Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




जखर्‍या 11:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 मग मी त्यांना म्हणालो, “तुम्हांला बरे दिसले तर मला माझे वेतन द्या, नाहीतर जाऊ द्या.” तेव्हा त्यांनी मला माझे वेतन तीस रुपये तोलून दिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 मग मी म्हणालो, “तुमची इच्छा असल्यास माझी मजूरी द्या. इच्छा नसल्यास देऊ नका.” तेव्हा त्यांनी मला तीस चांदीची नाणी दिली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 मी म्हणालो, “तुम्हाला योग्य वाटत असेल तर मला माझे वेतन द्या; पण तुम्हाला वाटत नसेल तर देऊ नका.” तेव्हा त्यांनी मला चांदीची तीस नाणी दिली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




जखर्‍या 11:12
16 Iomraidhean Croise  

अब्राहामाने एफ्रोनाचे म्हणणे कबूल करून हेथींच्या देखत सांगितला होता तेवढा पैसा म्हणजे चलनी चारशे शेकेल रुपे त्याला तोलून दिले.


ते मिद्यानी व्यापारी जवळून चालले तेव्हा त्यांनी योसेफाला त्या खड्ड्यातून ओढून बाहेर काढले आणि त्या इश्माएली लोकांना वीस रुपयांना विकून टाकले. ते योसेफाला मिसर देशात घेऊन गेले.


अहाब नाबोथास म्हणाला, “तुझा द्राक्षमळा माझ्या वाड्यानजीक आहे, तो मला दे, म्हणजे मी त्यात भाजीपाला लावीन; त्याच्याऐवजी मी तुला त्याहून चांगला द्राक्षमळा देतो किंवा तुझी इच्छा असल्यास मी तुला त्याचे पैसे देतो.”


तर आता माझ्यासाठी लबानोन पर्वतावरील गंधसरू कापण्याची आज्ञा द्या; माझे सेवक आपल्या लोकांबरोबर राहतील; जी काही मजुरी आपण ठरवाल ती मी आपल्या सेवकांना देईन; आपल्याला हे ठाऊक आहे की इमारतीसाठी लाकडे कापायचे कसब सीदोनी लोकांसारखे आमच्या लोकांपैकी कोणात नाही.”


ही गोष्ट राजाला व सगळ्या जनसमुदायाला पसंत पडली.


जर बैलाने कोणाच्या दासाला किंवा दासीला हुंदडून मारले, तर त्याच्या धन्याने त्यांच्या धन्याला तीस शेकेल रुपे द्यावे आणि त्या बैलाला दगडमार करावा.


मग मी अनाथोथातले ते शेत माझा चुलतभाऊ हानामेल ह्याच्यापासून विकत घेतले व त्याला त्याचे मोल सतरा शेकेल रुपे तोलून दिले.


आणि स्त्री असली तर तिचे मोल तीस शेकेल असावे.


मी न्याय करायला तुमच्याकडे येईन; आणि जादूगार, व्यभिचारी, खोटे साक्षी ह्यांच्याविरुद्ध आणि मजुरांची मजुरी अडकवून ठेवणारे, विधवा व अनाथ ह्यांच्यावर जुलूम करणारे, आणि मला न भिता परक्याला न्याय मिळू न देणारे ह्यांच्याविरुद्ध साक्ष देण्याची मी त्वरा करीन.


“मी त्याला धरून दिले तर मला काय द्याल?” ‘त्यांनी’ त्याला ‘तीस रुपये तोलून दिले.’


आणि परमेश्वराने’ मला ‘आज्ञा केल्याप्रमाणे कुंभाराचे शेत घेण्यासाठी त्यांनी दिले.”’


तेव्हा जे वचन यिर्मया संदेष्ट्याच्या द्वारे सांगितले होते ते पूर्ण झाले; ते असे की, “‘आणि ज्याचे मोल इस्राएलाच्या वंशजांपैकी काहींनी ठरवले, त्याचे मोल, म्हणजे ते तीस रुपये, त्यांनी घेतले


शिमोनाचा मुलगा यहूदा इस्कर्योत ह्याच्या मनात त्याला धरून द्यावे असे सैतान घालून चुकला होता.


Lean sinn:

Sanasan


Sanasan