Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




जखर्‍या 11:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 मी वधासाठी नेमलेल्या मेंढरांना चारले, मेंढरांतल्या अतिशय दुबळ्यांना चारले. मी दोन काठ्या घेतल्या. एकीचे नाव रमणीयता व दुसरीचे नाव बंधन असे ठेवले. आणि मी त्या कळपांना चारले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 म्हणून मी त्या ठार मारण्यासाठी नेमलेल्या कळपाचा मेंढपाळ झालो. त्यांच्यातील अगदी मरणास टेकलेल्यांना चारले. मी दोन काठ्या घेतल्या. एका काठीला मी रमणीयता व दुसरीला ऐक्य असे नाव दिले. मग मी त्या कळपाची निगा राखण्यास सुरवात केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 तेव्हा मी कत्तल करण्यासाठी राखीव मेंढरांचा, विशेषतः कळपात अत्याचार होत असलेल्या मेंढरांचा मेंढपाळ झालो. मग मी मेंढपाळांच्या दोन काठ्या घेतल्या, एकीला मी कृपा व दुसरीला ऐक्य असे नाव दिले आणि मेंढरांचे राखण केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




जखर्‍या 11:7
25 Iomraidhean Croise  

मृत्युच्छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस; तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात.


परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन; ते हे की, आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी; म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहीन व त्याच्या मंदिरात ध्यान करीन.


परमेश्वर जो आमचा देव त्याचा प्रसाद आमच्यावर होवो; आमच्या हातचे काम आमच्यासाठी सिद्धीस ने, आमच्या हातचे काम सिद्धीस ने.


तर तो दुबळ्यांचा न्याय यथार्थतेने करील, आणि पृथ्वीवरील दीनांच्या वादाचा यथार्थ निर्णय करील; तो आपल्या मुखरूप वेत्राने पृथ्वीला ताडन करील, आपल्या मुखाच्या फुंकराने दुर्जनांचा संहार थकरील.


मेंढपाळाप्रमाणे तो आपल्या कळपास चारील, कोकरे आपल्या कवेत घेऊन उराशी धरून वाहील, आणि पोरे पाजणार्‍यांना सांभाळून नेईल.


प्रभू परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे; कारण दीनांना शुभवृत्त सांगण्यास परमेश्वराने मला अभिषेक केला आहे; भग्नहृदयी जनांना पट्टी बांधावी, धरून नेलेल्यांना मुक्तता व बंदिवानांना बंधमोचन विदित करावे;


तथापि जे लोक लाचार असून ज्यांच्याजवळ काहीएक नव्हते अशांना गारद्यांचा नायक नबूजरदान ह्याने यहूदा देशात राहू दिले; त्याच वेळेस त्याने त्यांना द्राक्षांचे मळे व शेते दिली.


गुरेढोरे अथवा शेरडेमेंढरे ह्यांपैकी ज्यांची गणना काठीखालून चालवून होते अशा प्रत्येक दहांपैकी एकेक पशू परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र असावा.


तू आकडी घेऊन आपल्या लोकांना चार; तुझ्या वतनातील मेंढरे कर्मेलाच्या झाडीत एकान्ती राहतात त्यांना चार; प्राचीन काळच्या दिवसांप्रमाणे बाशानात व गिलादात त्यांना चरू दे.


मी तुझ्यामध्ये नम्र व गरीब लोक राहू देईन, ते परमेश्वराच्या नामावर श्रद्धा ठेवतील.


मग यहूदा व इस्राएल ह्यांचे बंधुत्व मोडावे म्हणून मी बंधन नावाची माझी दुसरी काठी मोडली.


परमेश्वर माझा देव म्हणतो, “वधासाठी नेमलेल्या मेंढरांना चार.


‘आंधळे पाहतात,’ पांगळे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मेलेले उठवले जातात व ‘गरिबांना सुवार्ता सांगण्यात येते’;


दावीद स्वत: त्याला प्रभू म्हणतो, मग तो त्याचा पुत्र कसा?” हे त्याचे बोलणे सामान्य जनता हर्षाने ऐकत होती.


ह्या मेंढवाड्यातली नाहीत अशी माझी दुसरी मेंढरे आहेत, तीही मला आणली पाहिजेत; ती माझी वाणी ऐकतील; मग एक कळप, एक मेंढपाळ असे होईल.


माझ्या प्रिय बंधूंनो, ऐका; लोकदृष्टीने जे दरिद्री आहेत त्यांना विश्वासासंबंधाने धनवान होण्यास आणि जे राज्य देवाने आपल्यावर प्रीती करणार्‍यांना देऊ केले त्याचे वारस होण्यास त्याने निवडले आहे की नाही?


मग त्याने आपली काठी हाती घेतली; ओहोळातून पाच गुळगुळीत गोटे वेचून आपल्या थैलीत म्हणजे धनगरी बटव्यात ठेवले, आणि आपली गोफण हाती घेऊन तो त्या पलिष्ट्याकडे गेला.


तो पलिष्टी दाविदाला म्हणाला, “मी काय कुत्रा आहे म्हणून तू काठी घेऊन माझ्यापुढे आला आहेस?” त्या पलिष्ट्याने आपल्या देवांची नावे घेऊन दाविदाला शिव्याशाप दिले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan