Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




जखर्‍या 11:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 मग मी म्हणालो, “मी ह्यापुढे तुम्हांला चारणार नाही; कोणी मेले तर मरू द्या, कोणी नष्ट झाले तर नष्ट होऊ द्या; वाचून राहिलेल्यांना एकमेकांचे मांस खाऊ द्या.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 मग मी म्हणालो, “आता मी तुमचा सांभाळ करणार नाही. जी मरायला टेकली आहेत ती मरोत; कोणी नष्ट झाले तर होऊ द्या; आणि जी वाचतील ती एकमेकांचे मांस खातील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 आणि मी म्हणालो, “मी तुमचा मेंढपाळ राहणार नाही. जे मरत असतील, ते मरो आणि जे नाश होत असतील, ते नाश पावोत. जे उरलेले आहेत, ते एकमेकांचे मांस खावोत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




जखर्‍या 11:9
22 Iomraidhean Croise  

मी त्यांना त्यांच्या पुत्रांचे मांस व त्यांच्या कन्यांचे मांस खायला लावीन; त्यांचे शत्रू व त्यांचा जीव घेण्यास टपणारे त्यांना वेढा घालतील व पेचात आणतील, तेव्हा त्यांच्यातला प्रत्येक जण आपल्या शेजार्‍याचे मांस खाईल.’


जेव्हा हे लोक किंवा एखादा संदेष्टा किंवा याजक तुला विचारील की, ‘परमेश्वराचे भारी वचन काय आहे?’ तेव्हा त्यांना म्हण, ‘तुम्ही भारी आहात आणि मीच तुम्हांला टाकून देईन,’ असे परमेश्वर म्हणतो.


त्या अर्थी पाहा, मी तुम्हांला अगदी विसरेन, मी तुम्हांला आणि जे नगर तुम्हांला व तुमच्या पूर्वजांना दिले त्याला माझ्या नजरेसमोरून झुगारून देईन;


तो येऊन मिसर देशावर मारा करील; जे मरायचे ते मरणाच्या, जे बंदिवासात जायचे ते बंदिवासाच्या व जे तलवारीने वधायचे ते तलवारीच्या स्वाधीन करण्यात येतील.


तुझ्यामध्ये बाप आपल्या मुलांना खातील व मुले आपल्या बापांना खातील; मी तुझ्या ठायी न्यायशासन करीन व तुझे सगळे उरलेले लोक सर्व दिशांना विखरून टाकीन.


ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झाला आहे. तू ज्ञानाचा अव्हेर केलास म्हणून मीही तुझा अव्हेर करीन; म्हणजे अर्थात मी याजकाचे काम तुला करू देणार नाही; तू आपल्या देवाचे नियमशास्त्र विसरलास म्हणून मीही तुझ्या मुलांना विसरेन.


परमेश्वर म्हणतो, “देशभर असे होईल की, त्याचे दोन भाग नष्ट करतील, पण त्याचा तिसरा भाग मागे राहील.


त्यांना असू द्या; ते आंधळ्यांचे आंधळे वाटाडे आहेत आणि आंधळा आंधळ्याला नेऊ लागला तर दोघेही खाचेत पडतील.”


आणि वाटेवर अंजिराचे एक झाड होते ते पाहून तो त्याच्याजवळ गेला; पण पानांशिवाय त्याला त्यावर काही मिळाले नाही. मग त्याने त्याला म्हटले, “ह्यापुढे तुला कधीही फळ न येवो.” आणि ते अंजिराचे झाड ताबडतोब वाळून गेले.


म्हणून मी तुम्हांला सांगतो की, देवाचे राज्य तुमच्यापासून काढून घेतले जाईल व जी प्रजा त्याचे फळ देईल तिला ते दिले जाईल.


ह्यावरून येशू त्यांना म्हणाला, “आणखी थोडा वेळ तुमच्याबरोबर प्रकाश आहे; तुम्हांला अंधकाराने गाठू नये म्हणून तुमच्याजवळ प्रकाश आहे तोपर्यंत चाला; कारण जो अंधकारात चालतो त्याला आपण कोठे जातो हे कळत नाही.


ह्यानंतर येशू पुन्हा त्यांना म्हणाला, “मी निघून जातो आणि तुम्ही माझा शोध कराल व तुम्ही आपल्या पापांत मराल; मी जेथे जातो तेथे तुम्ही येऊ शकत नाही.”


म्हणून मी तुम्हांला सांगितले की, तुम्ही आपल्या पापांत मराल; कारण मी तो आहे1 असा विश्वास तुम्ही न धरल्यास तुम्ही आपल्या पापांत मराल.”


दुराचारी माणूस दुराचार करत राहो. मलिनतेने वागणारा माणूस स्वतःला मलिन करत राहो; नीतिमान माणूस नैतिक आचरण करत राहो; पवित्राचरणी माणूस स्वतःला पवित्र करत राहो.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan