Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




जखर्‍या 14:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 तेव्हा सर्व देश यरुशलेमेच्या दक्षिणेस असलेली गेबा व रिम्मोन ह्यांमधील अराबाप्रमाणे होईल; यरुशलेमेचा उद्धार होऊन बन्यामिनाच्या वेशीपासून पहिल्या वेशीपर्यंत, कोपरावेशीपर्यंत तसेच हनानेलाच्या बुरुजापासून राजाच्या द्राक्षकुंडापर्यंत ते आपल्या स्थळी वसेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 तेव्हा सर्व देश यरूशलेमेच्या दक्षिणेस असलेली गिबा ते रिम्मोन ह्यांमधील अराबाप्रमाणे होईल; यरूशलेम मात्र पुन्हा उभारले जाईल; अगदी बन्यामीनच्या प्रवेशद्वारापासून ते पाहिल्या प्रवेशद्वारापर्यंत आणि हनानेलच्या मनोऱ्यापासून राजाच्या द्राक्षकुंडापर्यंत; अशी ती आपल्या स्थळी वसेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 यहूदीयाच्या उत्तरेकडील सीमेपासून म्हणजे गेबापासून ते दक्षिणेकडील सीमेपर्यंतची म्हणजे रिम्मोन पर्यंतची सर्व भूमी अराबासारखी शुष्क होईल, परंतु यरुशलेम उंचावल्या जाईल, बिन्यामीनच्या वेशीपासून पहिल्या वेशीपर्यंत व कोपर्‍याच्या वेशीपर्यंत आणि हनानेलाच्या बुरुजापासून शाही द्राक्षकुंडांपर्यंत असेल व या स्थानावर ते अचल राहील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




जखर्‍या 14:10
28 Iomraidhean Croise  

मग आसा राजाने यहूदातील सर्व लोकांना जाहीर केले, कोणाला सोडले नाही; बाशाने जे पाषाण व लाकडे लावून रामाची मजबुती केली होती ती सर्व त्या लोकांनी काढून नेली आणि आसा राजाने बन्यामिनाचा गिबा व मिस्पा ह्यांची मजबुती करण्याच्या कामी ती लावली.


इस्राएलाचा राजा यहोआश ह्याने यहूदाचा राजा अमस्या बिन यहोआश बिन अहज्या ह्याला बेथ-शेमेश येथे पकडले; त्याने यरुशलेमेस जाऊन एफ्राइमी वेशीपासून कोपरावेशीपर्यंत यरुशलेमेचा चारशे हात कोट पाडून टाकला.


त्यांची नावे एटाम, अईन, रिम्मोन, तोखेन आणि आशान अशी पाच नगरे;


लेवीच्या बाकीच्या वंशजांना म्हणजे मरारी वंशजांना जी नगरे दिली ती ही : जबुलूनच्या वंशातून रिम्मोनो व त्याचे शिवार आणि ताबोर व त्याचे शिवार;


इस्राएलाचा राजा योवाश ह्याने यहूदाचा राजा अमस्या बिन योवाश बिन यहोआहाज ह्याला बेथ-शेमेश येथे पकडून यरुशलेमेस नेले; आणि त्याने एफ्राइमी वेशीपासून कोपरावेशीपर्यंत यरुशलेमेचा चारशे हात कोट पाडून टाकला.


उज्जीयाने यरुशलेमेत कोपरावेशीजवळ, खोरेवेशीजवळ आणि कोट वळसा घेतो तेथे बुरूज बांधून त्यांना बळकटी आणली.


आणि एफ्राईम वेशीपासून जुन्या वेशीवरून मत्स्यवेस, हनानेल बुरूज व हमया बुरूज ह्यांवरून मेंढेवेशीपर्यंत गेलो; गारद्यांच्या वेशीत ते जाऊन उभे राहिले.


मग मुख्य याजक एल्याशीब व त्याचे याजकबांधव उठून मेंढेवेस बांधू लागले; त्यांनी तिची प्रतिष्ठापना करून तिला कवाडेही लावली; हमेआ बुरुजापर्यंत, हनानेल बुरुजापर्यंत त्यांनी तिची प्रतिष्ठापना केली.


ते घाटांतून पार गेले; गेबा येथे मुक्काम करू असे ते म्हणत आहेत; रामा थरथर कापत आहे; शौलाचा गिबा पळून जात आहे.


शेवटच्या दिवसांत असे होईल की परमेश्वराच्या मंदिराचा डोंगर पर्वताच्या माथ्यावर स्थापण्यात येईल, आणि सर्व डोंगरांहून तो उंच होईल; त्याच्याकडे सर्व राष्ट्रांतील लोक लोटतील.


तेव्हा पशहूराने यिर्मया संदेष्ट्याला फटके मारले आणि परमेश्वराच्या मंदिरातील वरल्या बाजूस बन्यामीनद्वारात खोडे होते त्यांत त्याला अडकवून ठेवले.


परमेश्वर म्हणतो, मी याकोबाच्या डेर्‍यांचा बंदिवास उलटवीन, मी त्याच्या वसतिस्थानांवर दया करीन; नगर पुन्हा त्याच्याच टेकडीवर बांधतील, आणि राजवाड्यातून पूर्ववत वस्ती होईल.


तो बन्यामिनाच्या वेशीत प्रवेश करतो तर तेथे पहारेकर्‍यांचा नायक इरीया बिन शलेम्या बिन हनन्या होता; त्याने यिर्मया संदेष्ट्याला पकडून म्हटले, “तू खास्द्यांकडे फितूर होऊन जात आहेस.”


त्यांनी यिर्मयाला विहिरीत टाकले असे राजगृहातला कूशी खोजा एबद-मलेख ह्याने ऐकले; त्या प्रसंगी राजा बन्यामिनी वेशीत बसला होता.


दाविदाचा पडलेला डेरा त्या दिवशी मी उभारीन व त्याची भगदाडे बुजवीन; त्याचे जे कोसळले आहे ते मी उभारीन; तो पूर्वकाली होता तसा तो बनवीन;


शेवटल्या दिवसांत असे होईल की, परमेश्वराच्या मंदिराचा डोंगर पर्वतांच्या माथ्यावर स्थापण्यात येईल आणि सर्व डोंगरांहून तो उंच होऊन त्याकडे राष्ट्रे लोटतील.


त्या दिवशी मी यहूदाच्या सरदारांना लाकडाखालच्या आगटीसारखे, पेंढ्याखालच्या जळत्या मशालीसारखे करीन; ते उजवीकडील व डावीकडील सभोवतालच्या सर्व राष्ट्रांना खाऊन टाकतील; यरुशलेम आपल्या पूर्वीच्या जागी म्हणजे यरुशलेमेच्या जागी पुन्हा वसेल.


तो त्याला म्हणाला, “धावत जाऊन त्या तरुणास असे सांग, ‘यरुशलेमेत माणसे व गुरेढोरे फार झाल्यामुळे भिंती नसलेल्या खेड्यांप्रमाणे तिच्यात वस्ती होईल.


परमेश्वर असे म्हणतो, मी सीयोनेस परत आलो आहे, मी यरुशलेमेत वस्ती करणार; यरुशलेमेस ‘सत्यनगर’ म्हणतील व सेनाधीश परमेश्वराच्या पर्वतास ‘पवित्र गिरी’ म्हणतील.


लबावोथ, शिलहीम, अईन व रिम्मोन. अशी एकंदर एकोणतीस नगरे व त्यांखालील खेडी मिळाली.


बन्यामीन वंशाच्या वतनातून गिबोन व त्याचे गायरान, गेबा व त्याचे गायरान,


निसटलेले मात्र रिम्मोनाच्या खडकाकडे रानाच्या वाटेने पळून गेले. हमरस्त्यांवर गाठलेल्यांपैकी पाच हजार लोक इस्राएल लोकांनी टिपून मारले आणि गिदोमापर्यंत त्यांचा पिच्छा पुरवून त्यांतले आणखी दोन हजार लोक मारले.


त्यांतले सहाशे लोक निसटून रानाच्या वाटेने रिम्मोन खडकावर पोहचले, तेथे ते चार महिने राहिले.


नंतर रिम्मोन खडकाजवळ जे बन्यामिनी राहत होते. त्यांच्याकडे सर्व मंडळीने लोक पाठवून त्यांच्याशी तहाचे बोलणे केले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan