Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




जखर्‍या 14:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 त्या दिवशी आणखी असे होईल की यरुशलेमेतून जिवंत पाण्याचे झरे फुटून वाहतील; अर्धे पूर्वसमुद्राकडे व अर्धे पश्‍चिमसमुद्राकडे वाहतील; उन्हाळ्यात व हिवाळ्यात तसेच होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 तेव्हा यरूशलेमेतून सतत वाहणाऱ्या पाण्याचा झरा वाहील, त्यास दोन पाट फुटतील. एक पाट पूर्वेकडे वाहत जाऊन पुर्वेकडील समुद्राला मिळेल तर दुसरा पाट पश्चिमेकडे वाहत जाऊन भूमध्य समुद्राला मिळेल, हिवाळा असो वा उन्हाळा तो वाहत राहील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 त्या दिवशी जीवनजल यरुशलेमातून बाहेर वाहील, त्यातील अर्धे पूर्व दिशेला मृत समुद्राकडे व अर्धे पश्चिम दिशेला भूमध्यसुमद्राकडे वाहतील, उन्हाळ्यात व हिवाळ्यात ते निरंतर वाहत राहतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




जखर्‍या 14:8
18 Iomraidhean Croise  

बागेतले कारंजे, जिवंत झर्‍याचा कूप, लबानोनाहून वाहून येणारे जलप्रवाह अशी तू आहेस.


जेथे मृगजल दिसते तेथे तलाव होईल; तृषित भूमीच्या ठिकाणी उसळत्या पाण्याचे झरे होतील; कोल्हे राहतात त्या स्थळी बोरू व लव्हाळे ह्यांसहित गवत उगवेल.


त्यांना तहानभूक लागणार नाही; झळई व ऊन ह्यांची बाधा त्यांना होणार नाही; कारण त्यांच्यावर दया करणारा त्यांचा नेता होईल; पाण्याच्या झर्‍यांवर तो त्यांना नेईल.


परमेश्वर तुझा सततचा मार्गदर्शक होईल, तो अवर्षणसमयी तुझ्या जिवास तृप्त करील, तुझ्या हाडांना मजबूत करील; तू भरपूर पाणी दिलेल्या मळ्यांप्रमाणे होशील; पाणी कधी न आटणार्‍या झर्‍याप्रमाणे होशील,


उत्तरेकडून आलेल्यास तुमच्यापासून घालवून रुक्ष व वैराण प्रदेशात हाकून देईन; त्याची आघाडी पूर्व-समुद्रात व पिछाडी पश्‍चिम-समुद्रात हाकून देईन; त्याचा दुर्गंध, त्याची घाण वर येईल; कारण त्याने उन्मत्तपणाची कृत्ये केली आहेत.


त्या दिवशी असे होईल की, पर्वतावरून नवा द्राक्षारस पाझरेल, टेकड्यांवरून दूध वाहील, व यहूदाचे सर्व ओहोळ पाण्याने भरून वाहतील; परमेश्वराच्या मंदिरातून झरा निघेल तो शिट्टीमाच्या खोर्‍यास पाणी पुरवील.


देशोदेशींच्या लोकांच्या झुंडीच्या झुंडी जातील व म्हणतील, “चला, आपण परमेश्वराच्या पर्वतावर, याकोबाच्या देवाच्या मंदिराकडे चढून जाऊ; तो आम्हांला आपले मार्ग शिकवो म्हणजे आम्ही त्याच्या वाटांनी चालू.” कारण सीयोनेतून शिक्षण व यरुशलेमेतून परमेश्वराचे वचन निघेल.


आणि त्या दिवशी यरुशलेमेसमोर पूर्वेस असलेल्या जैतुनाच्या झाडांच्या डोंगराला त्याचे पाय लागतील तेव्हा जैतुनाच्या झाडांचा डोंगर पूर्वपश्‍चिम दुभागून मध्ये एक मोठे खोरे उत्पन्न होईल. अर्धा डोंगर उत्तरेकडे व अर्धा डोंगर दक्षिणेकडे सरेल.


आणि यरुशलेमेपासून आरंभ करून सर्व राष्ट्रांना त्याच्या नावाने पश्‍चात्ताप व पापक्षमा घोषित करण्यात यावी.


येशूने तिला उत्तर दिले, “देवाचे दान म्हणजे काय आणि ‘मला प्यायला पाणी दे,’ असे तुला म्हणणारा कोण आहे, हे तुला कळले असते तर तू त्याच्याजवळ मागितले असतेस आणि त्याने तुला जिवंत पाणी दिले असते.”


परंतु मी देईन ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही; जे पाणी मी त्याला देईन ते त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्याचा झरा होईल.”


कारण की, देवदूत वेळोवेळी तळ्यात उतरून पाणी हलवत असे आणि पाणी हलवल्यानंतर त्यात प्रथम जो जाई त्याला कोणताही रोग असला तरी तो बरा होत असे.]


जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे, जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील.”


आत्मा व वधू म्हणतात, “ये,” ऐकणाराही म्हणो, “ये.” आणि ‘तान्हेला येवो;’ ज्याला पाहिजे तो ‘जीवनाचे पाणी फुकट’ घेवो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan