Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




जखर्‍या 11:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 मग यहूदा व इस्राएल ह्यांचे बंधुत्व मोडावे म्हणून मी बंधन नावाची माझी दुसरी काठी मोडली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 मग मी ऐक्य नावाच्या काठीचे दोन तुकडे केले जेणेकरून यहूदा आणि इस्राएल यांच्यामधील बंधुत्त्व मोडावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 मग मी माझी ऐक्य नावाची दुसरी काठी मोडली, यहूदीया व इस्राएल यामधील कौटुंबिक ऐक्य भंग केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




जखर्‍या 11:14
14 Iomraidhean Croise  

एफ्राइमाचा मत्सर नाहीसा होईल, यहूदाचे वैरी उच्छेद पावतील, एफ्राईम यहूदाचा हेवा करणार नाही व यहूदा एफ्राइमाशी विरोध करणार नाही.


मनश्शे एफ्राइमाला खातो, आणि एफ्राईम मनश्शेला खातो; ते दोघे मिळून यहूदाला विरोध करतात. इतके झाले तरी त्याचा क्रोध शमला नाही, त्याचा हात अजून उगारलेला आहे.


मी ह्या देशात, इस्राएलाच्या पर्वतांवर त्यांचे एक राष्ट्र बनवीन; त्या सर्वांवर एकच राजा राज्य करील; ती ह्यापुढे दोन निराळी राष्ट्रे राहणार नाहीत; ह्यापुढे ती विभक्त होऊन त्यांची दोन राज्ये होणार नाहीत.


मी ह्या देशाच्या रहिवाशांवर ह्यापुढे दया करणार नाही असे परमेश्वर म्हणतो; पण मी त्यांना एकमेकांच्या व राजाच्या हाती देईन; ते देश नष्ट करतील व मी त्यांना त्यांच्या हातातून सोडवणार नाही.”


मी वधासाठी नेमलेल्या मेंढरांना चारले, मेंढरांतल्या अतिशय दुबळ्यांना चारले. मी दोन काठ्या घेतल्या. एकीचे नाव रमणीयता व दुसरीचे नाव बंधन असे ठेवले. आणि मी त्या कळपांना चारले.


मग मी म्हणालो, “मी ह्यापुढे तुम्हांला चारणार नाही; कोणी मेले तर मरू द्या, कोणी नष्ट झाले तर नष्ट होऊ द्या; वाचून राहिलेल्यांना एकमेकांचे मांस खाऊ द्या.”


त्या वेळी ‘पुष्कळ जण अडखळतील’, एकमेकांना धरून देतील, व एकमेकांचा द्वेष करतील.


आपसांत फूट पडलेले राज्य टिकत नाही.


परंतु तुम्ही जर एकमेकांना चावता व खाऊन टाकता तर परस्परांच्या हातून एकमेकांचा संहार होऊ नये म्हणून जपा.


पण तुमच्या मनात तीव्र मत्सर व तट पाडण्याचा स्वभाव आहे तर ताठा मिरवू नका व सत्याविरुद्ध लबाडी करू नका.


कारण जेथे मत्सर व तट पाडण्याचा स्वभाव आहे तेथे अव्यवस्था व प्रत्येक कुकर्म आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan