Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




जखर्‍या 14:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 तेव्हा ज्या राष्ट्रांनी यरुशलेमेबरोबर लढाई चालवली त्या सर्वांचा संहार परमेश्वर ज्या मरीने करील ती ही : ते पायांवर उभे असता त्यांचे मांस कुजेल, त्यांचे डोळे जागच्या जागी सडतील, त्यांच्या मुखात त्यांची जिव्हा सडेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 पण यरूशलेमविरुध्द लढलेल्या राष्ट्रांना परमेश्वर शिक्षा करील; तो त्या राष्ट्रांचा या मरीने संहार करील: ते आपल्या पायांवर उभे असतांनाच त्यांची कातडी कुजू लागेल; त्यांचे डोळे त्यांच्या खाचांत आणि त्यांच्या जीभा त्यांच्या तोंडांत सडतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 जे लोक यरुशलेमविरुद्ध लढले, त्या सर्व लोकांवर याहवेह ही मरी पाठवतील: स्वतःच्या पायावर उभे असतानाच त्यांचे मांस सडत जाईल; त्यांचे डोळे त्यांच्या खाचेत सडतील, आणि त्यांच्या जिभा त्यांच्या तोंडातच सडतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




जखर्‍या 14:12
34 Iomraidhean Croise  

तू आतड्यांच्या रोगाने बहुत पीडा पावशील; तो रोग इतका वाढेल की त्यामुळे दिवसानुदिवस तुझी आतडी गळून पडतील.”’


ते त्याच्या शरीराचे अवयव तोडून खाईल; मृत्यूचा ज्येष्ठ पुत्र त्याचे अवयव ग्रासील.


तुझ्या क्रोधाचे बळ कोणाला समजते? आणि तुझे भय बाळगण्याइतकी कोणाला तुझ्या कोपाची जाणीव आहे?


तर मी तुमचे काय करीन ते ऐका : मी तुम्हांला घाबरे करीन, क्षयरोग व ताप ह्यांनी मी तुम्हांला पिडीन; त्यामुळे तुमचे डोळे क्षीण होतील व तुमचा जीव झुरणीस लागेल; तुम्ही बियाणे पेराल पण ते व्यर्थ जाईल, कारण त्याचे उत्पन्न तुमचे शत्रू खाऊन टाकतील.


इतके केल्यावरही तुम्ही माझे ऐकले नाही तर तुमच्या पापांबद्दल मी तुम्हांला सातपट शिक्षा करीन,


तरीही माझ्याविरुद्ध तुम्ही वागलात व माझे ऐकले नाही, तर तुमच्या पापांच्या मानाने तुमच्यावर सातपट अनर्थ आणीन.


तर मीही तुमच्या अगदी विरुद्ध जाईन आणि मीच तुमच्या पापांबद्दल तुम्हांला सातपट शिक्षा करीन.


तर मी संतापून तुमच्याविरुद्ध चालेन आणि तुमच्या पापांबद्दल तुम्हांला सातपट शिक्षा करीन.


जी राष्ट्रे स्वस्थ आहेत त्यांच्यावर माझा राग फार पेटला आहे; कारण मी थोडासा रागावलो होतो पण त्यांनी अरिष्ट वाढवले.


त्या दिवशी असे होईल की, यरुशलेमेवर चढाई करून येणार्‍या सर्व राष्ट्रांचा नाश करण्याची मी खटपट करीन;


तसेच ह्या मरीप्रमाणे घोड्यांवर, खेचरांवर, उंटांवर, गाढवांवर व त्यांच्या लष्करात असलेल्या सर्व जनावरांवर मरी येईल.


तसेच मिसराचे घराणे वर चढून गेले नाही, तर त्यांच्यावरही पर्जन्यवृष्टी होणार नाही; जी राष्ट्रे मंडपांचा सण पाळण्यासाठी वर चढून जाणार नाहीत त्या सर्व राष्ट्रांवर परमेश्वर जी मरी पाठवणार ती ह्यांच्यावरही येईल.


तेव्हा परमेश्वर पुढे सरसावेल; पूर्वी युद्धाच्या दिवशी ज्या प्रकारे त्याने युद्ध केले त्या प्रकारे त्या राष्ट्रांबरोबर तो युद्ध करील.


तो त्याला म्हणाला, “धावत जाऊन त्या तरुणास असे सांग, ‘यरुशलेमेत माणसे व गुरेढोरे फार झाल्यामुळे भिंती नसलेल्या खेड्यांप्रमाणे तिच्यात वस्ती होईल.


त्याने देवाचा गौरव केला नाही, म्हणून तत्क्षणी प्रभूच्या दूताने त्याच्यावर प्रहार केला आणि तो किडे पडून मेला.


जो देश वतन करून घ्यायला तू जात आहेस तेथे तू नष्ट होईपर्यंत तुला मरी सोडणार नाही असे परमेश्वर करील.


क्षयरोग, ताप, दाह, जळजळ, अवर्षण1 तांबेरा व बुरशी ह्यांच्या योगे परमेश्वर तुला मारील आणि तू नाश पावेपर्यंत ही तुझा पिच्छा पुरवतील.


तर तुला व तुझ्या संतानाला परमेश्वर विलक्षण रोग लावील. कठीण व हट्टी व्याधी आणि खराब व जुनाट आजार तुला जडवील.


जी दहा शिंगे व जे श्वापद तू पाहिलेस ते कलावंतिणीचा द्वेष करतील व तिला ओसाड व नग्न करतील, तिचे मांस खातील व तिला अग्नीत जाळून टाकतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan