Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




जखर्‍या 12:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 आणि मी दाविदाच्या घराण्यावर व यरुशलेमेच्या रहिवाशांवर कृपा व विनवणी ह्यांच्या आत्म्याचा वर्षाव करीन आणि ज्या मला त्यांनी विंधले त्या माझ्याकडे2 ते पाहतील; एकुलत्या एका पुत्रासाठी शोक करावा तसे ते त्याच्यासाठी शोक करतील; ज्येष्ठ पुत्राबद्दल जसा कोणी अत्यंत खेद करतो तसा ते त्याबद्दल खेद करतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 “मी दावीदाच्या घराण्यात आणि यरूशलेममध्ये राहणाऱ्या लोकात करुणेचा व दयेचा आत्मा ओतीन. ज्यांनी ‘एका’ ला भोसकले, तेच माझ्याकडे बघतील, आणि कष्टी होतील. आपला एकुलता एक मुलगा वारल्यावर अथवा पहिला मुलगा वारल्यावर एखाद्याला जेवढे दु:ख होते, तेवढेच दु:ख त्यांना होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 “मग मी दावीदाच्या घराण्यावर व यरुशलेमच्या सर्व रहिवाशांवर कृपेचा आणि विनंतीचा आत्मा ओतेन आणि ज्याला त्यांनी भोसकले त्या माझ्याकडे ते पाहतील आणि एकुलत्या एका पुत्रासाठी करावा, तसा ते त्याच्यासाठी शोक करतील आणि प्रथम पुत्रासाठी करावा, तसा ते त्याच्यासाठी विलाप करतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




जखर्‍या 12:10
39 Iomraidhean Croise  

तेव्हा योसेफाभोवती लोक उभे होते त्या सर्वांसमोर त्याला गहिवर आवरेना; त्याने मोठ्याने म्हटले की, “सर्व लोकांना बाहेर घालवा.” योसेफाने आपल्या भावांना ओळख दिली तेव्हा त्याच्याजवळ दुसरे कोणी नव्हते.


तो मोठमोठ्याने रडू लागला, ते मिसरी लोकांनी ऐकले, आणि फारोच्या घराण्याच्याही कानी ते गेले.


तू केलेल्या उद्धाराचा आनंद मला पुन्हा होऊ दे; आणि उत्सुकतेच्या आत्म्याने मला सावरून धर;


माझा वाग्दंड ऐकून वळा; पाहा, मी आपल्या आत्म्याचा वर्षाव तुमच्यावर करीन, मी आपली वचने तुम्हांला कळवीन.


कारण मी आपल्या बापाचा पुत्र होतो माझ्या आईच्या दृष्टीने मी सुकुमार व एकुलता एक होतो.


आमच्यावर आत्म्याची वृष्टी वरून होईल, तोवर असे होईल, मग अरण्य बाग होईल व बागेस वन गणतील.


पृथ्वीच्या सर्व सीमांनो, माझ्याकडे वळा, उद्धार पावा, कारण मी देव आहे, अन्य कोणी नव्हे.


मी वळल्यावर पश्‍चात्ताप केला; मला बोधप्राप्ती घडल्यावर मी ऊर1 बडवू लागलो; माझ्या तारुण्यातील अपकीर्तीच्या भारामुळे मी लज्जित व फजीत झालो आहे.’


ते अश्रुपात करीत येतील; ते विनंती करीत असता मी त्यांना नेईन; ते ठोकर खाणार नाहीत अशा सरळ मार्गाने मी त्यांना पाण्याच्या प्रवाहाकडे आणीन; कारण मी इस्राएलास पिता झालो आहे व एफ्राईम माझा प्रथमजन्मलेला आहे.


परमेश्वर म्हणतो, त्या दिवसांत, त्या काळी इस्राएल लोक येतील, ते व यहूदाचे लोक जमून येतील; ते वाटेने रडत येतील, परमेश्वर आपला देव ह्याला शरण येतील.


माझ्या लोकांच्या कन्ये, कंबरेला गोणपाट गुंडाळ, राखेत लोळ; एकुलत्या एका मुलाविषयीच्या शोकाप्रमाणे शोक व आक्रंदन कर; कारण लुटारू आमच्यावर एकाएकी येईल.


ज्या तुमच्या मार्गांनी व ज्या तुमच्या सर्व कर्मांनी तुम्ही आपणांस विटाळले, त्यांचे स्मरण तुम्हांला होईल व तुम्ही जी सर्व दुष्कर्मे केली त्यामुळे तुम्ही स्वतःचा वीट मानाल.


मी तुमच्या ठायी माझा आत्मा घालीन, तुम्ही सजीव व्हाल व मी तुम्हांला तुमच्या देशात वसवीन; तेव्हा मी परमेश्वर हे बोललो व मी तसे केले हे तुम्हांला समजेल, असे परमेश्वर म्हणतो.”


मी आपले मुख ह्यापुढे त्यांच्यापासून लपवणार नाही; कारण मी आपल्या आत्म्याची इस्राएल घराण्यावर वृष्टी केली आहे, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”


तुमचे उत्सव मी शोकाचे दिवस करीन, तुमची सर्व गीते विलापरूप करीन, सर्वांच्या कंबरेस गोणपाट गुंडाळीन, सर्वांची डोकी भादरून टाकीन; कोणी एकुलत्या एका पुत्रासाठी शोक करावा त्या प्रसंगासारखा तो प्रसंग करीन, आणि त्याचा शेवट क्लेशमय करीन.”


तो तिसरा भाग मी अग्नीत टाकीन, रुपे गाळतात तसे मी त्यांना गाळीन, सोने शुद्ध करतात त्याप्रमाणे त्यांना शुद्ध करीन; ते माझे नाम घेतील तेव्हा मी त्यांचे ऐकेन; मी म्हणेन, ‘हे माझे लोक’ व ते म्हणतील, ‘परमेश्वर माझा देव.”’


मग मोशेने पितळेचा एक साप बनवून टांगला, तेव्हा सर्पदंश झालेल्या कोणी त्या पितळेच्या सापाकडे पाहिले म्हणजे तो जगे.


तेव्हा मनुष्याच्या पुत्राचे चिन्ह आकाशात प्रकट होईल; मग ‘पृथ्वीवरील सर्व जातींचे लोक शोक करतील’ आणि ते ‘मनुष्याच्या पुत्राला आकाशातल्या मेघांवर आरूढ होऊन’ पराक्रमाने व मोठ्या वैभवाने ‘येताना’ पाहतील;


तेव्हा “कोंबडा आरवण्यापूर्वी तीन वेळा तू मला नाकारशील” असे जे येशूने पेत्राला सांगितले होते ते त्याला आठवले आणि तो बाहेर जाऊन मोठ्या दुःखाने रडला.


दुसर्‍या दिवशी येशूला आपणाकडे येताना पाहून तो म्हणाला, “हा पाहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा!


मग परराष्ट्रीयांवरही पवित्र आत्म्याच्या दानाचा वर्षाव झाला आहे असे पाहून पेत्राबरोबर आलेल्या विश्वास ठेवणार्‍या व सुंता झालेल्या सर्व लोकांना आश्‍चर्य वाटले.


मी बोलू लागलो तेव्हा, जसा आरंभी आपल्यावर तसा त्यांच्यावरही पवित्र आत्मा उतरला.


‘देव म्हणतो, शेवटल्या दिवसांत असे होईल की, मी मनुष्यमात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन; तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या तरुणांना दृष्टान्त होतील, व तुमच्या वृद्धांना स्वप्ने पडतील;


म्हणून तो देवाच्या उजव्या हाताकडे बसवलेला आहे, त्याला पवित्र आत्म्याविषयीचे वचन पित्यापासून प्राप्त झाले आहे आणि तुम्ही जे पाहता व ऐकता त्याचा त्याने वर्षाव केला आहे.


हे ऐकून त्यांच्या अंतःकरणास चुटपुट लागली आणि ते पेत्र व इतर प्रेषित ह्यांना म्हणाले, “बंधुजनहो, आम्ही काय करावे?”


कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हांला मिळाला नाही; तर ज्याच्या योगे आपण “अब्बा! बापा!” अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हांला मिळाला आहे.


तसेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो; कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही; पण आत्मा स्वत: अनिर्वाच्य कण्हण्याने मध्यस्थी करतो.


सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करा, सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा, आणि ह्या कामी पूर्ण तत्परतेने व सर्व पवित्र जनांसाठी विनवणी करत जागृत राहा.


आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडे पाहत असावे; जो आनंद त्याच्यापुढे होता त्याकरता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला, आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे.


प्रियजनहो, तुम्ही तर आपल्या परमपवित्र विश्वासावर स्वतःची रचना करा; पवित्र आत्म्याने प्रार्थना करा,


‘पाहा, तो मेघांसहित येतो;’ प्रत्येक डोळा त्याला ‘पाहील’, ज्यांनी त्याला ‘भोसकले तेही पाहतील; आणि पृथ्वीवरील सर्व वंश त्याच्यामुळे ऊर बडवून घेतील.’ असेच होणार. आमेन.


किर्याथ-यारीम येथे कोश राहिला त्याला बहुत काळ लोटला, म्हणजे वीस वर्षे निघून गेली; त्यानंतर सर्व इस्राएल लोक परमेश्वराच्या दर्शनाविषयी आतुर झाले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan