Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




जखर्‍या 12:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी मी प्रत्येक घोड्यास बुजवीन व त्यावरील स्वारास वेडे करीन; मी आपले डोळे उघडून यहूदाच्या घराण्याकडे पाहीन व राष्ट्रांच्या प्रत्येक घोड्यास अंधत्व आणीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 “पण, त्या दिवसामध्ये, मी घोड्याला भीतीने बिथरवीन आणि त्यामुळे प्रत्येक घोडेस्वाराचा गोंधळ उडेल. मी माझी कृपामय दृष्टी यहूदाच्या घराण्याकडे लावीन आणि मी शत्रूच्या प्रत्येक घोड्यांला अंधळे करीन, असे परमेश्वर म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 त्या दिवशी, मी प्रत्येक घोड्याला भयचकित करेन व त्याच्या स्वारांची मति भ्रष्ट करेन. मी यहूदीयाच्या लोकांवर लक्षपूर्वक नजर ठेवेन, पण इतर राष्ट्रांना आंधळे करेन,” असे याहवेह जाहीर करतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




जखर्‍या 12:4
24 Iomraidhean Croise  

माझ्या नामाचा निवास येथे होईल असे ज्या स्थलाविषयी तू म्हटलेस त्या ह्या स्थलाकडे, ह्या मंदिराकडे अहोरात्र तुझी दृष्टी असो; जी प्रार्थना तुझा सेवक ह्या स्थानाकडे तोंड करून करीत आहे ती ऐक.


तेव्हा त्याने घोडे व रथ बरोबर देऊन तेथे मोठे सैन्य पाठवले; त्यांनी रातोरात जाऊन नगर वेढले.


अरामी लोक अलीशावर चालून आले तेव्हा त्यांनी परमेश्वराची प्रार्थना केली की, “ह्या लोकांना आंधळे कर.” अलीशाच्या म्हणण्याप्रमाणे त्याने त्यांना आंधळे केले.


माझ्या नामाचा निवास येथे होईल असे ज्या स्थानाविषयी तू म्हटले त्या ह्या स्थानाकडे, ह्या मंदिराकडे अहोरात्र तुझी दृष्टी असो. जी प्रार्थना तुझा सेवक ह्या स्थानाकडे तोंड करून करीत आहे ती ऐक.


तर आता हे माझ्या देवा, जी प्रार्थना ते ह्या स्थानी करतील तिकडे आपले डोळे उघडून कान दे.


जी प्रार्थना ह्या स्थानी करण्यात येईल तिच्याकडे माझे डोळे उघडे राहतील व माझे कान लागतील.


तुझे सेवक इस्राएल लोक ह्यांच्यासाठी मी तुझा दास ह्या वेळी रात्रंदिवस प्रार्थना करीत आहे; ती कान देऊन ऐक व डोळे उघडून पाहा; आम्ही इस्राएल लोकांनी तुझ्याविरुद्ध पातके केली आहेत, ती मी कबूल करतो; मी व माझ्या बापाच्या घराण्याने पातक केले आहे.


त्या दिवशी असे होईल की उच्च आकाशात आकाशस्थांचे सैन्य व भूमीवर भूमीचे राजे ह्यांची परमेश्वर झडती घेईल.


हे परमेश्वरा, कान लावून ऐक; हे परमेश्वरा, तू डोळे उघडून पाहा; आणि तुझा, सदाजीवी देवाचा उपमर्द करण्यासाठी सन्हेरीबाने निरोप पाठवला आहे. त्याचे सर्व शब्द ऐक.


मी त्यांच्यावर कृपादृष्टी करीन; आणि त्यांना ह्या देशात परत आणीन; त्यांना उभारीन, पाडून टाकणार नाही; त्यांची लागवड करीन, त्यांना उपटून टाकणार नाही.


मी तुला पळ काढायला लावीन; तुझ्या जाभाडात गळ टोचून तुला बाहेर काढीन; तुझे सर्व सैन्य, घोडे व स्वार ह्यांना बाहेर काढीन; सर्व जण सुंदर पोशाख ल्यालेले, कवच व ढाल धारण केलेले, तलवारी परजणारे अशांचा तो मोठा समूह आहे;


माझ्या मेजावर बसून घोडे व स्वार, वीर व सर्व प्रकारचे योद्धे ह्यांना खाऊन तुमची तृप्ती होईल, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.


हे माझ्या देवा, कान दे, ऐक; आपले नेत्र उघडून आमचा झालेला विध्वंस पाहा व तुझे नाम ज्या नगरास दिले आहे ते पाहा; आम्ही आपल्या विनवण्या आमच्या नीतिमत्तेस्तव नव्हे, तर तुझ्या विपुल करुणांस्तव तुझ्यापुढे मांडतो.


वाटेतला चिखल तुडवत युद्धाला निघालेल्या योद्ध्याप्रमाणे ते होतील; ते युद्ध करतील, कारण परमेश्वर त्यांच्याबरोबर आहे; घोडेस्वार फजीत होतील.


त्या दिवशी मगिद्दोनाच्या खोर्‍यातील हदाद्रीमोनाच्या आकांताप्रमाणे यरुशलेमेत मोठा आकांत होईल.


त्या दिवशी असे होईल की सर्व राष्ट्रांना भारी होईल अशा पाषाणासारखे मी यरुशलेमेस करीन; जे कोणी तो उचलतील ते स्वतःला जखम करून घेतील; पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तिच्याविरुद्ध जमतील.


तेव्हा यहूदाचे सरदार आपल्या मनात म्हणतील की, ‘यरुशलेमेचे रहिवासी आपला देव सेनाधीश परमेश्वर ह्याच्या योगे मला पाठबळासारखे आहेत.’


त्या दिवशी मी यहूदाच्या सरदारांना लाकडाखालच्या आगटीसारखे, पेंढ्याखालच्या जळत्या मशालीसारखे करीन; ते उजवीकडील व डावीकडील सभोवतालच्या सर्व राष्ट्रांना खाऊन टाकतील; यरुशलेम आपल्या पूर्वीच्या जागी म्हणजे यरुशलेमेच्या जागी पुन्हा वसेल.


तसेच ह्या मरीप्रमाणे घोड्यांवर, खेचरांवर, उंटांवर, गाढवांवर व त्यांच्या लष्करात असलेल्या सर्व जनावरांवर मरी येईल.


कोणी येऊजाऊ नये म्हणून मी सैन्य रोखण्यासाठी माझ्या मंदिराभोवती तळ देईन; जुलूम करणारा पुन्हा त्यांच्यावर चाल करून जाणार नाही; कारण आता मी प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे.


अज्ञानाच्या काळांकडे देवाने डोळेझाक केली, परंतु आता सर्वांनी सर्वत्र पश्‍चात्ताप करावा अशी तो माणसांना आज्ञा करतो.


परमेश्वर तुला वेडा व आंधळा करील, आणि तुझे मन गोंधळून जाईल;


Lean sinn:

Sanasan


Sanasan