जखर्या 12:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 त्या दिवशी मी यहूदाच्या सरदारांना लाकडाखालच्या आगटीसारखे, पेंढ्याखालच्या जळत्या मशालीसारखे करीन; ते उजवीकडील व डावीकडील सभोवतालच्या सर्व राष्ट्रांना खाऊन टाकतील; यरुशलेम आपल्या पूर्वीच्या जागी म्हणजे यरुशलेमेच्या जागी पुन्हा वसेल. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 त्या दिवसामध्ये मी यहूदाच्या पुढाऱ्यांना लाकडांमधील आगीप्रमाणे बनवीन. वणव्यात उभे पीक जसे भस्मसात होते, तसे ते त्यांच्या सभोवतीच्या सर्व शत्रूंचा नाश करतील. यरूशलेमवासी पुन्हा आपल्या स्वतःच्या पूर्वीच्या जागी वसतील.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 “त्या दिवशी मी यहूदीयाच्या कुळांना, लाकडाच्या ढिगाऱ्यातील आगटीसारखे, पेंढ्यांमध्ये टाकलेल्या पेटत्या मशालीसारखे करेन; ती कुळे उजवीकडील व डावीकडील सर्व शेजारील राष्ट्रांना जाळून भस्म करतील. यरुशलेम मात्र अचल अशी राहील. Faic an caibideil |