Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




जखर्‍या 13:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 पाप व अशुद्धता दूर करण्यास त्या दिवशी दाविदाच्या घराण्यासाठी व यरुशलेमनिवाशांसाठी एक झरा फुटेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 त्या दिवसात दावीदाच्या वंशासाठी आणि यरूशलेममध्ये राहणाऱ्या इतर लोकांसाठी पापे धुण्यासाठी आणि त्यांना शुध्द करण्यासाठी पाण्याचा नवा झरा फुटेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 “त्या दिवशी दावीदाच्या घराण्यातून आणि यरुशलेममधील लोकांमधून एक झरा उगम पावेल, तो त्याच्या लोकांना सर्व पापांपासून आणि अशुद्धतेपासून शुद्ध करेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




जखर्‍या 13:1
34 Iomraidhean Croise  

मला धुऊन माझा दोष पूर्णपणे काढून टाक, माझे पाप दूर करून मला निर्मळ कर.


एजोबाने माझा पापमल काढ म्हणजे मी निर्मळ होईन; मला धू म्हणजे मी बर्फाहून शुभ्र होईन.


तेव्हा तुम्ही तारणकूपातून उल्लासाने पाणी काढाल.


प्रभू न्याय करणार्‍या व दहन करणार्‍या आत्म्याच्या द्वारे सीयोनेच्या कन्यांचा मळ काढून टाकील, आणि यरुशलेमेतून तिचा रक्तदोष काढून टाकील, तेव्हा असे घडेल.


हे परमेश्वरा, इस्राएलाच्या आशाकंदा, तुझा त्याग करणारे सर्व फजीत होतील; माझ्यापासून फितणार्‍यांची नावे धुळीवर लिहिली जातील, कारण परमेश्वर जो जिवंत पाण्याचा झरा त्याचा त्यांनी त्याग केला आहे.


कारण माझ्या लोकांनी दुहेरी दुष्कर्म केले; मी जो जिवंत पाण्याचा झरा, त्या मला त्यांनी सोडले आणि ज्यांत पाणी राहणार नाही असे फुटके हौद आपल्यासाठी खोदून तयार केले.


“परमेश्वराच्या मंदिरात आपण कारभारी व्हावे आणि जो कोणी वेडा होऊन आपणांला संदेष्टा म्हणतो त्याला खोड्यात घालून बेड्या घालाव्यात म्हणून परमेश्वराने यहोयादा याजकाच्या जागी तुला याजक केले आहे.


त्यांनी जे दुष्कर्म करून माझ्याविरुद्ध पाप केले त्या सर्वांचे मी क्षालन करीन; त्यांनी जी दुष्कर्मे करून माझ्याविरुद्ध पाप व अपराध केला त्या सर्वांची मी क्षमा करीन.


“मानवपुत्रा, इस्राएल घराणे देशात वस्ती करून राहिले तेव्हा त्यांनी आपल्या आचाराने व कृतींनी तो देश भ्रष्ट केला; त्यांचा आचार माझ्यासमक्ष ऋतुमती स्त्रीच्या विटाळाप्रमाणे होता.


मी तुमच्यावर शुद्ध पाणी शिंपडीन, म्हणजे तुम्ही शुद्ध व्हाल; तुमची सर्व मलिनता व तुमच्या सर्व मूर्ती ह्यांपासून मी तुमची शुद्धी करीन.


मी तुमच्या सर्व मलिनतेपासून तुम्हांला मुक्त करीन. मी धान्यावर हुकूम करून त्याची विपुलता करीन, तुमच्यावर दुष्काळ आणणार नाही.


मग त्याने मला मंदिराच्या द्वाराकडे परत नेले, तेव्हा पाहा, मंदिराच्या उंबरठ्याखालून पाण्याचा झरा निघून पूर्वेकडे वाहत होता; मंदिराची पुढली बाजू पूर्वेस होती; तो झरा मंदिराच्या उजव्या बाजूने वेदीच्या दक्षिणेस खालून वाहत होता.


तथापि झरा किंवा विहीर जिच्यात पाण्याचा संचय असतो ती शुद्धच राहते; तरी तिच्यातील शवांना जो शिवेल तो अशुद्ध समजावा.


तुझ्या हातची चेटके मी नष्ट करीन, तुझ्यामध्ये मांत्रिक उरणार नाहीत;


उरलेल्या सर्व घराण्यांतले लोक वेगळे व त्यांचा स्त्रीवर्ग वेगळा असे ते आक्रंदन करतील.


त्या दिवशी असे होईल की सर्व राष्ट्रांना भारी होईल अशा पाषाणासारखे मी यरुशलेमेस करीन; जे कोणी तो उचलतील ते स्वतःला जखम करून घेतील; पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तिच्याविरुद्ध जमतील.


दुसर्‍या दिवशी येशूला आपणाकडे येताना पाहून तो म्हणाला, “हा पाहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा!


कारण की, देवदूत वेळोवेळी तळ्यात उतरून पाणी हलवत असे आणि पाणी हलवल्यानंतर त्यात प्रथम जो जाई त्याला कोणताही रोग असला तरी तो बरा होत असे.]


आणि तुमच्यापैकी कित्येक तसे होते; तरी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात व आपल्या देवाच्या आत्म्यात धुतलेले, पवित्र केलेले व नीतिमान ठरवलेले असे झालात.


तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त, त्याच्या मूल्यवान रक्ताने ‘तुम्ही मुक्त झाला आहात.’


पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे, आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते.


जो पाण्याच्या द्वारे व रक्ताच्या द्वारे आला तो हाच, म्हणजे येशू ख्रिस्त; पाण्याने केवळ नव्हे, तर पाण्याने व रक्तानेही आला. आत्मा हा साक्ष देणारा आहे, कारण आत्मा सत्य आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan