Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




जखर्‍या 12:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 त्या दिवशी असे होईल की सर्व राष्ट्रांना भारी होईल अशा पाषाणासारखे मी यरुशलेमेस करीन; जे कोणी तो उचलतील ते स्वतःला जखम करून घेतील; पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तिच्याविरुद्ध जमतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 त्या दिवसात मी यरूशलेमेला सर्व राष्ट्रांसाठी एक प्रचंड मोठ्या दगडाप्रमाणे करीन, तो त्या सर्वांना भारी होईल. जो त्या दगडाला उचलण्याचा प्रयत्न करील, तो स्वत:च जखमी होईल आणि जगातील सर्व राष्ट्रे यरूशलेमेच्या विरुध्द लढावयास एकत्र येतील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 त्या दिवशी, पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे एकत्र होतील, तेव्हा मी यरुशलेमला हालविता न येणारा खडक करेन. जे तिला हालविण्याचा प्रयत्न करतील, उलट ती राष्ट्रेच घायाळ होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




जखर्‍या 12:3
31 Iomraidhean Croise  

कारण जे राष्ट्र व जे राज्य तुझी सेवा करणार नाही ते विलयास जाईल; अशी राष्ट्रे खातरीने उद्ध्वस्त होतील.


याकोबाचे घराणे अग्नी होईल, योसेफाचे घराणे ज्वाला होईल व एसावाचे घराणे धसकट होईल; ते त्यांच्यात पेट घेऊन त्यांना खाऊन टाकतील, एसावाच्या घराण्यापैकी एकही उरणार नाही; कारण परमेश्वर असे बोलला आहे.


ज्या राष्ट्रांनी माझे ऐकले नाही त्यांची मी क्रोधाने व रागाने अशी झडती घेईन.


वनपशूंत सिंह, मेंढरांत तरुण सिंह गेला असता तो त्यांना तुडवून फाडतो, कोणाच्याने त्यांचे रक्षण करवत नाही, त्याप्रमाणे याकोबाचे अवशिष्ट लोक राष्ट्रांत, बहुत लोकांत होतील.


लबानोनावर केलेला जुलूम तुला घेरील, जनावरांचा झालेला नाश तुला घाबरवील; माणसांचा रक्तपात आणि भूमीवर, शहरांवर व त्यांतील सर्व रहिवाशांवर केलेला जुलूम ह्यामुळे असे होईल.


पाहा, त्या समयी तुला पिडणार्‍या सर्वांचा मी समाचार घेईन. जी लंगडी आहे तिला मी वाचवीन, हाकून दिलेलीस परत आणीन, अखिल पृथ्वीवर ज्यांची अप्रतिष्ठा झाली आहे त्यांची प्रशंसा व नावलौकिक व्हावा असे मी करीन.


मी राज्यांचे तक्त उलथून टाकीन, राष्ट्रांच्या राज्यांचे बल नष्ट करीन; रथ व रथी उलथून टाकीन, घोडे व त्यांवरील स्वार पतन पावतील, प्रत्येक आपल्या भावाच्या तलवारीने पडेल.


त्या दिवशी मगिद्दोनाच्या खोर्‍यातील हदाद्रीमोनाच्या आकांताप्रमाणे यरुशलेमेत मोठा आकांत होईल.


परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी मी प्रत्येक घोड्यास बुजवीन व त्यावरील स्वारास वेडे करीन; मी आपले डोळे उघडून यहूदाच्या घराण्याकडे पाहीन व राष्ट्रांच्या प्रत्येक घोड्यास अंधत्व आणीन.


त्या दिवशी मी यहूदाच्या सरदारांना लाकडाखालच्या आगटीसारखे, पेंढ्याखालच्या जळत्या मशालीसारखे करीन; ते उजवीकडील व डावीकडील सभोवतालच्या सर्व राष्ट्रांना खाऊन टाकतील; यरुशलेम आपल्या पूर्वीच्या जागी म्हणजे यरुशलेमेच्या जागी पुन्हा वसेल.


पाप व अशुद्धता दूर करण्यास त्या दिवशी दाविदाच्या घराण्यासाठी व यरुशलेमनिवाशांसाठी एक झरा फुटेल.


त्या दिवशी असे होईल की, परमेश्वराकडून त्यांची फार त्रेधा उडेल, ते प्रत्येक आपापल्या शेजार्‍याचा हात धरतील; आणि त्या प्रत्येकाचा हात आपल्या शेजार्‍याच्या हाताशी प्रतिकार करील.


आणि त्या दिवशी असे होईल की, प्रकाश असणार नाही; प्रकाशमान ज्योती विरघळून जातील.


[जो ह्या धोंड्यावर पडेल त्याचा चुराडा होईल, परंतु ज्या कोणावर हा पडेल त्याचा हा भुगाभुगा करून टाकील.]”


जो कोणी त्या दगडावर पडेल त्याचे तुकडेतुकडे होतील; परंतु ज्या कोणावर तो पडेल त्याचा तो भुगाभुगा करून टाकील.”


ते चिन्हे दाखवणारे भुतांचे आत्मे आहेत; ते सर्वसमर्थ देवाच्या त्या मोठ्या दिवसाच्या लढाईसाठी संपूर्ण जगातील राजांना एकत्र करण्यास त्यांच्याकडे बाहेर जातात.


Lean sinn:

Sanasan


Sanasan