Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




जखर्‍या 2:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 परमेश्वर पवित्र भूमीतला आपला वाटा म्हणून यहूदाचा ताबा घेईल व पुन्हा यरुशलेम निवडील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 स्वत:ची पवित्र नगरी म्हणून परमेश्वर यरूशलेमची फेरनिवड करील यहूदा म्हणजे परमेश्वराच्या पवित्र भूमीचा वाटा असेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 आणि यहूदीया ही पवित्र भूमी याहवेहचे वतन होईल, आणि ते पुन्हा यरुशलेमला निवडतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




जखर्‍या 2:12
19 Iomraidhean Croise  

परंतु यरुशलेम येथे माझे नाव असावे म्हणून मी ते निवडले आहे. माझे लोक इस्राएल ह्यांच्यावर मी दाविदाला निवडून नेमले आहे.’


मग हामानाने आपली स्त्री जेरेश व आपले सर्व मित्र ह्यांना आपल्यावर आलेला प्रसंग विदित केला. तेव्हा त्याचे बुद्धिमान मित्र व त्याची बायको हे त्याला म्हणाले, “ह्या मर्दखयापुढे तुमचा अधःपात होऊ लागला आहे; तो जर यहूदी वंशातला असला तर तुमचे वर्चस्व व्हायचे नाही, त्याच्यापुढे तुमचा अध:पात होणार.”


“माझ्या अभिषिक्तांना हात लावू नका, माझ्या संदेष्ट्यांना उपद्रव देऊ नका.”


परमेश्वराने सीयोन निवडून घेतली आहे, आपल्या निवासासाठी त्याला ती आवडली आहे.


“हे सर्वकाळ माझे विश्रामस्थान आहे; येथे मी राहीन, कारण तशी मी इच्छा केली.


कारण परमेशाने आपणासाठी याकोबाला निवडले आहे, आपले स्वतःचे धन होण्यासाठी इस्राएलास निवडून घेतले आहे.


ज्या राष्ट्रांचा देव परमेश्वर आहे ज्या लोकांना त्याने आपल्या वतनाकरता प्रजा म्हणून निवडले आहे, ते धन्य!


हे देवा, ऊठ, पृथ्वीचा न्याय कर; कारण तूच सर्व राष्ट्रांचा मालक आहेस.


कारण याकोबावर परमेश्वर दया करील; तो पुन्हा इस्राएलास निवडून घेईल, त्यांना त्यांच्या स्वदेशात वसवील; त्यांना परके येऊन मिळतील; ते याकोबाच्या घराण्याशी लगटून राहतील.


संध्याकाळी पाहाल तर थरकाप; पहाट झाली नाही तर तिचा फडशा. जे आम्हांला लुटतात त्यांच्या वाट्याला हे आहे; जे आमचा अपहार करतात त्यांच्या हिश्शाला हे आहे.


मी तुला हाती धरून पृथ्वीच्या दिगंतापासून आणले, तिच्या सीमांपासून बोलावून तुला म्हटले, “तू माझा सेवक आहेस, मी तुला निवडले आहे, तुझा त्याग केला नाही”;


जो याकोबाचा वाटा तो त्यांसारखा नव्हे, तर तो सर्वांचा निर्माणकर्ता आहे व इस्राएल त्याच्या वतनाचा वंश आहे, सेनाधीश परमेश्वर हे त्याचे नाम आहे.


तुला ग्रासून टाकणार्‍या सर्वांना ग्रासून टाकण्यात येईल आणि तुझे सर्व वैरी बंदिवान होऊन जातील; तुझे हरण करणार्‍यांचे हरण होईल, तुला लुटणार्‍या सर्वांना मी लुटवीन.


जो याकोबाचा वाटा तो त्यांच्यासारखा नव्हे, तर तो सर्वांचा निर्माणकर्ता आहे, इस्राएल त्याच्या वतनाचा वंश आहे; सेनाधीश परमेश्वर हे त्याचे नाम आहे.


पुन्हा पुकारून सांग की, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझी नगरे पुन्हा सुबत्तेने भरून जातील; परमेश्वर पुन्हा सीयोनेचे सांत्वन करील, तो पुन्हा यरुशलेमेस निवडील.”’


मग परमेश्वर सैतानास म्हणाला, “अरे सैताना, परमेश्वर तुला धमकी देवो; यरुशलेम आपलीशी करणारा परमेश्वर तुला धमकी देवो; हा अग्नीतून काढलेले कोलीत नव्हे काय?”


तो त्याला वैराण प्रदेशात व घोंघावणार्‍या ओसाड रानात सापडला; त्याने त्याच्या सभोवती राहून त्याची निगा राखली, आपल्या डोळ्यातील बाहुलीप्रमाणे त्याला सांभाळले.


कारण परमेश्वराचे लोक हाच त्याचा वाटा, याकोब हाच त्याचा वतनभाग.


Lean sinn:

Sanasan


Sanasan