचा राजा परमेश्वर तुझ्यामध्ये आहे; तुला पुन्हा अरिष्टाची भीती प्राप्त होणार नाही.


त्या दिवसांत बहुत राष्ट्रे परमेश्वराला येऊन मिळतील व माझी प्रजा बनतील; मी तुझ्या ठायी वस्ती करीन, मग तुला समजेल की, सेनाधीश परमेश्वराने मला तुझ्याकडे पाठवले आहे.


ज्या राष्ट्रांनी तुम्हांला लुटले त्यांच्याकडे प्रताप मिळवण्यासाठी,1 त्याने मला पाठवले आहे; जो कोणी तुम्हांला स्पर्श करील तो त्याच्या डोळ्याच्या बुबुळालाच स्पर्श करील; कारण सेनाधीश परमेश्वर म्हणतो :


“जरूब्बाबेलच्या हातांनी ह्या मंदिराचा पाया घातला, त्याचेच हात ते बांधायचे पुरे करतील व सेनाधीश परमेश्वराने मला तुमच्याकडे पाठवले आहे हे तू समजशील.


“मग जे दूर आहेत ते येतील व परमेश्वराचे मंदिर बांधण्यास हातभार लावतील आणि सेनाधीश परमेश्वराने मला तुमच्याकडे पाठवले आहे हे तुम्हांला कळून येईल. परमेश्वर तुमचा देव ह्याचे तुम्ही लक्ष देऊन ऐकाल तर हे घडून येईल.”


सेनाधीश परमेश्वर त्यांचा सांभाळ करील; ते शत्रूंना गिळतील व गोफणगुंडे पायांखाली तुडवतील; ते पितील व द्राक्षारस प्याल्याप्रमाणे गोंगाट करतील; ते यज्ञाच्या कटोर्‍यांसारखे, वेदीच्या कोपर्‍यांसारखे भरून राहतील.


हे मी तुम्हांला आता म्हणजे हे घडण्यापूर्वी सांगतो, ह्यासाठी की, जेव्हा हे घडेल तेव्हा तुम्ही विश्वास ठेवावा की, मी तो आहे.1


मी तुम्हांला ह्या गोष्टी अशासाठी सांगून ठेवल्या आहेत की, त्या घडण्याची वेळ आली म्हणजे त्या मी तुम्हांला सांगितल्या होत्या ह्याची तुम्हांला आठवण व्हावी. ह्या गोष्टी मी प्रारंभापासून तुम्हांला सांगितल्या नाहीत; कारण मी तुमच्याबरोबर होतो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan