Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




जखर्‍या 2:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 परमेश्वर म्हणतो, तिच्या सभोवार मी तिला अग्नीचा कोट होईन, व तिच्या ठायी मी तेजोरूप होईन.”’

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 परमेश्वर म्हणतो, ‘मी तिच्या सभोवती अग्नीची भिंत बनेन, आणि मी तिच्यामध्ये गौरवी तेज होईन.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 आणि मी स्वतः त्याभोवती अग्नीचा कोट होईन व आत त्या नगरीचे वैभव होईन,” असे याहवेह जाहीर करतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




जखर्‍या 2:5
28 Iomraidhean Croise  

यरुशलेमेच्या सभोवती डोंगर आहेत, तसा परमेश्वर आतापासून सर्वकाळ आपल्या लोकांसभोवती आहे.


तरी हे परमेश्वरा, तू माझ्याभोवती कवच आहेस; तू माझा गौरव, माझे डोके वर करणारा आहेस.


त्या नगरीच्या ठायी देव आहे; ती ढळावयाची नाही; प्रभात होताच देव तिला साहाय्य करील.


सीयोनेसभोवती फिरा, तिला फेरा घाला; तिचे बुरूज मोजा;


देव त्याच्या प्रासादांमध्ये आश्रयदुर्ग असा प्रकट झाला आहे.


खरोखर त्याचे भय धरणार्‍यांना त्याने सिद्ध केलेले तारण समीप असते; ह्यासाठी की आमच्या देशात वैभव नांदावे.


अगे सीयोननिवासिनी, जयघोष कर, गजर कर; इस्राएलाचा पवित्र प्रभू तुझ्या ठायी थोर आहे.”


त्याचे अधिपती भयाने पळून जातील व त्याचे सरदार झेंडा पाहून घाबरतील;” ज्याचा अग्नी सीयोनेत आहे व ज्याची भट्टी यरुशलेमेत आहे, तो परमेश्वर असे म्हणतो.


आणि माझे लोक शांत स्थळी, निर्भय वसतिस्थानात व सुखाश्रमात राहतील.


आणखी तेथे आमच्यासाठी प्रतापी परमेश्वराचा निवास होईल; ते रुंद नदीनाल्याचे ठिकाण होईल; त्यात वल्ह्याच्या तारवाचा, मोठ्या जहाजाचा प्रवेश होणार नाही.


आणि परमेश्वर सीयोन डोंगराच्या प्रत्येक स्थानावर व त्याच्या सणामेळ्यांवर दिवसा धूम्रमय मेघ व रात्री प्रज्वलित अग्नीचा प्रकाश निर्माण करील; कारण त्याच्या सर्व वैभवावर छत्र होईल.


आणि मापनसूत्र पुन्हा एकदा थेट गारेबाच्या टेकडीवर लागेल व तेथून गवाथाकडे वळसा घेईल.


ह्यास्तव हे मानवपुत्रा, संदेश देऊन गोगाला सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, जेव्हा माझे लोक इस्राएल निर्भय वसतील तेव्हा हे तुला कळणार नाही काय?


त्याने ते चार्‍ही बाजूंनी मापले; पवित्र स्थळे व सामान्य स्थळे एकमेकांपासून वेगळी ठेवण्यासाठी त्याला सभोवार एक भिंत होती; तिची लांबी पाचशे हात व रुंदी पाचशे हात होती.


मग तो पुरुष पूर्व दिशेस चालला व त्याच्या हाती मापनसूत्र होते. त्याने एक हजार हात अंतर मापून मला पाण्यातून चालण्यास सांगितले, तर तेथे पाणी घोट्यापर्यंत होते.


ह्यास्तव परमेश्वर म्हणतो, मी करुणायुक्त होऊन पुन्हा यरुशलेमेकडे वळत आहे; त्यात माझे मंदिर बांधतील असे सेनाधीश परमेश्वराचे म्हणणे आहे; यरुशलेमेवर मापनसूत्र लावतील.


हे सीयोनकन्ये जयजयकार व उल्लास कर; कारण पाहा, मी येईन, मी तुझ्यात वस्ती करीन, असे परमेश्वर म्हणतो.


त्या दिवसांत बहुत राष्ट्रे परमेश्वराला येऊन मिळतील व माझी प्रजा बनतील; मी तुझ्या ठायी वस्ती करीन, मग तुला समजेल की, सेनाधीश परमेश्वराने मला तुझ्याकडे पाठवले आहे.


त्यांच्यावरती परमेश्वर दृष्टीस पडेल, त्याचे बाण विद्युल्लतेसारखे सुटतील; प्रभू परमेश्वर रणशिंग फुंकील व दक्षिणेकडच्या वावटळीत कूच करील;


कोणी येऊजाऊ नये म्हणून मी सैन्य रोखण्यासाठी माझ्या मंदिराभोवती तळ देईन; जुलूम करणारा पुन्हा त्यांच्यावर चाल करून जाणार नाही; कारण आता मी प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे.


ते परराष्ट्रीयांना प्रकटीकरण होण्यासाठी उजेड व तुझ्या ‘इस्राएल’ लोकांचे ‘वैभव’ असे आहे.”


नगरीला ‘सूर्यचंद्राच्या प्रकाशाची’ आवश्यकता नाही; कारण ‘देवाच्या तेजाने’ ती ‘प्रकाशित केली आहे;’ आणि हाच कोकरा तिचा दीप आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan